Lokmat Sakhi >Fitness > छोटे-छोटे बदल केले आळश्यातला आळशीही होतो सुपर स्मार्ट, आयुष्य बदलून टाकणारी वाचा जादू..

छोटे-छोटे बदल केले आळश्यातला आळशीही होतो सुपर स्मार्ट, आयुष्य बदलून टाकणारी वाचा जादू..

even laziest can become super smart ; आळस वाढणं म्हणजे आयुष्याचा समतोल ढासाळणं. काही सवयी ज्या आळस दुर करतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2024 14:28 IST2024-12-29T14:24:50+5:302024-12-29T14:28:29+5:30

even laziest can become super smart ; आळस वाढणं म्हणजे आयुष्याचा समतोल ढासाळणं. काही सवयी ज्या आळस दुर करतील.

even laziest can become super smart | छोटे-छोटे बदल केले आळश्यातला आळशीही होतो सुपर स्मार्ट, आयुष्य बदलून टाकणारी वाचा जादू..

छोटे-छोटे बदल केले आळश्यातला आळशीही होतो सुपर स्मार्ट, आयुष्य बदलून टाकणारी वाचा जादू..

लॉकडाऊननंतर लोकांना पुन्हा कार्यक्षम आयुष्य पद्धतीचा अवलंब करणे जरा कठीणच जात आहे. सर्वच नाही पण बरेच जण अजूनही आळसावलेले आहेत. हा आळस आपला शत्रू आहे, हे विसरून चालणार नाही. छोट्या-छोट्या सवयी बदलून जीवनशैली पुन्हा रेषेत आणणे फार गरजेचे आहे. दिनचर्येत थोडे फार बदल करून चांगल्या सवई लाऊन घेता येऊ शकतात.जाणून घ्या  काही सोप्या सवयी, ज्या प्रत्येक जण स्वतःला लावून घेऊ शकतो. नवीन वर्षात पदार्पण या सवयींसमवेत करा. काही सवयी बदलून आळश्यातला आळशी माणूससुद्धा शिस्तबद्ध आयुष्य जगू शकतो. गरज असते ती फक्त सुरूवात करण्याची एकदा का तुम्ही हेल्दी लाईफस्टाईलला ग्रीनसिग्नल दिलात की मग बघा, सगळं कसं सरळरेषेत यायला लागेल. रूटीनच नाही तर पोटसुद्धा. नवीन वर्षात आपण काही न काही ठरवतच असतो या वेळी चांगल्या सवयी अंगी बाळगण्याचा निर्धार करूया. 

१.छोट्या-छोट्या सवयी बदलून आपण एक शिस्तबद्ध आयुष्य जगू शकतो. एक दिनचर्या तयार करा आणि ती पाळायचा प्रयत्न करा. आयुष्यात स्थिरता  आणा ठरवलेल्या गोष्टींवर ठाम राहा. नवीन गोष्टी शिकून घ्या. आकलन क्षमता वाढवा. फार मोठे बदल नाही पण छोटे बदल जसे की, लिफ्ट ऐवाजी पायऱ्या वापरा. 

२)कम्फर्ट झोन मधून बाहेर पडणे फार कठीण असते. मात्र त्या चौकटीमधून बाहेर पडल्याखेरीज नवीन काही शिकणे शक्य नाही. जर एखादे काम तुम्हाला करायला आवडत नाही पण ते तुमच्या करीयरसाठी चांगले आहे तर ते करायला सुरूवात करा.

३)एक ध्येय ठरवा आणि त्यावर लक्षकेंद्रित करा. असे केल्याने तुम्ही काम पटापट आणि पूर्ण मन लावून करू शकाल. ध्येय प्राप्ती न झाल्यास त्याचा त्रास करून घेऊ नका. प्रयत्न करत राहा. आजच्या दिवसात एवढं काम करणारंच असे ठरवून ते पूर्ण करा.

४)एखाद्या कामात चांगले असाल तर त्यात भारावून जाऊ नका. त्यात अजून अधिक प्राविण्य मिळवण्यासाठी प्रयत्न करा. बरेचदा आपल्याला जे काम छान जमते त्यावर आपण लक्ष देत नाही. असे केल्याने त्या गोष्टीत नाविन्य आणता येत नाही. त्यामुळे कष्ट फक्त नवीन गोष्टी शिकण्यात नाही तर येणाऱ्या गोष्टी सुधारण्यातही असू द्या. 

५)डोके शांत आणि शरीर कार्यक्षम ठेवण्याचा प्रयत्न करा.आळस घालवण्याचा मार्ग म्हणजे सतत कृती करत राहणे.आळस वाढला की चिडचिड साहाजिकच वाढते.असे होऊ देऊ नका. थोडा व्यायाम ,चालणे, वाचन अशा कृती करा.  

थोड्यापासून सुरुवात करून ध्येयाकडे वाटचाल सूरू ठेवा. 

Web Title: even laziest can become super smart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.