सतत वाढत जाणारे वजन, पोटाची ढेरी, जाडजूड शरीर, शरीराचा बदलता आकार या समस्यांमुळे सध्या बरेचजण हैराण आहेत. वाढत्या वजनामुळे अनेकांना आपले वजन कसे कमी (Ayurvedic Herb Ginger Infused Water Can Reduce Belly & Overall Body Fats) करायचे याची (Health Benefits of Ginger Water) चिंता लागून राहते. वजन कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करुन पाहतो. वेटलॉस करण्यासाठी आपण (drinking Ginger water melt belly fat) एक्सरसाइज व डाएट करतोच, परंतु याचबरोबर आपण इतरही अनेक लहान - मोठे उपाय देखील (Ginger Water For Weight Loss) करून पाहतोच. या घरगुती उपायांमध्ये आपण वेटलॉससाठी वेगवेगळ्या प्रकारचे डिटॉक्स वॉटर तयार करून पितो(How Ginger Fights Body Fat, Obesity).
डिटॉक्स वॉटर पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे पाणी शरीरातून विषारी घटक (toxins) बाहेर टाकण्यास मदत करते आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत करते. डिटॉक्स वॉटरममध्ये, आपण लिंबू, काकडी, आले किंवा दालचिनी यांसारखे विविध पदार्थ घालतो ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. डिटॉक्स वॉटर तयार करताना इतर पदार्थांपेक्षा त्यात आलं घालणं अधिक फायदेशीर ठरते. आल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी बाहेर टाकली जाऊन आरोग्य सुधारते आणि वजन कमी करण्यास देखील मदत होते. आल्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असून ते चयापचय क्रियेचा वेग वाढवण्यास मदत करते. त्यामुळे शरीरातील चरबी वेगाने वितळते आणि शरीराला आवश्यक उर्जा मिळते. त्यामुळेच आले हे अनेक सेलिब्रिटीजच्या डिटॉक्स आणि वेट लॉस प्लॅनचा महत्त्वाचा भाग आहे. शिल्पा शेट्टी, सारा अली खान, तापसी पन्नू याबरोबरच अनेक सेलिब्रिटीज अभिनेत्री कायम स्वतःला मेंन्टेन ठेवण्यासाठी त्यांच्या दिवसाची सुरुवात आल्याचे पाणी पिऊनच करतात. वजन कमी करण्यासाठी आल्याचे पाणी कसे फायदेशीर ठरते ते पाहूयात.
वजन कमी करण्यासाठी आल्याचे पाणी...
जर पोटाची चरबी आणि वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करूनही अपेक्षित परिणाम मिळत नसेल तर एक सोपा आणि नैसर्गिक उपाय करणे फायदेशीर ठरू शकते, हा उपाय म्हणजे आल्याचे पाणी पिणे. आले हे औषधी गुणधर्मांनीयुक्त असून, ते चयापचय क्रियेचा वेग वाढवून शरीरातील साचलेली चरबी वितळवण्यास मदत करते. विशेषतः पोटाच्या आसपासची चरबी कमी करण्यासाठी आलं फायदेशीर मानले जाते. याचेच महत्त्व लक्षात घेऊन शिल्पा शेट्टीसारख्या अनेक अभिनेत्री त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत आल्याच्या पाण्याचा समावेश करतात. त्यांच्या फिटनेस आणि त्वचेच्या चमकदारपणामागे हा साधा उपायसुद्धा एक महत्त्वाची भूमिका बजावतो.
व्यायामाला वेळ नाही? महिलांनो, 'या' ३ पद्धतीने रोज चाला-लोक विचारतील वजन कमी करण्याचं सिक्रेट...
वेगवेगळ्या रिसर्चमधून असेही दिसून आले आहे की यामुळे तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे तुम्ही जास्त खाण्यापासून वाचता आणि वजन कमी होते. आल्याचे पाणी पिण्याने शरीराचे वजन आणि कंबर लक्षणीयरीत्या कमी होते.
शरीराच्या नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेला चालना देण्याची क्षमता असल्यामुळे अनेक लोक आल्याचे पाणी पिणे पसंत करतात. हे पाणी शरीरातील अनावश्यक कचरा व विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते, विशेषतः लिव्हर आणि आतड्यांमधील सफाईसाठी ते उपयुक्त मानले जाते. त्यामुळे शरीर स्वच्छ, हलके होऊन पुन्हा ऊर्जा मिळण्यास मदत होते.
आयुर्वेदिक डॉक्टर दिक्षा भावसार सावलिया यांच्या मते, आपण दिवसभर कधीही आल्याचे पाणी पिऊ शकतो. त्यांच्या एका पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केले की दिवसभर आले मिसळलेले पाणी पिल्याने पोटातील जळजळ कमी होते आणि चयापचय सुधारतो, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी 'असं' प्या पाणी, वजन होईल झरझर कमी - तब्येत राहील ठणठणीत...
वेटलॉससाठी मध आणि दालचिनी करतात जादू, वजन होईल झरझर कमी - करुन पाहा हा खास उपाय...
आल्याचे पाणी घरी सहज तयार करता येते. यासाठी १ लिटर पाणी घ्या, त्यात फक्त अर्धा चमचा सुके आले घाला आणि ते पाणी ७५० मिली होईपर्यंत उकळवून घ्यावे. गॅस मध्यम आचेवर ठेवून हळुहळु पाणी आटवून घ्यावे.
आल्याचं पाणी पिण्याचे फायदे :-
१. पचन सुधारते :- आल्यामध्ये असलेल्या एंजाईम्समुळे पचनक्रिया सुलभ होते आणि अपचन, गॅस, पोट फुगणे यांसारख्या समस्या कमी होतात.
२. डिटॉक्स :- आल्याचं गरम पाणी शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करतं.
३. वजन कमी करण्यास मदत :- चयापचय क्रियेचा वेग (Metabolism) वाढवून फॅट बर्निंग प्रक्रिया जलद करते.
४. इम्युनिटी वाढवते :- आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
५. त्वचेला चमकदारपणा येतो :- त्वचा निरोगी, चमकदार आणि नॅचरल ग्लोइंग दिसते.