How Much Walk For Heart: हृदय निरोगी राहणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं. कारण ते जर बंद झालं किंवा त्यासंबंधी एखादा आजार झाला तर जगणं मुश्कील होऊन बसतं. त्यामुळे कितीही बिझी असाल आणि कितीही जबाबदाऱ्या असतील तरी हृदय निरोगी ठेवण्यासाठी वेळ काढणं फार महत्वाचं ठरतं. आता हृदय निरोगी फिट ठेवण्यासाठी काय करावं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यासाठी बेस्ट उपाय म्हणजे ब्रिस्क वॉक करणं आहे. अशात हृदय फिट ठेवण्यासाठी रोज किती वेळ वॉक करावा आणि किती स्पीडनं वॉक करावा हे एक्सपर्टकडून जाणून घेऊया.
India TV Hindi ला डॉक्टर अशोक सेठ यांनी सांगितलं की, हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही आठवड्यातून किमान 200 मिनिटं ब्रिस्क वॉक करणं गरजेचं आहे. ज्यात 5 मिनिटांचा आणि 5 मिनटं कूलडाउन असायला हवं. इतका वेळ ब्रिस्क वॉक केल्यानं तुमचं हृदय निरोगी आणि फिट राहू शकतं.
किती स्पीडनं करावा वॉक?
हृदयासाठी तुम्ही ब्रिस्क वॉक नियमितपणे करणं गरजेचं आहे. ब्रिस्क वॉक म्हणजे वेगानं चालणं. चालताना अजिबात काही बोलायचं नाही किंवा सोबतच्या लोकांसोबत गप्पा मारायच्या नाहीत. तुम्हाला असा वॉक करायचा आहे की, बोलण्यास अडचण होईल. वयानुसार हा स्पीड वेगवेगळा असू शकतो.
हृदयासाठी जिम योग्य ठरेल का?
अनेकांना प्रश्न पडत असेल की, हृदयासाठी जिमला जाणं योग्य ठरेल का? तर जिम बॉडी बिल्डींगसाठी ठीक आहे. जिमचा हृदयाला तसा काही फार फायदा होत नाही. जेव्हा तुम्ही जिममध्ये जाऊन वजन उचलता तेव्हा मसल्स बनतात. पण अनेक जास्त एक्सरसाईज केल्यानं किंवा जास्त वजन उचलल्यानं हृदयाला फायदा होण्याऐवजी हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो.
हृदयासाठी बेस्ट एक्सरसाईज
हृदयासाठी बेस्ट एक्सरसाईज कोणत्या याबाबत सांगायचं तर ब्रिस्क बॉक, एरोबिक्स, स्वीमिंग, सायकलिंग, रनिंग या एक्सरसाईज बेस्ट ठरतात. या एक्सरसाईज करून हृदय मजबूत होतं. रोज वॉक करणं सुद्धा हृदय निरोगी ठेवण्यासाठी पुरेसं आहे. तुम्ही जर रोज 40 मिनिटांपेक्षा जास्त ब्रिस्क वॉक करत असाल तर हृदयासोबतच तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळेल.