सगळ्यांच्याच स्वंयपाकघरात कढीपत्ता असतो. कढीपत्ता फोडणीत घातल्यानंतर पदार्थाला एक उत्तम चव येते. कढीपत्त्याशिवाय वरण, भाजी असो किंवा कोणताही तिखट पदार्थ अजिबात चवच येत नाही. कढीपत्ता फक्त स्वंयपाकातच नाही अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरतो (How To Eat Curry Leaves For Weight Loss). आयुर्वेदात कढीपत्त्याच्या सेवनाला खास महत्व आहे. त्यात असलेले अल्कलॉईट शरीराची चरबी कमी करण्यास मदत करतात. याशिवाय यामुळे मेटाबॉलिझ्म सुधारण्यासही मदत होते. कढीपत्ताच्या वापर अनेक प्रकारे तुम्ही आहारात करू शकता. (Curry Leaves For Weight Loss)
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन्सच्या रिपोर्टनुसार कढीपत्त्यात असलेले महानिम्बिन नावाचे अल्कलाऑईड एंटी ओबेसिटी गुणधर्म दाखवतात. हे घटक शरीरातील लिपिल लेव्हल कमी करण्यास आणि हाय फॅट डाएटमुळे वाढणारे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. कढीपत्त्याचे सेवन केल्यानं शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित राहते. तेव्हा चयापचन क्रिया सुधारते आणि वजन कमी करणं सोपं होतं. मोलेक्युलर न्युट्रिशन एण्ड फूड रिसर्चमधील अभ्यासानुसार कढीपत्त्यातील फिनोलिक्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात. तणाव कमी झाल्यामुळे शरीरातील बेसल मेटाबॉलिक रेट वाढतो जो कॅलरी जाळण्यासाठी अत्यंत आवश्यक असतो. (Ref)
कढीपत्त्याचा चहा किंवा काढा
वजन कमी करण्यासाठी कढीपत्त्याच्या चहा सर्वात प्रभावी मानला जातो. हा उपाय करण्यासाठी १० ते १२ कढीपत्त्याची पानं धुवून एक ग्लास पाण्यात उकळवून घ्या. पाणी अर्ध होईपर्यंत व्यवस्थित उकळू द्या. त्यात थोडं मध आणि लिंबू पिळून सकाळी रिकाम्या पोटी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर निघण्यास मदत होते. याशिवाय पचनक्रिया वेगानं होण्यास मदत होते.
पानं चावून खा
जर तुम्हाला चहा करायला वेळ नसेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी ५ ते ७ ताजी आणि कोवळी पानं नीट चावून खा. पानं चावून खाल्ल्यानं त्यातील पोषक घटक थेट लाळेसोबत मिसळतात. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळ नियंत्रित राहते आणि भूक लागत नाही.
कढीपत्ता आणि ताक
दुपारच्या जेवणानंतर ताकामध्ये कढीपत्त्याची पानं वाटून किंवा बारीक करून प्या. कढीपत्ता आणि ताक दोन्ही पचनासाठी उत्तम आहेत. हे मिश्रण शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते.
Web Summary : Curry leaves aid weight loss by reducing body fat and boosting metabolism. Consume them in tea, buttermilk, or raw to control cholesterol, improve digestion, and burn calories effectively. Studies show curry leaves contain anti-obesity properties that help manage weight and reduce oxidative stress.
Web Summary : करी पत्ता शरीर की चर्बी कम करके और मेटाबॉलिज्म को बढ़ाकर वजन घटाने में मदद करता है। कोलेस्ट्रॉल को नियंत्रित करने, पाचन में सुधार और कैलोरी को प्रभावी ढंग से जलाने के लिए उन्हें चाय, छाछ या कच्चे रूप में सेवन करें। अध्ययनों से पता चलता है कि करी पत्ता में एंटी-ओबेसिटी गुण होते हैं जो वजन को प्रबंधित करने और ऑक्सीडेटिव तनाव को कम करने में मदद करते हैं।