>फिटनेस > बेंड इट लाइक आलिया भट! कपोतासन करण्याची योग्य पद्धत सांगतेय आलिया, जबरदस्त बॅलन्स

बेंड इट लाइक आलिया भट! कपोतासन करण्याची योग्य पद्धत सांगतेय आलिया, जबरदस्त बॅलन्स

बॉलीवूडची हॉट गर्ल आलिया भट आणि तिच्या फिटनेसची नेहमीच चर्चा असते. आलियाने नुकताच तिचा एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला असून अतिशय अवघड असणारे कपोतासन कसे करायचे, याची योग्य पद्धतही तिने सांगितली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 01:28 PM2021-09-15T13:28:05+5:302021-09-15T13:29:39+5:30

बॉलीवूडची हॉट गर्ल आलिया भट आणि तिच्या फिटनेसची नेहमीच चर्चा असते. आलियाने नुकताच तिचा एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला असून अतिशय अवघड असणारे कपोतासन कसे करायचे, याची योग्य पद्धतही तिने सांगितली आहे.

Bend it like bollywood actress Alia Bhatt! Alia tells you the right way to do Kapotasana or a pigeon pose, great balance | बेंड इट लाइक आलिया भट! कपोतासन करण्याची योग्य पद्धत सांगतेय आलिया, जबरदस्त बॅलन्स

बेंड इट लाइक आलिया भट! कपोतासन करण्याची योग्य पद्धत सांगतेय आलिया, जबरदस्त बॅलन्स

Next
Highlightsआलियाने एका रिंगच्या साहाय्याने कपोतासन केले आहे.ज्यांना नियमितपणे व्यायाम करण्याची सवय असते, अशाच व्यक्ती कपोतासन योग्यप्रकारे करू शकतात.

आलिया भट सोशल मिडियाद्वारे तिच्या चाहत्यांना नेहमीच फिटनेसबाबत मोटीव्हेट करत असते. जीम एक्सरसाईज असो किंवा मग योगासन, आलिया प्रत्येक व्यायामप्रकार अतिशय मनापासून करते आणि तिच्या चाहत्यांनाही तसाच संदेश देते. आलियाने नुकताच तिचा एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये तिने योगामधील अवघड आसनांपैकी एक समजले जाणारे कपोतासन केले आहे. ज्यांना नियमितपणे व्यायाम करण्याची सवय असते, अशाच व्यक्ती कपोतासन योग्यप्रकारे करू शकतात. कपोतासनाला पिजन पोज असेही म्हणतात. 

 

कपोतासन करताना सर्वप्रथम पाठीवर झोपावे लागते आणि आपले शरीर पुर्णपणे वर उचलून हळूहळू आतल्या बाजूने बेंड करावे लागते. हा प्रकार अतिशय अवघड असून जर तुम्हाला बेंड करण्याची योग्य पद्धत माहिती असेल, तरच हे आसन जमू शकते. आलियाने हे आसन अतिशय उत्तम प्रकारे केले तिची आसन अवस्था पाहून अनेकजण अवाक झाले आहेत. आलियाने एका रिंगच्या साहाय्याने कपोतासन केले आहे. 'progress over perfection' अशी कॅप्शन तिने या फोटाेसाठी दिली आहे. 

 

कपोतासन करण्याची योग्य पद्धत
१. सगळ्यात आधी वज्रासनात बसावे. त्यानंतर गुडघ्यावर उभे रहावे. 
२. यानंतर तळहाताने तळपाय पकडण्याचा प्रयत्न करावा.
३. हळूहळू मान मागे वळवून संपूर्ण शरीरच मागच्या बाजूने झुकविण्याचा प्रयत्न करावा. 
४. डोके जमिनीवर टेकवावे. आता हळूहळू कंबर उचलण्याचा प्रयत्न करावा. हे करताना तळपाय आणि तळहात जुळले जातील, याचीही काळजी घ्यावी.
५. चक्रासनामध्ये तळहात आणि तळपाय यावर शरीराचा तोल सावरायचा असतो, तर कपोतासन करताना हाताचे कोपरे, डोके आणि गुडघे हे शरीराचा तोल सावरण्यासाठी मदत करतात. 

 

कपोतासन करण्याचे फायदे
१. मणक्यासाठी हा अतिशय उत्तम व्यायाम प्रकार आहे.
२. पोटावरची चरबी कमी करून शरीर सुडाैल ठेवण्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय उपयुक्त ठरताे. 
३. सायटिकाचा त्रास असणाऱ्यांनी कपोतासन करावे.
४. मुत्र मार्ग आणि प्रजनन संस्थेशी संबंधित काही समस्या असल्या तर कपोतासन करण्याचा सल्ला दिला जातो. 
५. दंड, मांड्या, कंबर आणि पोट येथील मांसपेशी मजबूत होण्यासाठी कपोतासन अतिशय उपयुक्त ठरते. 

 

Web Title: Bend it like bollywood actress Alia Bhatt! Alia tells you the right way to do Kapotasana or a pigeon pose, great balance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.