Join us  

Breast sagging : स्तन ओघळू नयेत म्हणून करायचे 4 व्यायाम, परफेक्ट फिगरचा सोपा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 3:41 PM

Breast sagging : ब्रेस्टला सुडौल आणि फर्म ठेवण्यासाठी कूपर लिगामेंट फायदेशीर ठरतं. ज्यावेळी हे लिगामेंट सैल होते तेव्हा महिलांची ब्रेस्ट लटकू लागते.

ठळक मुद्देदैनंदिन जीवनातील अनेक कारणं असू शकतात. ज्यामुळे शरीर बेढब दिसतं. स्तनांचा आकार चांगला दिसण्यासाठी योग्य आकाराची ब्रा वापरायला हवी, वजन नियंत्रणात ठेवावं, योग्य डाएट, रोज व्यायाम करणं आवश्यक आहे. 

वाढत्या वयात महिलांच्या शरीरात अनेक बदल होत जातात. शरीराची फारशी हालचाल नसेल किंवा आहार व्यवस्थित घेत नसाल तर शरीराचा आकार बेढब दिसू लागतो. वाढत्या वयात महिलांना ब्रेस्ट सॅगिंग म्हणजेच लटकत असलेले स्तन ही समस्या जाणवते. ब्रेस्टला सुडौल आणि फर्म ठेवण्यासाठी कूपर लिगामेंट फायदेशीर ठरतं. ज्यावेळी हे लिगामेंट सैल होते तेव्हा महिलांची ब्रेस्ट लटकू लागते. या व्यतिरिक्त दैनंदिन जीवनातील अनेक कारणं असू शकतात. ज्यामुळे शरीर बेढब दिसतं. स्तनांचा आकार चांगला दिसण्यासाठी योग्य आकाराची ब्रा वापरायला हवी, वजन नियंत्रणात ठेवावं, योग्य डाएट, रोज व्यायाम करणं आवश्यक आहे. 

१) चेअर डिप एक्सरसाईज

हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला एखादी खुर्ची किंवा बेंचची आवश्यकता असेल. खुर्ची किंवा बेंचच्या किनारी बसा त्यानंतर आपले  हात खुर्चीवरच्या टोकाला पकडा. त्यानंतर हिप्स बाहेर घेऊन संपूर्ण शरीर खाली घेऊन जा आणि पुन्हा वर या. हा व्यायाम प्रकार करताना तुम्हाला हातांचा वापर करावा लागेल. या व्यायाम प्रकारानं स्तन व्यवस्थित आणि वेल शेप्ड राहण्यास मदत होते. 

२) सुपरमॅन पोज

हा व्यायाम खूप सोपा व्यायाम आहे. यासाठी सर्वप्रथम आपण पोटावर पडून रहा. आता आपले हात पुढे आणा आणि पाय मागे सरकवा. यानंतर, आपले हात वर पसरवा आणि त्याच ओळीत पाय वरच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. ही स्थिती सुपरमॅन सारखी दिसली पाहिजे. यात शरीराचे स्नायू ताणले जातात. यामुळे आपले स्तन अधिक मजबूत होऊ शकतात.

३) धनुरासन पोज

या व्यायामप्रकारात मुद्रा धनुष्याप्रमाणे असते. म्हणून या व्यायाम प्रकाराला धनुष पोज असं म्हणतात. या व्यायाम प्रकारानं स्तन चांगले दिसण्यास मदत होते. याशिवाय धनुरासन नियमित केल्यानं अस्थमाचा त्रास कमी होतो. धनुरासन करण्यासाठी पोटावर झोपा त्यानंतर गुडघ्यांना वाळून पोटाजवळ आणण्याचा प्रयत्न करा.  त्यानंतर हातांचा वापर करून पायांना पकडण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत  ३० सेकंद राहिल्यानंतर पुन्हा आपल्या स्थितीत या. जवळपास ५ वेळा हा व्यायामप्रकार करण्याचा प्रयत्न करा.

४) पुशअप्स

भिंतीच्या मदतीने आपण करु शकता असा पहिला व्यायाम म्हणजे वॉल ट्रायसेप पुशअप्स. या व्यायाम प्रकारानं चेस्ट मसल टोन होण्यास मदत होईल. या व्यायामासाठी, आपल्याला भिंतीपासून हाताच्या अंतरावर उभे रहावे लागेल आणि नंतर भिंतीच्या दिशेने हात वाकवा. आपल्या शरीराला मागील बाजूस ढकला. आपल्याला आपले गुडघे मागे वाकणे आवश्यक नाही. जर तुम्हाला अधिक इफेक्टिव्हरित्या हा व्यायाम करायचा असेल तर तुम्ही भितींपासून लांब उभे राहू शकता. या ४ व्यायामामुळे आपण  स्तनांच्या सैल त्वचेपासून सुटका मिळवू शकता. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्समहिला