Join us

चरबीमुळं जाड झालेल्या मांड्यांची सोडा आता चिंता, रोज करा ‘हे' एक्सरसाईज मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 18:10 IST

Reduce Thigh Fat : जर तुमच्याही मांड्यांवर फॅट वाढलं असेल आणि ते तुम्हाला कमी करायचं असेल तर आम्ही यासाठी तुम्हाला काही परफेक्ट एक्सरसाईज सांगणार आहोत.

Reduce Thigh Fat : सामान्यपणे वाढलेल्या वजनामुळं महिला जास्त वैतागलेल्या असतात. जास्तीत जास्त महिलांना मांड्यांवर वाढलेल्या फॅटची सुद्धा अधिक चिंता असते. मांड्यांवर फॅट वाढल्यानं वाईटही दिसतं आणि उठणं, बसणं, चालण्यासही समस्या होते. मांड्यांवरील फॅट कमी करणं काही सोपं काम नाही. पण नियमितपणे व्यायाम आणि पौष्टिक आहारानं मांड्यांवरील फॅट कमी करता येतं. जर तुमच्याही मांड्यांवर फॅट वाढलं असेल आणि ते तुम्हाला कमी करायचं असेल तर आम्ही यासाठी तुम्हाला काही परफेक्ट एक्सरसाईज सांगणार आहोत. या एक्सरसाईज अशा आहेत ज्या तुम्ही नियमितपणे केल्या तर मांड्यांवरील फॅट महिनाभरात कमी होईल. 

१) धावणं

मांड्यांवरील फॅट कमी करण्यासाठी धावणं ही सगळ्यात बेस्ट एक्सरसाईज मानली जाते. धावल्यानं पायांच्या मांसपेशी वेगानं मजबूत होतात. पण ज्या लोकांना गुडघ्याची समस्या आहे, त्यांनी ही एक्सरसाईज हळुवार करावी. जास्त वेगानं धावल्यास गुडघ्याची समस्या वाढू शकते. 

२) जंपिंग जॅक

जंपिंग जॅक मांड्यांवरील फॅट कमी करण्यास मदत करते. ही एक्सरसाईज करण्यासाठी हवेत उडी घ्या आणि हात पायांपासून दूर करा. ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा. १० ते २० मिनिटं रोज ही एक्सरसाईज केली तर काही दिवसात तुम्हाला फरक दिसू लागेल. 

३) थाय प्रेस

थाय फेस्टिवल एक प्रभावी एक्सरसाईज आहे. ज्याद्वारे मांड्यांवरील फॅट कमी करता येतं. यूट्यूबवर या एक्सरसाईजचे अनेक व्हिडीओ तुम्ही बघू शकता. ही एक्सरसाईज जर तुम्ही रोज १५ ते २० मिनिटं केली तरी फायदा मिळेल. 

४) सूमो स्क्वाट्स

सूमो स्क्वाट्स करताना या गोष्टीची काळजी घ्या की, तुम्ही सरळ उभे रहा आणि शरीर एकाच पोजीशनमध्ये असावं. जर चुकीच्या पद्धतीनं एक्सरसाईज कराल तर वेगळी समस्या होऊ शकते. या पोजीशनमध्ये रोज १५ ते २० मिनिटं एक्सरसाईज केल्यास मांड्यांवरील फॅट वेगानं कमी होईल.

५) ब्रिस्क वॉक

मांड्यांवरील फॅट कमी करण्यासाठी ही सगळ्यात सोपी पद्धत मानली जाते. ब्रिस्क वॉक म्हणजे वेगानं चालणं. या एक्सरसाईजनं मांड्यांना शेप मिळतो. सोबतच ब्रिस्क वॉकनं मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. ज्यामुळे शरीरातील फॅट वेगानं कमी होण्यास मदत मिळते. 

६) पायऱ्या चढणं-उतरणं

मांड्यांवरील फॅट कमी करण्याची आणखी एक सोपी पद्धत म्हणजे पायऱ्या चढणं आणि उतरणं. रोज रात्री झोपण्याआधी १० ते १५ मिनिटं पायऱ्या चढा आणि उतरा. यानं मांड्यांवरील फॅट कमी होण्यास मदत मिळेल. सोबतच शरीरात ब्लड सर्कुलेशनही सुरळीत होईल आणि हार्ट रेटही चांगला राहतो.

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामवेट लॉस टिप्स