पायऱ्या चढणे हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग असतो, परंतु तुम्हाला माहीत आहे का की, हा एक उत्तम व्यायाम देखील असू शकतो. दररोज १० हजार पावलं चालणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जात असताना, एका नवीन रिसर्चमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, पायऱ्या चढणं हा एक प्रभावी आणि वेगवान पर्याय असू शकतो.
एथेरोस्क्लेरोसिस या मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाठीमध्ये ४.५ लाख लोकांवर रिसर्च करण्यात आला. या रिसर्चमध्ये असं आढळून आलं की दिवसाला जवळपास ५० पायऱ्या चढल्याने हृदयविकाराचा धोका २०% कमी होतो. रिसर्चमध्ये असंही सांगण्यात आलं की, पायऱ्या चढण्याची सवय आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
पायऱ्या चढणं प्रभावी का आहे?
पायऱ्या चढण्यासाठी चालण्यापेक्षा जास्त ऊर्जा लागते कारण ते शरीराला गुरुत्वाकर्षणाच्या विरूद्ध गोष्ट करण्यास सांगतं. हे उंचीवर चढण्यासारखं मानलं जातं, हाय-कॅलरी बर्न एक्सरसाईज आहे. पायऱ्या चढणं फायदेशीर का आहे? हे जाणून घेऊया...
वेगाने कॅलरी बर्न
पायऱ्या चढल्याने चालण्यापेक्षा जास्त कॅलरी बर्न होतात. वजन कमी करण्यासाठी हा एक प्रभावी पर्याय आहे.
मसल्स मजबूत
हा व्यायाम क्वाड्स, हॅमस्ट्रिंग्स, ग्लूट्स आणि कोर मसल्सना टार्गेट करतो. यामुळे मसल्स मजबूत होतात.
कार्डिओ वर्कआऊट
पायऱ्या चढल्याने हृदयाचे ठोके वाढतात, जे एक उत्कृष्ट कार्डिओ वर्कआउट म्हणून काम करतं. त्यामुळे सहनशक्ती वाढण्यास मदत होते.
पायऱ्या चढण्याचे फायदे
- हृदयाचं आरोग्य सुधारतं
- वजन कमी करण्यास मदत होते
- स्नायूंची ताकद वाढते
- कॅलरीज लवकर बर्न होतात