बॉलीवूड अभिनेत्री सोहा अली खान अतिशय फिटनेस फ्रिक आहे. फिट राहण्यासाठी ती खूप मेहनत घेते, वेगवेगळे वर्कआऊट करते. त्याविषयीचे काही फोटो आणि व्हिडिओही ती सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. खाण्यापिण्याच्या बाबतीतही ती अगदी काटेकोर आहे. आता नुकताच तिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून यामध्ये ती कच्चा लसूण चावून चावून खाताना दिसत आहे. तो खाताना लसणाचा तिखटपणा सहन होत नसल्याने डोळ्यात पाणी येतेय, लसणाच्या उग्रपणामुळे ती अगदी लाल- गुलाबी झालेली दिसते आहे. पण तरीही तिने तिचा टास्क पुर्ण केला (Soha Ali Khan's Viral Video of Eating Raw Garlic). ती असं का करते हे जाणून घेतलं तर तुम्हीही अगदी उद्यापासूनच हा उपाय सुरू कराल..(benefits of eating raw garlic on empty stomach)
उपाशीपोटी कच्चा लसूण खाण्याचे फायदे
१. उपाशीपोटी कच्चा लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत. आपल्याकडे खूप पुर्वीपासून कच्चा लसूण खाण्याचे महत्त्व सांगितले गेले आहे. सोहा अली खान म्हणते कच्चा लसूण उपाशीपोटी खाणे अधिक चांगले. यामुळे शरीरावरील सूज म्हणजेच inflammation कमी होते. याशिवाय पचनक्रिया, चयापचय क्रियाही अधिक चांगल्या होतात.
नेहमीच थकवा येतो- रोजची कामंही उरकत नाहीत? डॉक्टर सांगतात ३ कारणं आणि सोपे उपाय
२. कच्चा लसूण खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. लसूण उष्ण असतो. त्यामुळे या दिवसांत सर्दी, खोकला असे त्रास टाळण्यासाठी नियमितपणे लसूण खाणे फायदेशीर ठरते.
३. लसूण उष्ण असल्याने तो जर उपाशीपोटी कच्चा चावून खाल्ला तर सांधेदुखीसारखा त्रासही कमी होतो.
४. लसूणामध्ये मँगनीज, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन C, सेलेनियम, फायबर, सल्फर, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह यासारखे घटक भरपूर प्रमाणात असतात.
घरकाम करून हात खरखरीत झाले- काळवंडून गेले? फक्त १० मिनिटांचा उपाय- हात होतील मऊ
५. लसणामध्ये ॲलिसिन नावाचे एक कंपाऊंउ असते. वेगवेगळ्या संशोधनामधून त्याचे जे फायदे समोर आलेले आहेत ते पाहून त्याला magic compound असं म्हटलं जातं. कारण ॲलिसिन कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास, बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी करण्यात आणि कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठीही मदत करते.