Join us

पायऱ्या चढण्या-उतरण्याचे मिळतात एकापेक्षा एक फायदे, जिममध्ये जाण्याची पडणार नाही गरज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 16:57 IST

Benefits of Climbing Stairs: ही एक अशी एक्सरसाईज आहे, ज्यासाठी फार वेळही लागत नाही आणि यानं वेगानं कॅलरी बर्नही होतात.

Benefits of Climbing Stairs : आजकाल बऱ्याच लोकांकडे एक्सरसाईज करण्यासाठी वेळ नसतो किंवा त्यांची ईच्छा नसते. तसेच काही लोक कामाच्या वाढत्या ताणामुळे फिटनेसची योग्य ती काळजी घेत नाहीत. अशात आम्ही तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही फिटही राहू शकता आणि सोबतच हृदयरोग, ब्लड प्रेशर कंट्रोल आणि डायबिटीसचा धोकाही कमी करू शकता. हा उपाय म्हणजे पायऱ्या चढणं-उतरणं. १० मिनिटे पायऱ्या चढणं-उतरणं केलं तर तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. 

१० मिनिटं पायऱ्या चढा-उतरा

जर तुमच्याकडे जिममध्ये जाऊन अर्धा तास कार्डिओ एक्सरसाईज करण्याचा वेळ नसेल तर तुम्ही तुमच्या घरात १० ते १५ मिनिटं हाय इन्टेन्सिटीने पायऱ्या चढूनही कॅलरी बर्न करू शकता. ही एक अशी एक्सरसाईज आहे, ज्यासाठी फार वेळही लागत नाही आणि यानं वेगानं कॅलरी बर्नही होतात. पायऱ्या चढल्यानं मांड्या, पोट आणि पायांच्या मांसपेशी मजबूत होतात. सोबत फॅट बर्नही होतं.

हृदयासाठी फायदेशीर

एक्सपर्टनुसार, पायऱ्या चढल्यानं ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं आणि सोबतच गुड कोलेस्टेरॉलचं प्रमाणही शरीरात वाढतं. ज्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळेल.

मानसिक आरोग्य चांगलं राहतं

पायऱ्या चढणं आणि उतरणं ही एक हाय इन्टेन्सिटी एक्सरसाईज असते आणि कोणतीही फिजिकल एक्सरसाईज केल्यानं मेंदुमध्ये हॅप्पी हार्मोन रिलीज होतात व मडू चांगला राहतो.

डायबिटीस कंट्रोल

पायऱ्या चढणं आणि उतरण्यानं ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहते आणि याने मेटाबॉलिज्म वाढतं. ज्यामुळे डायबिटीसचा धोका कमी केला जाऊ शकतो.

फप्फुसांसाठी फायदेशीर

पायऱ्या चढणं-उतरणं केल्यानं फुप्फुसांची क्षमता वाढते आणि श्वसन तंत्रही चांगलं राहतं. ज्यामुळे श्वसनांसंबंधी समस्याही होत नाहीत. इतकंच नाही तर पायऱ्या चढल्या-उतरल्यानं एनर्जी लेव्हलही वाढते आणि थकवा दूर होतो.

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामहेल्थ टिप्स