Metabolic Disease : पायी चालण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं चालण्याचे वेगवेगळे फायदेही मिळतात. फिटनेससाठी काही लोक रोज हळुवार पायी चालतात तर काही लोक वेगानं चालतात. चालण्यानं वजन कमी करण्यास मदत मिळते. मात्र, सायन्टिफीक रिपोर्ट्स जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, वेगानं चालण्याचा लठ्ठपणामध्ये मेटाबॉलिक आजारांचा धोका कमी केला जाऊ शकतो. जपानमध्ये दोशीशा विश्वविद्यालयातील अभ्यासकांनी केलेल्या रिसर्चमध्ये लठ्ठपणानं ग्रस्त व्यक्तीमध्ये चालण्याचा स्पीड आणि मेटाबॉलिक डिजीज यांचा संबंध आढळला आहे.
काय सांगतो रिसर्च?
रिसर्चच्या निष्कर्षात सांगण्यात आलं आहे की, या गोष्टींचं आकलन करा की, एखादी व्यक्ती आपल्या साथीदारांच्या तुलनेत आपल्या चालण्याची गती कशी समजतो. ही बाब आरोग्यासाठी महत्वाची ठरू शकते.
विश्वविद्यालयातील प्राध्यापक कोजिरो इशी म्हणाले की, "या रिसर्चनं हे स्पष्ट केलं आहे की, लठ्ठपणानं ग्रस्त मेटाबॉलिक डिजीजनं ग्रस्त व्यक्ती आपल्या चालण्याचा स्पीड अधिक ठेवत असतील तर त्यांना हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि डिस्लिपिडेमियाचा धोका कमी असतो".
स्पीडनं चालल्यास मेटाबॉलिक डिजीजचा धोका कमी
रिसर्चनुसार, जे व्यक्ती वेगानं चालतात ते जास्त फिट असू शकतात आणि त्यांच्या मेटाबॉलिक आजारांचा धोकाही कमी असतो. अभ्यासकांच्या टीमने सांगितलं की, स्पीडनं चालल्यानं कार्डिओ रेस्पिरेटरी सिस्टीम चांगलं राहतं, सोबतच सूज आणि ऑक्सिडेटिव स्ट्रेस लेव्हलही कमी होते. जे मेटाबॉलिक आजारांची दोन मुख्य कारणं आहेत.
या रिसर्चमध्ये लठ्ठपणानं ग्रस्त ८,५७८ व्यक्ती, मोठी कंबर असलेल्या ९,६२६ व्यक्ती आणि दोन्ही मापदंड पूर्ण करणाऱ्या ६,७४२ व्यक्तींच्या चालण्याच्या स्पीडचं विश्लेषण करण्यात आलं.
डायबिटीस आणि हाय बीपीचा धोका कमी
निष्कर्षातून समोर आलं की, जे लोक स्पीडनं चालत होते, त्यांच्यात डायबिटीसचा धोका खूप कमी होता आणि हाय ब्लड प्रेशर व डिस्लिपिडेमियाचाही कमी होता.
डॉ. इशी यांनी सांगितलं की, "स्पीडनं चालण्याला प्रोत्साहन देणं एक फायदेशीर इंडिव्हिज्युअल बिहेवियर असू शकतं, जे मेटाबॉलिकसंबंधी आजार रोखण्यासाठी मदत करू शकतं. हे खासकरून लठ्ठपणाने ग्रस्त व्यक्तींच्या कामात येऊ शकतं".