Join us
Daily Top 2Weekly Top 5

ना तासभर, ना अर्धा तास रोज फक्त २ मिनिटं करा प्लँक, महिलांसाठी वरदानच ठरेल हा सोपा व्यायाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 10:00 IST

How to Do a Plank: प्लँक हा एक फार सोपा, कमी वेळ करता येणारा आणि घरीच करता येणारा व्यायाम आहे. पण याचे फायदे मात्र अनेक आहेत. तेच आपण जाणून घेणार आहोत.

How to Do a Plank:  जे लोक जिममध्ये जातात त्यांना गाइड करण्यासाठी तिथे ट्रेनर असतो, पण जे लोक घरीच व्यायाम करतात त्यांना अनेकदा प्रश्न पडतो की, कोणता व्यायाम कशासाठी करावा? त्यामुळे आज आम्ही आपल्यासाठी २ मिनिटांच्या एका खास व्यायामाची माहिती घेऊन आलो आहोत. हा व्यायाम म्हणजे प्लँक. प्लँकने स्नायू मजबूत होतात. महत्वाची बाब म्हणजे हा व्यायाम करण्यासाठी आपल्याला फार जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. कारण हा एक फार सोपा, कमी वेळ करता येणारा आणि घरीच करता येणारा व्यायाम आहे. पण याचे फायदे मात्र अनेक आहेत. तेच आपण जाणून घेणार आहोत.

प्लँक करण्याचे फायदे

प्लँकने पोटाचे स्नायू टार्गेट होतात. नियमितपणे प्लँकने अॅब्स टोन होतात, सोबतच पोटाच्या आतील स्नायू देखील मजबूत होतात. 

जर आपण डेस्ट जॉब करत असाल तर प्लँक आपल्यासाठी वरदान ठरू शकतो. याने मणक्यावर जास्त जोर टाकता कोर मजबूत होतो. ज्यामुळे पाठीच्या खालच्या भागात होणाऱ्या वेदना दूर होतात.

रोज फक्त काही मिनिटे प्लँक केल्याने हाडं आणि जॉइंट्सची अलायन्मेंट सुधारते. रोज प्लँक केल्याने शरीराचं संतुलन योग्य राहतं.   

प्लँक एक्सरसाईनमध्ये आपल्या शरीराची हालचाल होत नाही. पण याने इतर कोणत्याही एक्सरसाईजपेक्षा जास्त कॅलरी बर्न होतात. तसेच याने आपला मेटाबॉलिक रेटही सुधारतो.   

प्लँकने शरीराच्या मागच्या बाजूचे स्नायू जसे की, कॉलरबोन, कांधे आणि पोटऱ्यांमध्ये लवचिकता वाढते. हे अवयव आणखी मजबूत होतात.  

तसेच प्लँक व्यायामाने कोअर मजबूत झाल्यामुळे कंबरदुखीचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. प्लँक करताना शरीराला स्थिर ठेवण्यासाठी ताकद आणि सहनशक्ती वाढते. 

लठ्ठपणा किंवा पोट वाढण्याची समस्या अनेकांना असते. जर नियमितपणे प्लँक कराल तर बाहेर आलेलं पोट आत जाईल आणि आपण स्लीम फिट दिसाल.

कसा कराल हा व्यायाम?  

 

प्लँकची सुरूवात करत असाल तर कमी वेळ म्हणजे २ ते ३ मिनिटे ठेवा. नंतर हळूहळू सवय होईल, सहनशक्ती वाढेल आणि आत्मविश्वास वाढेल तेव्हा वेळ वाढवत रहा. एकाचवेळी जास्त वेळ व्यायाम करू नका. थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घेत २ ते ३ वेळा हा व्यायाम सहज करू शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Just 2 minutes of plank daily: A boon for women.

Web Summary : Plank strengthens muscles, tones abs, and improves posture. It alleviates back pain, enhances flexibility, burns calories, and aids weight loss. Start slowly and gradually increase duration.
टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामहेल्थ टिप्स