Join us

वाढलेलं बीपी-सततची अंगदुखी कायमची दूर करायची तर रोज ‘असं’ ३ मिनिटे फक्त चाला, पाहा सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2025 13:02 IST

Benefits Of Walking: तब्येत धडधाकट ठेवण्यासाठी रोज चालण्याचा व्यायाम निमयितपणे करणे किती गरजेचे आहे, याविषयी डॉक्टरांनी दिलेली ही खास माहिती..

ठळक मुद्देकोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठीही चालण्याचा व्यायाम खूप उपयुक्त ठरतो. 

तुम्हाला जर फिट राहायचं असेल, अन्नपचन व्यवस्थित होऊन पोटाचे विकार होण्याचा धोका टाळायचा असेल, पायदुखी, गुडघेदुखी कमी करायची असेल आणि वाढतं वजन नियंत्रित ठेवायचं असेल तर सगळ्यात उत्तम आणि स्वस्तात मस्त व्यायाम म्हणजे चालणे. हा व्यायाम तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही करू शकता. हल्ली वॉकिंग करणाऱ्या मंडळींचे प्रमाणही खूप वाढले आहे. थोडा वेळ मोकळ्या हवेत जाऊन आलं की मन फ्रेश होतं असा त्यांचा अनुभव असतो. आता हाच व्यायाम बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी करण्यासाठी कसा उपयुक्त ठरू शकतो ते पाहूया..(every day just 3 minute walk can control your blood pressure and reduces heart attack risk)

 

दररोज वॉकिंग करण्याचे फायदे

रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींसाठी चालण्याचा व्यायाम करणे अतिशय फायद्याचे ठरते, असे डॉ. अखिलेश यादव सांगतात. नवभारत टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार डॉ. यादव असं सांगतात की ज्या लोकांना बीपी, हृदयरोग असा त्रास असतो त्यांनी रोज किमान ३ मिनिटे तरी नियमितपणे चालले पाहिजे.

टॅनिंग वाढलं, त्वचा डल दिसते, ग्लो कमी झाला? तिन्ही समस्यांवर १ उपाय- रूपच पालटून जाईल

कारण यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. बीपी वाढण्याचे एक कारण म्हणजे मानसिक ताण हा देखील असतो. चालण्याचा व्यायाम केल्यामुळे मन शांत, रिलॅक्स होते. त्यामुळे आपोआपच मनावरचा ताणही कमी होत जातो. 

 

डॉक्टर असंही सांगतात की जेवल्यानंतर बसून राहिल्याने किंवा लगेच आडवे पडल्याने पचनक्रिया मंदावते. त्यामुळे पोट जड पडल्यासारखे होते.

मंगळागौर स्पेशल: नऊवार घेण्यात कशाला पैसे घालवता? सहावार साडीच नऊवारीसारखी नेसण्याची मस्त ट्रिक

पण त्याउलट जर तुम्ही जेवल्यानंतर हळूवार चालण्याची सवय स्वत:ला लावून घेतली तर मात्र पचन चांगलं होऊन रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासही मदत होते. यामुळे शरीरात चरबी साचून वजन वाढण्याचे प्रमाणही कमी होत जाते. शिवाय कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठीही चालण्याचा व्यायाम खूप उपयुक्त ठरतो.  

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सहृदयविकाराचा झटकाहृदयरोगव्यायाम