Join us

शिल्पा शेट्टी करतेय तसे शीर्षासन जमेल का पहा; केसांच्या समस्या; टेन्शनवर उत्तम उपाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 17:58 IST

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने नुकताच तिच्या चाहत्यांसोबतच फिटनेस मंत्र शेअर केला आहे. यामध्ये शिल्पा शेट्टीने शीर्षासन करून दाखविले असून त्याचे अनेक फायदे समजावून सांगितले आहेत. 

ठळक मुद्देशीर्षासन हे सगळ्यात अवघड आसन आहे. त्यामुळे योगाभ्यासाचा चांगला सराव असल्याशिवाय शीर्षासन करणे जमत नाही. 

मलायका अरोराप्रमाणेच बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा ही देखील तिच्या चाहत्यांना मंडे फिटनेस मोटीव्हेशन देत असते. यामध्ये ती वेगवेगळी योगासने आणि त्यांचे आरोग्याला होणारे फायदे याविषयी माहिती देते. मध्यंतरी पती राज कुंद्रा यांच्या पोर्नोग्राफी प्रकरणामुळे शिल्पाच्या आयुष्यात मोठंच वादळ येऊन गेलं. यामुळे तिला खूप जास्त मानसिक त्रासही झाला. पण तरीही शिल्पा डगमगली नाही. योगा केल्यामुळे मी या कठीण परिस्थितीतही अतिशय शांत आणि संयमी राहू शकत आहे, हे शिल्पाने काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट टाकून शेअर केलं होतं. योगा से ही होगा... हा जणू काही शिल्पाचा फिटनेस मंत्रच आहे. असाच एक फिटनेस मंत्र शिल्पाने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यामध्ये तिने शीर्षासन करून दाखविले आहे. तसेच नियमित शिर्षासन करण्याचे अनेक फायदे देखील सांगितले आहेत.

 

कसं करायचं शीर्षासन?- शीर्षासन हे सगळ्यात अवघड आसन आहे. त्यामुळे योगाभ्यासाचा चांगला सराव असल्याशिवाय शीर्षासन करणे जमत नाही. - सगळ्यात आधी भिंतीसमोर दोन्ही पाय दुमडून वज्रासनात बसा. - यानंतर दोन्ही हात समोर जमिनीवर ठेवून भिंतीला चिकटवा. हातांची बोटे एकमेकांत अडकवा.- आता या बोटांच्या खोबणीत तुमचे डोके ठेवा. - हळूहळू पाय उचलण्याचा प्रयत्न करा. एकदम दोन्ही पाय उचलणे शक्य होणार नाही. त्यामुळे आधी एक पाय उचलून मग दूसरा पाय वर घ्या. - हे आसन करताना खूप एकाग्रता लागते. त्यामुळे लक्ष पुर्णपणे आसनावर केंद्रित केले तर निश्चितच शीर्षासन जमू शकते. - दोन्ही पाय वर उचलून भिंतीला लावा आणि पाय सरळ रेषेत ठेवण्याचा प्रयत्न करा. - खूप त्रास होत असल्यास शीर्षासन स्थिती लगेच सोडून टाका.- सुरुवातीला काही दिवस तज्ज्ञ व्यक्तीच्या समोरच शीर्षासन करावे. 

 

शीर्षासन करण्याचे अनेक फायदे१. मनावरचा ताणतणाव दूर होतो. नियमित शीर्षासन केल्यामुळे मेंदूला उत्तम रक्त पुरवठा होतो. त्यामुळे मनातली अस्वस्थता आपोआपच कमी होते. मन शांत होण्यास मदत होते. त्यामुळे जेव्हा केव्हा खूप निराश वाटेल किंवा मानसिक अस्वस्थता येईल, तेव्हा शीर्षासन करावे, असे तज्ज्ञ सांगतात. निद्रानाशाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनीही शीर्षासन करणे फायद्याचे ठरते. 

२. नजर चांगली होतेशीर्षासन केल्यामुळे डोळ्यांनाही चांगला रक्त पुरवठा होतो. रक्तपुरवठा चांगला झाल्यामुळे नजर चांगली होऊन डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहते. आजकाल मुलांना कमी वयात चष्मा लागत आहे. त्यामुळे मुलांनाही शीर्षासन करायला लावल्याने चांगला फायदा होतो.

 

३. खांदा आणि मानेला बळकटी मिळते खांदे, मान आणि हातांचे स्नायू बळकट करण्यासाठी शीर्षासन करणे फायदेशीर ठरते. हात आणि खांदे बळकट होतात. 

४. पचनशक्ती सुधारतेशीर्षासन करताना आपल्या शरीराची जी अवस्था होते, त्या अवस्थेत शरीरातील पाचक रस ॲक्टीव्ह होतात आणि पचन क्रिया सुधारतात. वारंवार ॲसिडीटी होणे किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यास शीर्षासन करावे, असे सांगितले जाते. 

 

५. केसांची चांगली वाढ होतेशीर्षासन केल्यामुळे मेंदू आणि डोक्याच्या त्वचेला चांगला रक्त पुरवठा होतो. जर स्काल्प म्हणजेच डोक्याच्या त्वचेला चांगला रक्त पुरवठा झाला, तर केसांचे आरोग्य सुधारते आणि केस गळती देखील कमी होते. त्यामुळे केसांच्या समस्येने त्रस्त असलेल्या प्रत्येकालाच शीर्षासन केल्याने फायदा होतो. अकाली केस पिकण्याची समस्याही शीर्षासन केल्यामुळे कमी होते. 

 

६. एकाग्रता वाढतेमुळात आपण जोपर्यंत मन एकाग्र करत नाही, तोपर्यंत आपल्याला शीर्षासन करता येत नाही. त्यामुळे शीर्षासन करताना आपोआपच मन एकाग्र करण्याची सवय लागते. अतिशय चंचल मन असणाऱ्या व्यक्तींनी तसेच विद्यार्थ्यांनी आवर्जून शीर्षासन करावे.

 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यशिल्पा शेट्टीयोग