Lokmat Sakhi >Fitness > पाठ आणि मान सारखी दुखते ? औषध घेण्याची वेळच येणार नाही, रोज दहा मिनिटे करा 'या' गोष्टी

पाठ आणि मान सारखी दुखते ? औषध घेण्याची वेळच येणार नाही, रोज दहा मिनिटे करा 'या' गोष्टी

Back and neck ache? do these things for ten minutes every day, Fitness tips : पाठ आणि मान दुखत असेल तर करा हे उपाय. आराम मिळवा घरच्याघरी. औषधांची गरजच नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2025 18:38 IST2025-07-14T18:36:02+5:302025-07-14T18:38:00+5:30

Back and neck ache? do these things for ten minutes every day, Fitness tips : पाठ आणि मान दुखत असेल तर करा हे उपाय. आराम मिळवा घरच्याघरी. औषधांची गरजच नाही.

Back and neck ache? do these things for ten minutes every day, Fitness tips | पाठ आणि मान सारखी दुखते ? औषध घेण्याची वेळच येणार नाही, रोज दहा मिनिटे करा 'या' गोष्टी

पाठ आणि मान सारखी दुखते ? औषध घेण्याची वेळच येणार नाही, रोज दहा मिनिटे करा 'या' गोष्टी

पाठदुखी आणि मानदुखी ही आजकालच्या धावपळीच्या जीवनातील एक सामान्य तक्रार आहे. सतत संगणकासमोर बसून काम करणे, बसताना चुकीच्या पद्धतीने बसण्याची सवय तसेच शारीरिक हालचालींचा अभाव आणि तणाव यामुळे पाठ आणि मान या अवयवांवर ताण येतो. (Back and neck ache?  do these things for ten minutes every day, Fitness tips)ही दुखणी सुरुवातीला किरकोळ वाटली तरी दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास ती गंभीर स्वरूपाची होऊ शकतात. म्हणूनच, दररोज काही सोपी योगासने आणि स्ट्रेचिंग प्रकार केल्यास ही दुखणी कमी होण्यास आणि शरीर लवचिक राहण्यास मदत होते.

काही साधी सोपी आसने करा. भुजंगासन हे आसन करताना पोटावर झोपायचे आणि दोन्ही हातांच्या मदतीने शरीराचा वरचा भाग हळूहळू वर उचलायचा. या प्रक्रियेत पाठ वाकवायची म्हणजे स्नायूंना आराम मिळतो. यामुळे पाठदुखी हळूहळू कमी होते. दुसरे उपयुक्त आसन म्हणजे मर्कटासन. हे करताना आपण पाठीवर झोपायचे आणि गुडघे वाकवून छातीकडे ओढायचे. नंतर डावीकडे व उजवीकडे झोका द्यायचा. या हालचालीमुळे पाठ व कंबर भागातील ताण कमी होतो.

मानदुखीसाठी गोमुखासन अतिशय फायदेशीर ठरते. यात एक हात डोक्यावरून मागे न्यायचा आणि दुसरा खालून घेऊन दोन्ही हात मागे पाठीवर मिळवण्याचा प्रयत्न करायचा. या प्रक्रियेत खांदे आणि मानेतील स्नायूंना एक चांगला ताण दिला जातो. हे एक साधे बसून केलेले आसन आहे. मानेसाठी स्ट्रेचिंग देखील उपयुक्त ठरते. मानेला एका बाजूला हळूहळू वळवणे, खाली झुकवणे आणि वर उचलणे यामुळे मानेतील स्नायूंना आराम मिळतो आणि रक्ताभिसरण सुधारते.

शवासन करण्याला आपण झोपणेच समजतो.मात्र तसे नसून वासन फार फायद्याचे आसन आहे. पाठ दुखीवर रामबाण उपाय आहे. फक्त हे शांत अवस्थेतील आसन सर्व आसनानंतर करायचे. ह्या आसनाद्वारे शरीराला संपूर्ण विश्रांती मिळते आणि मानसिक तणावदेखील दूर होतो. शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी दररोज हे आसन व स्ट्रेचिंग प्रकार सातत्याने करणे गरजेचे आहे. तसेच, कामाच्या वेळेत थोडा वेळ विश्रांती घेणे गरजेचे असते. स्क्रीनवर पाहताना मान योग्य उंचीवर ठेवणे आणि झोपेची योग्य स्थिती राखणे या सर्व बाबीही पाठदुखी आणि मानदुखी कमी करण्यास महत्त्वाच्या ठरतात.

Web Title: Back and neck ache? do these things for ten minutes every day, Fitness tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.