Join us

मलायका अरोरासारखा ‘वॉरियर’ व्यायाम जमेल? बघा तिचा फिटनेस आणि जबरदस्त पोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2022 16:21 IST

Malaika Arora Fitness Secret मलायका आपल्या आरोग्याची नियमित काळजी घेते. सध्या तिच्या वॉरियर-पोज 2 या योगाची चर्चा होत आहे, या योगाचे फायदे किती..पाहा

बॉलिवूडमधील सिझलिंग हॉट अभिनेत्री मलायका अरोरा ही फिटनेस फ्रिक आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत राहतात. ती जीमसह योगा देखील करते. वयाच्या ४९ व्या वर्षी देखील ती फिट आणि तंदुरस्त दिसते. मलायकाने अनेक मुलाखतींमध्ये तिच्या आयुष्याच्या निगडीत अनेक चढ उताराबद्दल सांगितले. जेव्हा ती मानसिक दृष्ट्या खचली होती तेव्हा तिने योगाकडे आपली पावलं वळवली. मलायका शरीर आणि मन स्थिर ठेवण्यासाठी योगा करते. योगाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवते आणि नियमितपणे इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसाठी योगाचे व्हिडिओ शेअर करते.

मलायका नियमितपणे आपले योगाचे गिरवलेले धडे सोशल मिडीयावर शेअर करत असते. विविध आसने करतानाचे व्हिडिओ सोशल मिडीयावर चर्चेत येतात. दिवा योगाच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलने नुकतंच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात मलायका वॉरियर-2 पोज करताना दिसून येत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये मालायाकाने वॉरियर-2 पोज कसे करायचे हे दाखवले. या योगामुळे आरोग्याच्या निगडीत अनेक स्वास्थ्य फायदे मिळतात. हे नितंब, कंबर आणि खांद्याचे स्नायू ताणण्यास मदत करते. वॉरियर -2 पोज छाती आणि फुफ्फुस उघडण्यास आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यास मदत करतात. उत्तम रक्ताभिसरण, श्वासोच्छ्वास, संतुलन आणि स्थिरता असे अनेक फायदे हा योग केल्यामुळे मिळते. हे शरीराला ऊर्जा देण्यास आणि पाठदुखीची लक्षणे कमी करण्यास मदत करतात.

टॅग्स :मलायका अरोराफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सलाइफस्टाइल