Join us

सुपरफिट राहण्यासाठी अक्षय कुमार फॉलो करतो वडिलांनी सांगितलेला गोल्डन रुल! म्हणून दिसतो आजही तरुण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2025 18:22 IST

58 year old Akshay Kumar fitness secret : Akshay Kumar morning routine : सूरज के साथ उठो, फिट रहो! अक्षय कुमारच्या हेल्दी लाईफस्टाईलची गुरुकिल्ली....

सिनेमांमध्ये ॲक्शन सीन्स आणि स्टंट्ससाठी सुप्रसिद्ध असलेला अभिनेता अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वात शिस्तबद्ध आणि फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे वय वाढत असतानाही, त्याच्या एनर्जी आणि फिटनेसमध्ये तसूभरही कमतरता असल्याचे दिसून येत नाही. खिलाडी अक्षय कुमार वयाच्या ५८ व्या वर्षी देखील तितकाच फिट अँड फाईन आहे(Akshay Kumar morning routine).

या ही वयात अक्षय कुठलेही महागडे डाएट किंवा जिमला न जाता फक्त त्याच्या मॉर्निंग रुटीनमधील एक खास सवय न चुकता दररोज फॉलो करतोच, त्याच्या फिटनेसचे खरे सिक्रेट हे त्याच्या साध्यासोप्या मॉर्निंग रुटीनमध्येच दडलेलं आहे. अक्षय कुमारने नुकतेच टेलिव्हिजन शो 'आप की अदालत' या कार्यक्रमामध्ये, आपल्या फिटनेसचे खरेखुरे सिक्रेट शेअर केले आहे. सुपरफिट अभिनेता अक्षय कुमार (58 year old Akshay Kumar fitness secret) याच्या फिटनेसचा गोल्डन रुल नेमका काय आहे ते पाहूयात... 

वयाच्या ५८ व्या वर्षीही सुपरफिट आहे अक्षय कुमार... 

वयाच्या प्रत्येक टप्प्यावर अक्षय कुमारचा फिटनेस आणि त्याची तंदुरुस्ती पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं. त्याच्या या फिटनेससाठी, सकाळी सूर्योदय होण्याआधी उठून नियमित व्यायाम करण्याची सवय त्याला फायदेशीर ठरते. अक्षयच्या याच सवयीमुळे तो आजही तितकाच एनर्जेटिक व तंदुरुस्त आणि तरुण दिसतो. ज्यावेळी संपूर्ण जग झोपेत असते, तेव्हा अक्षय कुमार सूर्योदयासोबतच उठून आपल्या व्यायामाला सुरुवात करतो. ही फक्त त्याची एक सवयच नाही, तर त्याच्या लाईफस्टाईलचा एक अविभाज्य भाग आहे. अक्षय सांगतो की, माझ्या वडिलांनी मला सूर्योदयासोबतच उठण्याची सवय लावली आणि हीच सवय माझ्या लाईफस्टाईलचा भाग झाली. त्याच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकाने दिवसांतील ८ तास काम, ८ तास झोप याव्यतिरिक्त एक्सरसाइजसाठी २ तास देणे गरजेचे असते. 

‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्रा झाली ३ महिन्यांत सुपरफिट! परफेक्ट फिगरसाठी तिच्या ट्रेनरने सांगितले वेटलॉस सिक्रेट... 

वेटलॉससाठी तमन्ना भाटियाच्या ट्रेनरने दिल्या ५ टिप्स! झरझर वजन कमी होऊन फिगर दिसेल टोन्ड आणि सुंदर...

सूर्योदयासोबत पहाटे उठण्याचे आहेत अनेक फायदे... 

फिटनेस ट्रेनर आणि कन्सल्टंट डाएटिशियन गरिमा गोयल यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीनुसार, दररोज सूर्योदयासोबत उठणे, ही सवय आपल्या लाईफस्टाईलचा भाग केल्यास त्याचे अनेक शारीरिक फायदे मिळतात. सकाळचे ऊन शरीराच्या सर्कडियन रिदमला नियंत्रित करण्यास मदत करते, जे झोप, हार्मोन्स, चयापचय आणि मूड नियंत्रित करण्यास मदत करते. 

तज्ज्ञांनुसार, सकाळी उठल्यानंतर लगेच नैसर्गिक प्रकाशात गेल्याने मेलाटोनिन कमी होते, तसेच शरीरातील कोर्टिसोल आणि सेरोटोनिन वाढते, ज्यामुळे तुम्ही दिवसभर अधिक उत्साही, फ्रेश आणि अ‍ॅक्टिव्ह राहता.

वेटलॉस करण्यासाठी डाळी खाण्याच्या ३ पद्धती! योग्य प्रमाणात मिळेल प्रोटीन, वजन कमी होऊन व्हाल फिट... 

गरिमा गोयल यांनी सांगितले की, सकाळी लवकर उठण्याची सवय व्हिटॅमिन डीचे शोषण करण्यास मदत करते, ज्यामुळे हाडांची ताकद, रोगप्रतिकारशक्ती (Immunity) आणि सूज रोखण्यास मदत मिळते. कालांतराने, ही दिनचर्या झोपेची गुणवत्ता सुधारते, मूड स्थिर करते, पचनात सुधारणा करते आणि मेटाबॉलिक आरोग्यासाठी देखील मदत करते, ज्यामुळे आपले एकूण आरोग्य सुधारते आणि वजन देखील नियंत्रणात राहते.

सकाळच्या वेळी १० ते १५ मिनिटे सूर्यप्रकाशात उभे राहिल्याने, थेट सूर्यप्रकाश शरीराला संकेत देतो की आता दिवस सुरू झाला आहे. ही एक निरोगी दिनक्रमाची सुरुवात करण्याची चांगली सवय आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Akshay Kumar's father's golden rule for staying superfit and young.

Web Summary : Akshay Kumar, known for his fitness, follows his father's advice to wake up before sunrise. This routine, combined with dedicated exercise, keeps him energetic and youthful. Early morning sunlight helps regulate the body clock and improves overall health, contributing to weight management and well-being.
टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यअक्षय कुमार