Fitness Tips : आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांसाठी स्वत:ची काळजी घेणं एक आव्हान बनलं आहे. फिट राहण्यासाठी हेल्दी डाएटसोबतच नियमितपणे व्यायाम करणं सुद्धा गरजेचं असतं. पण बिझी लाइफस्टाईलमुळे सगळ्यांना व्यायामासाठी वेळ मिळतो असं नाही. अशात तब्येत तर बिघडतेच, सोबतच वजनही वाढू लागतं.
जंक फूड, फास्ट फूड खाण्यासोबतच लोक एक सुस्त लाइफस्टाईल फॉलो करतात. ज्यामुळे शरीरात वेगवेगळे आजार घर करतात. तुम्हालाही हे आजार टाळायचे असतील आणि फिट रहायचं असेल तर जिममध्ये तासंतास घाम गाळण्याची काहीच गरज नाही. एक छोटीशी सवय लावूनही तुम्ही फिट राहू शकता.
फिट राहण्यासाठीची ही छोटीशी सवय म्हणजे पायऱ्या चढणं. पायऱ्या चढणं तुमच्या हृदयासाठी आणि एकंदर आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. जर तुम्ही दिवसभरात 15 मिनिटात किंवा 50 पायऱ्या चढत असाल तर अनेक आजारांचा धोका कमी होऊ शकतो. अशात पायऱ्या चढून काय फायदे मिळतात हे जाणून घेऊया.
पायऱ्या चढण्याचे फायदे
हृदयरोगाचा धोका होतो कमी
आजकाल लोकांची लाइफस्टाईल अशी झाली आहे की, त्यांना हृदयारोगांचा धोका अधिक होत आहे. अशात तुम्ही नियमितपणे पायऱ्या चढून हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी करू शकता. मेडिकल न्यूज टूडेनुसार, रिसर्चमधून समोर आलं आहे की, जे लोक एका दिवसात 50 पायऱ्या चढतात, त्यांना हृदयरोगांचा धोका पायऱ्या न चढणाऱ्या लोकांच्या तुलनेत 20 टक्के कमी असतो.
मसल्स होतात मजबूत
पायऱ्या चढल्यानं मसल्स मजबूत होतात. पायऱ्या चढण्यासाठी सरळ चालण्यापेक्षा जास्त मेहनत करावी लागते. कारण पायऱ्या चढताना तुम्ही केवळ शरीराची हालचाल करत नाही तर शरीर ग्रॅविटीच्या विरूद्ध घेऊन जात आहात. असं केल्यानं लोअर बॉडी आणि पाठीच्या खालच्या भागात स्नायू तयार होतात.
बर्न होतात कॅलरी
तसेच पायऱ्या चढून तुम्ही वजन कमी करू शकता आणि कंट्रोलमध्ये ठेवू शकता. पायऱ्या चढून किती कॅलरी बर्न होतात, हे तुमच्या वजनावर अवलंबून असेल, पण पायऱ्यानं खाली उतरल्यास प्रति तासात 175 ते 275 कॅलरी बर्न होतात. तर पायऱ्या चढून गेल्यास प्रति तासात 530 ते 835 कॅलरी बर्न करू शकता.
हाडं होतात मजबूत
हाडांसाठी सुद्धा पायऱ्या चढणं खूप फायदेशीर ठरतं. यानं हाडं मजबूत राहतात आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोकाही कमी होतो. सोबतच पायऱ्या चढल्यानं पायांची शक्ती वाढते आणि स्नायू मजबूत होतात.
निरोगी राहतं शरीर
लिफ्टऐवजी नियमितपणे पायऱ्यांचा वापर केला तर यानं हृदय आणि फुप्फुसंची कार्यक्षमता वाढते. तसेच ब्लड सर्कुलेशनही सुधारतं. एका शोधानुसार, पायऱ्या चढल्यानं तुम्ही अनेक आजारांचा धोका कमी करू शकता. जसे की, कोरोनरी हार्ट डिजीज, हाय ब्लड प्रेशर,डायबिटीस आणि कोलन कॅन्सर इत्यादी.