lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > "माझ्यासोबत फोटो काढायचा तर ...", मिलिंद सोमणने चाहत्यांसमोर ठेवली एक वेगळीच अट, बघा तुम्ही पुर्ण करू शकता का?

"माझ्यासोबत फोटो काढायचा तर ...", मिलिंद सोमणने चाहत्यांसमोर ठेवली एक वेगळीच अट, बघा तुम्ही पुर्ण करू शकता का?

Milind Soman's Demand: आता मिलिंद सोमणसोबत फोटो- सेल्फी काढायचा असेल, तर त्याच्या चाहत्यांना एवढं करावंच लागेल. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2023 02:28 PM2023-01-17T14:28:22+5:302023-01-17T14:29:26+5:30

Milind Soman's Demand: आता मिलिंद सोमणसोबत फोटो- सेल्फी काढायचा असेल, तर त्याच्या चाहत्यांना एवढं करावंच लागेल. 

Do you want selfie with Milind Soman? then fulfill his 1 demand of 10 push ups and take photo with him | "माझ्यासोबत फोटो काढायचा तर ...", मिलिंद सोमणने चाहत्यांसमोर ठेवली एक वेगळीच अट, बघा तुम्ही पुर्ण करू शकता का?

"माझ्यासोबत फोटो काढायचा तर ...", मिलिंद सोमणने चाहत्यांसमोर ठेवली एक वेगळीच अट, बघा तुम्ही पुर्ण करू शकता का?

Highlightsबघा आता तुम्हालाही कुठे मिलिंद सोमण दिसला आणि तुम्हालाही त्याच्यासोबत फोटो- सेल्फी घेण्याची इच्छा झाली, तर त्याची एवढी अट पुर्ण करावीच लागेल... 

मॉडेल- अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman).. बस्स नाम ही काफी है. सध्या तो ५६ वर्षांचा आहे. पण तरीही त्याचा फिटनेस (fitness), त्याची देहबोली एखाद्या तरुणालाही लाजवेल अशी आहे. म्हणूनच तर आजही वयाची साठी जवळ आली तरीही त्याची क्रेझ अजिबात कमी झालेली नाही. तो जिथे जातो, तिथे त्याच्याभोवती गर्दी होतेच होते. आता मिलिंदसारखा मॉडेल, अभिनेता समोर दिसला की कुणालाही त्याच्यासोबत फोटो (photo- selfie with Milind Soman) काढावा वाटतोच.. पण त्याच्यासोबत फोटो काढायचा असेल, सेल्फी घ्यायचा असेल तर त्यासाठी मिलिंदची एक इच्छा (Milind Soman's Demand) मात्र पुर्ण करावी लागते. बघा नेमकी काय इच्छा आहे त्याची. 

मिलिंद सोमण कमालीचा फिटनेस प्रेमी आहे हे त्याच्या चाहत्यांना माहिती आहेच. फिटनेस जपण्यासाठी तो व्यायाम आणि आहार या दोन्ही गोष्टी जिवापाड सांभाळतो. कितीही व्यस्त शेड्यूल असलं तरी त्यात त्याचा सहसा खंड पडत नाही. फिटनेस जनजागृतीसाठी तो दरवर्षी सायकल रॅलीही करत असतो.

 

त्यात त्याची पत्नी अंकिता काेंवारही त्याला साथ देते. सोशल मिडियाच्या माध्यमातूनही तो त्याच्या चाहत्यांना नेहमीच फिटनेससाठी मोटिव्हेट करत असतो.

फॅटबर्न करण्यासाठी करिना कपूर बघा किती अवघड व्यायाम करतेय, व्हिडिओ व्हायरल.... 

अशा या फिटनेस प्रेमी अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांसमोर एक भन्नाट अट ठेवली आहे. तो म्हणतो की तो सगळ्यांसोबत फोटो काढायला तयार आहे. पण त्यासाठी प्रत्येकाला १० पुशअप्स मात्र काढाव्या लागतील. 

 

या विषयीचे त्याचे व्हिडिओ सोशल मिडियावरही व्हायरल झाले आहेत. समोरचा चाहता महिला असो अथवा पुरुष.

कोणतेही क्रिम लावले तरी तळपायाच्या भेगा जातच नाहीत? करून बघा हा खास उपाय, तळपाय होतील मुलायम

प्रत्येकाने आपल्या तब्येतीला थोडे गांभिर्याने घ्यावे, व्यायाम करावा आणि प्रत्येकामध्ये स्वत:च्या फिटनेसबाबत थोडी जागृती यावी, यासाठी त्याचा हा प्रयत्न आहे. बघा आता तुम्हालाही कुठे मिलिंद सोमण दिसला आणि तुम्हालाही त्याच्यासोबत फोटो- सेल्फी घेण्याची इच्छा झाली, तर त्याची एवढी अट पुर्ण करावीच लागेल... 

 

 

Web Title: Do you want selfie with Milind Soman? then fulfill his 1 demand of 10 push ups and take photo with him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.