Lokmat Sakhi >Fitness > जास्त प्रमाणात पाणी पिणंही ठरू शकतं घातक, जाणून घ्या किती पाणी पिणं शरीरासाठी योग्य!

जास्त प्रमाणात पाणी पिणंही ठरू शकतं घातक, जाणून घ्या किती पाणी पिणं शरीरासाठी योग्य!

Excess Water is Harmful for Health: जास्त पाणी प्यायल्यास ओवरहायड्रेशनची समस्या होते. ज्याला वॉटर इंटाक्सिकेशन असंही म्हणतात. जास्त पाणी प्यायल्यास किडनीवर दबाव पडतो आणि अनेक प्रकारच्या समस्या होतात. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:51 IST2025-01-30T16:46:33+5:302025-01-30T16:51:34+5:30

Excess Water is Harmful for Health: जास्त पाणी प्यायल्यास ओवरहायड्रेशनची समस्या होते. ज्याला वॉटर इंटाक्सिकेशन असंही म्हणतात. जास्त पाणी प्यायल्यास किडनीवर दबाव पडतो आणि अनेक प्रकारच्या समस्या होतात. 

Drinking excess water is harmful for health know how much is right to drink | जास्त प्रमाणात पाणी पिणंही ठरू शकतं घातक, जाणून घ्या किती पाणी पिणं शरीरासाठी योग्य!

जास्त प्रमाणात पाणी पिणंही ठरू शकतं घातक, जाणून घ्या किती पाणी पिणं शरीरासाठी योग्य!

Excess Water is Harmful for Health: पाणी शरीरासाठी किती गरजेचं असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. पाण्याचं मदतीनं शरीरातील वेगवेगळी कामं करण्यास मदत मिळते. पाण्यानं शरीर हायड्रेट राहतं आणि अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव होतो. एक्सपर्ट दिवसभर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. मात्र, प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं. जास्त पाणी प्यायल्यास ओवरहायड्रेशनची समस्या होते. ज्याला वॉटर इंटाक्सिकेशन असंही म्हणतात. जास्त पाणी प्यायल्यास किडनीवर दबाव पडतो आणि अनेक प्रकारच्या समस्या होतात. 

पाणी पिण्याची योग्य पद्धत

पाणी नेहमीच योग्य पद्धतीनं प्यायला हवं. पाणी कधीच घाईघाईनं पिऊ नये. पाणी हळूहळू एक एक घोट प्यावं. जेणेकरून ते शरीरात ते अब्जॉर्ब व्हावं. खूप जास्त थंड किंवा गरम पाणी कधीच पिऊ नये. पाणी जेवण झाल्यावर नेहमी अर्ध्या तासांनंतर प्यावं. जेणेकरून पचनक्रिया चांगली व्हावी. जेवण केल्यावर लगेच पाणी प्यायल्यास पचनक्रिया स्लो होते. सकाळी उपाशीपोटी पाणी पिणं फायदेशीर असतं. असं केल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. 

पाणी पिण्याचं योग्य प्रमाण

सामान्यपणे एका हेल्दी व्यक्तीनं दिवसातून ८ ते १० ग्लास म्हणजे साधारण २ ते अडीच लीटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण हे प्रमाण तुमचं वय, वजन लिंग, फिजिकल अ‍ॅक्टिविटी आणि वातावरणावरही अवलंबून असतं. तुम्ही जास्त एक्सरसाईज करत असाल आणि तुमचा जास्त घाम जात असेल तर पाणी पिण्याचं प्रमाण वाढेल. जर तुम्ही आजारी असाल आणि औषधांचं सेवन करत असाल तर पाण्यात प्रमाणात बदल होऊ शकतो.

काय काळजी घ्याल?

रोज तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पित आहात याची काळजी घ्या. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं टाळलं पाहिजे. कारण यानं शरीरात सोडिअमचं संतुलन बिघडतं, ज्यामुळे हायपोनेट्रेमियाचा धोका वाढतो. पाण्याचं प्रमाणं प्रमाणा तुमच्या शरीराच्या गरजांनुसार बदलू शकतं. पण एकूणच काय तर दिवसभर भरपूर पाणी प्यावं.
 

Web Title: Drinking excess water is harmful for health know how much is right to drink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.