काही लोक व्यायामाच्या बाबतीत खूप काटेकोर असतात. त्यामुळे अगदी वॉकिंग, जाॅगिंग किंवा रनिंग असा कोणताही व्यायाम असला तरी ते ट्रॅक सूट, स्पोर्ट्स शूज अशा पेहरावातच घराबाहेर पडतात. हे अगदी योग्यच आहे. पण वॉकिंगसाठी पायाला सोयीस्कर असावेत म्हणून अगदी महागडे बूट घेतले जातात आणि वर्षानुवर्षे तेच वापरले जातात, हे मात्र अगदी चुकीचं आहे. कारण हे बुटही योग्य वेळी बदललं जाणं खूप गरजेचं आहे. महाग आहेत म्हणून कितीतरी दिवस तेच बूट घालण्याची चूक करत असाल तर त्याचा आरोग्यावर निश्चितच वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच ते बूट बदलून टाकण्याची योग्य वेळ कोणती ते पाहा...
व्यायामासाठी आणलेले बूट बदलण्याची योग्य वेळ कोणती?
जर तुम्ही अगदी नियमितपणे वॉकिंग, रनिंग असे व्यायाम करत असाल तर अगदी ९ ते १० महिन्यातच तुमचे बूट बदलायला हवेत. कारण रोजच्या वापरामुळे त्या बुटांचं कुशनिंग कमी कमी होत जाते.
अक्षय तृतीयेला आमरस करण्याआधी लक्षात ठेवा ४ टिप्स, रस होईल मस्त- खा मनसोक्त
त्यामुळे मग रनिंग, वॉकिंग करताना तळव्यांवर खूप जोर येतो. यामुळे मग पोटऱ्या, गुडघे, घोटे, तळपाय दुखू लागतात. व्यायाम करूनही आपल्याला त्रास का होतो आहे, तेच कळत नाही. कारण यासाठी आपले बूट जबाबदार असतात आणि आपण ती गोष्ट लक्षातच घेत नाही.
डॉक्टर असंही सांगतात की तुमचा बूट कितीही महागडा असला तरी साधारण ५०० ते ७०० किमी चालणं त्याने झालं असेल तर तो बदलायलाच हवा.
बूट घातल्यानंतर त्याच्यातलं कुशनिंग कितपत खराब झालेलं आहे, हे आपल्या लक्षात येतंच. त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि बुटांसाठी खर्च झालेले थोडके पैसे वाचविण्यासाठी हाडांचं कायमचं दुखणं मागे लावून घेऊ नका.
Web Summary : Replace walking shoes every 9-10 months or after 500-700 km to prevent foot pain. Worn cushioning causes strain, leading to injuries. Don't prioritize saving money over foot health; replace shoes regularly.
Web Summary : पैर दर्द से बचने के लिए हर 9-10 महीने या 500-700 किमी के बाद चलने वाले जूते बदलें। घिसा हुआ कुशनिंग तनाव का कारण बनता है, जिससे चोटें लगती हैं। पैर के स्वास्थ्य से ऊपर पैसे बचाने को प्राथमिकता न दें; नियमित रूप से जूते बदलें।