Energy Giving Juice : आपल्याला सकाळी झोपेतून जागे झाल्यापासून दिवसभर थकवा किंवा कमजोरी जाणवते का? जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर आज आम्ही आपल्याला काही असे पौष्टिक ज्यूस सांगणार आहोत, जे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतल्यास तुमची एनर्जी लेव्हल वाढवू शकतात. पोषक तत्वांनी भरलेले हे ज्यूस आपल्या एकूणच तब्येतीसाठीही फायदेशीर असतात.
आवळ्याचा ज्यूस
आयुर्वेदात आवळ्याला पोषणाचा खजिना मानलं जातं. थकवा आणि कमजोरी दूर करण्यासाठी आंवळ्याचा ज्यूस पिणं खूप फायदेशीर ठरतं. हा ज्यूस प्यायल्यानंतर आपल्याला ताजेतवानेपणा आणि ऊर्जा जाणवेल. तसेच, आवळ्याचा ज्यूस तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यातही मदत करतो.
संत्र्याचा ज्यूस
संत्र्याच्या ज्यूसमध्ये व्हिटामिन सोबतच इतरही अनेक पोषक तत्व असतात. कमजोरी कमी करण्यासाठी संत्र्याचा ज्यूस एक उत्तम पर्याय ठरतो. हा ज्यूस हृदयाच्या आजारांचा धोका देखील कमी करण्यास मदत करतो आणि फायबर यात भरपूर असल्यानं पचन तंत्रही चांगलं राहतं. तसेच त्वचेला देखील अनेक फायदे मिळतात.
बीटाचा ज्यूस
कमजोरी कमी करून ऊर्जा वाढवण्यासाठी बीटाचा ज्यूस उत्कृष्ट मानला जातो. बीटाचे सेवन केल्याने केवळ रक्तातील हिमोग्लोबिन वाढत नाही, तर शरीरातील अनेक त्रासांपासूनही मुक्ती मिळते. बीटाचा ज्यूस शरीर डिटॉक्सिफाय करण्याचे काम करतो आणि हृदय व मेंदूच्या आरोग्यासाठीही लाभदायक ठरतो.
हे सर्व ज्यूस नैसर्गिक पोषक तत्वांनी भरलेले आहेत. जर तुम्ही दररोज यापैकी एक ज्यूस योग्य प्रमाणात घेतला, तर काही दिवसांतच तुमची कमजोरी दूर होईल आणि शरीरात नवीन ऊर्जा संचारेल.