Join us

उपाशीपोटी मॉर्निंग वॉकला जाणं म्हणजे आजारपण घरी घेऊन येणं! चुकूनही करु नका 'या' ५ गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2025 14:59 IST

Avoid These Mistakes While Walking On An Empty Stomach : Do not do these 5 mistakes while walking on an empty stomach : उपाशी पोटी मॉर्निंग वॉक करताना कोणत्या चुका करु नयेत, ते पाहा...

सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉक करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आपल्यापैकी बरेचजण मॉर्निंग वॉक करताना शक्यतो उपाशी पोटीच वॉकिंग करतात. असं म्हटलं जात की, उपाशी पोटी मार्निंग वॉक (Walking Tips) केल्याने त्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. उपाशी पोटी मॉर्निंग वॉक केल्याने (Avoid These Mistakes While Walking On An Empty Stomach) शरीर डिटॉक्सिफाय तर होतेच याशिवाय चयापचय सुधारण्यास आणि दिवसभर शरीर सक्रिय ठेवण्यास देखील मदत करते(Do not do these 5 mistakes while walking on an empty stomach).

परंतु आपल्यापैकी बरेचजण उपाशी पोटी मॉर्निंग वॉक करताना अनेक लहान - मोठ्या चुका करतात, ज्यामुळे फायद्याऐवजी नुकसानच होते. जर आपण देखील उपाशी पोटी मॉर्निंग वॉक करत असाल तर आपल्याला देखील काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. सकाळी उपाशी पोटी मॉर्निंग वॉक केल्याचे दुप्पट फायदे आपल्या शरीराला मिळावे यासाठी कोणत्या लहानसहान चुका टाळाव्यात ते पाहूयात. 

उपाशी पोटी मॉर्निंग वॉक करताना 'या' ५ चुका करु नका... 

१. पाणी न पिता मॉर्निंग वॉक करणे :- रिकाम्या पोटी मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी पाणी न पिण्याने शरीर डिहायड्रेट होऊ शकते. चालताना आपल्या शरीराला घाम येतो, ज्यामुळे आपल्या शरीरात इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता निर्माण होऊ शकते आणि यामुळे अशक्तपणा जाणवू शकतो. काहीजणांना मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी चहा, कॉफी पिण्याची सवय असते. परंतु रिकाम्या पोटी कॅफिन घेणे आपल्या शरीराला हानिकारक ठरु शकते. यामुळे ॲसिडिटी किंवा डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. यासाठीच मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी कॅफिन ऐवजी कोमट पाणी किंवा लिंबू पाणी पिणे हा उत्तम पर्याय ठरु शकतो. 

२. मॉर्निंग वॉक नंतर लगेच हेव्ही नाश्ता करणे :- मॉर्निंग वॉक करुन आल्यानंतर लगेच खूप हेव्ही किंवा तेलकट अन्नपदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. यामुळे पोट फुगणे, अपचन आणि ॲसिडिटी सारख्या समस्या होऊ शकतात. मॉर्निंग वॉक नंतर लगेच हेव्ही नाश्ता न करता नेहमी हलका आणि निरोगी नाश्ता करणे गरजेचे असते. 

जमिनीवर झोपा! मऊमऊ गादीवर झोपण्यापेक्षा जमिनीवर झाेपण्याचे फायदे अनेक, पाठदुखीलाही आराम...

३. खूप वेळ चालणे :- रिकाम्या पोटी बराच वेळ चालल्याने शरीरात ऊर्जेचा अभाव निर्माण होऊ शकतो. यामुळे थकवा, डोकेदुखी आणि रक्तातील साखर कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. यासाठीच, मॉर्निंग वॉक किती वेळ करावा याची एक योग्य वेळ ठरवा. दिवसांतून किमान ३० ते ४५ मिनिटे मॉर्निंग वॉक करणे देखील फायदेशीर ठरु शकते. 

४. खूप वेगाने किंवा अनियमित गतीने चालणे :- रिकाम्या पोटी खूप वेगाने चालणे किंवा वारंवार वेग बदलणे यामुळे आपल्या हृदयाची गती असंतुलित होऊ  शकते आणि आपल्याला लवकर थकवा येऊ शकतो. यासाठीच मध्यम गतीने चालणे सर्वात फायदेशीर ठरेल. 

ऑफिसमध्ये एकाच जागी बसून मांड्या जाडजूड झाल्या ? करा 'ही' ४ योगासनं, मांड्यांची चरबी घटेल लवकर...

५. रिकाम्या पोटी हाय-इंटेन्सिटी वॉक करणे:- रिकाम्या पोटी वेगाने धावणे, चढणे किंवा अधिक जलद गतीने चालणे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे आपले शरीर अधिक थकू शकते आणि उर्जेचा अभाव निर्माण होऊ शकतो. यासाठीच रिकाम्या पोटी हाय-इंटेन्सिटी वॉक करणे शक्यतो टाळावेच. 

उपाशी पोटी मॉर्निंग वॉक करताना लक्षात ठेवा या गोष्टी... 

१. चालताना शरीराची योग्य स्थिती असणे खूप महत्वाचे आहे. चुकीच्या पद्धतीने वाकणे किंवा खूप वेगाने चालणे यामुळे कंबर, मान आणि गुडघ्यांवर दबाव येऊ शकतो.२. मॉर्निंग वॉक करताना, पाठीचा कणा सरळ ताठ ठेवा आणि जास्त पुढे किंवा मागे वाकणे टाळा.३. तुमचे खांदे आरामशीर ठेवा आणि तुमचे हात हलू द्या.४. तुमचे डोळे समोर ठेवा आणि जमिनीच्या दिशेने खाली जास्त वाकू नका.५. साधारणपणे ताशी ४ ते ५ किमी वेगाने चालणे, हा स्पीड उत्तम आहे. 

ऑफिसमधून दमून आल्यावर, सायंकाळी अंगात त्राण नसतात? थकवा फार? 'हा' उपाय करा, ५ मिनिटांत रिफ्रेश...

६. चालण्यासाठी ३० ते ४५ मिनिटे वेळ पुरेसा आहे.७. मॉर्निंग वॉक झाल्यानंतर, लगेच बसू नका, तर ५ ते १० मिनिटे हलके स्ट्रेचिंग करा.८. झोपेतून उठल्यानंतर लगेच फिरायला जाऊ नका, त्याऐवजी १० ते १५ मिनिटांचा ब्रेक घ्या. या काळात, वॉर्म-अप करा जेणेकरून स्नायू सक्रिय होतील आणि शरीर मॉर्निंग वॉकसाठी तयार होईल.९. रिकाम्या पोटी मॉर्निंग वॉक करण्यात काही नुकसान नाही, पण जर ते योग्यरित्या केले नाही तर ते नुकसान देखील करू शकते. म्हणून, उपाशी पोटी मॉर्निंग वॉक करताना वरील टिप्स लक्षात ठेवाव्यात.

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स