Running Speed : चालणं किंवा धावणं वजन कमी करण्यासाठी सगळ्यात सोप्या आणि प्रभावी एक्सरसाईज मानल्या जातात. या दोन्ही एक्सरसाईजनं केवळ वजन कमी होतं असं नाही तर पूर्ण शरीराला याचे फायदे मिळतात. मात्र, कोणतीही गोष्ट करण्याची एक योग्य पद्धत असते. जर ही पद्धत किंवा काही नियम फॉलो केले तरच या एक्सरसाईजचे फायदे मिळू शकतील. नुसतं धावून किंवा चालून काही होणार नाही. त्यात वेळ, स्पीड हे महत्वाचं ठरतं. वयानुसार धावण्याचा स्पीड किती असावा याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
नव्यानंच धावायला सुरू केली असेल तर लगेच जास्त वेळ आणि जास्त स्पीडनं धावण्याची चूक अजिबात करू नका. वयानुसार धावण्याची स्पीड किती असावी याबाबत एक्सपर्टनी नियम केले आहेत. जर स्पीड जास्त असेल किंवा कमी असेल तर काही शारीरिक समस्या होण्याचा धोकाही होऊ शकतो.
अलिकडेच मॅनहॅटनमध्ये लाइफ टाइम स्कायचे रनिंग कोच ग्यूसेप्पो कॅरोना यांनी एक मैल अंतर पार करण्यासाठी वयानुसार किती वेळ लागावा याबाबत सांगितलं. धावण्याचा तुमचा हा स्पीड तुमचं वय, लिंग, आहार यावर अवलंबून असला पाहिजे. अशात १ मैल अंतर कोणत्या वयाच्या लोकांनी किती मिनिटात पार करावं हे जाणून घेऊ.
कोणत्या वयात किती स्पीड?
२० ते ३० वयोगटातील पुरूषांनी १ मैल अंतर म्हणजे १.६ किलोमीटर अंतर ६.३७ मिनिटात तर महिलांनी ७.४९ मिनिटात पार करावं. ३० ते ४० वयोगटातील पुरूषांनी १ मैल अंतर ६.४७ मिनिटात, तर महिलांनी ७.४९ मिनिटात पार करावं. ४० ते ५० वयोगटातील पुरूषांनी १ मैल अंतर ७.१४ मिनिटात तर महिलांनी ८.१७ मिनिटात पार करावं. ५० ते ६० वयोटातील पुरूषांनी हेच अंतर ७.५० मिनिटात तर महिलांनी ९.११ मिनिटात पार करावं.
रनिंग कोट कॅरोना यांनी सांगितलं की, 'या स्पीडपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला आठवड्यातून ४ ते ५ वेळा रनिंग करावी लागेल. जर तुम्ही १ मैलही चांगल्या स्पीडनं धावू शकत नसाल तर तुमचं हृदय कमजोर झाल्याचं हे लक्षण आहे. तसेच तुम्हाला एकंदर आरोग्याची काळजी घ्यावी लागेल'.
'जर तुम्ही नव्या धावायला सुरूवात करत असाल तर दोन ते तीन मिनिटं धावणे आणि दोन मिनिटं चालणे अशी पद्धतही आलटून पालटून वापरू शकता. जर तुम्हाला रनिंग सुधारायची असेल तर चढ-उतार असलेले रस्ते निवडा. तसेच स्वीमिंग, सायकलिंग आणि वेगवेगळ्या एक्सरसाईज करा'.