आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाकडेच जिमला जायला वेळ असतोच असं नाही. बाहेर जाऊन व्यायाम करणं किंवा एक्टिव्ह राहणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. अभिनेत्री आणि फिटनेस इन्फ्युएंसर भाग्यश्री (Bhagyashree) ही सिनेसृष्टीपासून दूर असली तर सोशल मीडियावर मात्र काय एक्टिव्ह असते. वयाच्या ५६ व्या वर्षीही ती तरूण दिसते. (Bhagyashree Shares Quick Home Workout For Weight Loss)
भाग्यश्री केवळ एकाच प्रकारच्या व्यायामावर अवलंबून न राहता विविध प्रकारचे व्यायाम करते. तिचा असा विश्वास आहे की तुम्ही जे खाता तसंच दिसता. त्यामुळे तिचा आहारात अत्यंत संतुलित असतो. ती हॉटेलमधले पदार्थ खाण्याऐवजी घरी केलेलं अन्न खाण्यास प्राधान्य देते. वजन कमी करण्यासाठी आणि ऊर्जा टिकवण्यासाठी ती तिच्या दिनचर्येत ब्लॅक कॉफीमध्ये तूप किंवा बटर घालून घेतलेली बुलेटप्रुफ कॉफी पिते.
ती आपल्या चाहत्यांना फिटनेस टिप्स देत असते. भाग्यश्रीनं अलिकडेच शेअर केलेल्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये एक सोपं वर्कआऊट रूटीन सांगितलं आहे. हे रूटीन तुम्ही घरच्याघरी फॉलो करू शकता. भाग्यश्रीच्यामते जेव्हा तुम्ही सुट्टीवर असता तेव्हा जीममध्ये वेळ न घालवता तुम्ही काही सोपे व्यायाम घरीच करून स्वत:ला फिट ठेवू शकता. काही व्यायाम केल्यानं तुमच्या तब्येतीला बरेच फायदे मिळतील. याशिवाय शरीर टोन्ड दिसण्यासही मदत होईल.
पोहे कधी गचके कधी खूप कोरडे होतात? ६ चुका टाळा, मऊसूत, चविष्ट होतील बटाटे पोहे
रिव्हर्स लंज विथ फ्रंट रोस
हा व्यायाम तुमचे ग्लुट्स, क्वाड्स आणि हॅमस्ट्रिंग मसल्सासाठी उत्तम आहे. या व्यायामुळे पाठ, खांदे आणि हातही मजबूत राहतात. रिव्हर्स लंग्स विद फ्रंट रोस हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला दोन्ही हातात डम्बेल्स पकडावे लागतील. एक पाय मागच्या बाजूला ठेवून लंजेस हा व्यायाम करताना जी स्थिती असते तसे उभे राहा. या व्यायामानं स्ट्रेंथ वाढण्यासही मदत होईल.
थंडीत भाकरी खावी पण दुपारच्या जेवणात की रात्रीच्या? कधी भाकरी खाल्ल्यानं जास्त फायदा होतो..
लंजेंस वॉक्स वॉक
हा व्यायाम तुमच्या शरीराच्या खालच्या भागाला मजबूत बनवतो आणि शरीराची स्थिती सुधारतो. हा व्यायाम करण्याासठी डंबल एका हातात पकडा. नंतर पाय पुढच्या बाजूला घेऊन पुन्हा लंजेसच्या स्थितीत या. व्हिडिओमध्ये भाग्यश्री हा व्यायाम करताना दिसून येत आहे. २० रॅपिटेशन्समध्ये ३ सेट्स केल्यास कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग पूर्ण होण्यास मदत होईल.
