Lokmat Sakhi >Fitness > थुलथुलीत-सुटलेल्या पोटामुळे शरीर बेढब दिसते? ५ जबरदस्त उपाय - पोटाची चरबी होईल झरझर कमी

थुलथुलीत-सुटलेल्या पोटामुळे शरीर बेढब दिसते? ५ जबरदस्त उपाय - पोटाची चरबी होईल झरझर कमी

5 Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life : बेली फॅट कमी करणारे ५ असरदार उपाय; पोट - पाठ दोन्ही होईल सपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2024 05:11 PM2024-06-14T17:11:19+5:302024-06-14T17:12:49+5:30

5 Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life : बेली फॅट कमी करणारे ५ असरदार उपाय; पोट - पाठ दोन्ही होईल सपाट

5 Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life | थुलथुलीत-सुटलेल्या पोटामुळे शरीर बेढब दिसते? ५ जबरदस्त उपाय - पोटाची चरबी होईल झरझर कमी

थुलथुलीत-सुटलेल्या पोटामुळे शरीर बेढब दिसते? ५ जबरदस्त उपाय - पोटाची चरबी होईल झरझर कमी

अनेक महिला सुटलेल्या पोटामुळे त्रस्त आहेत (Belly Fat). पोटाची चरबी वाढली की, शरीराचा आकार विचित्र दिसू लागतो. पोटाची चरबी वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात (Healthy Body). हार्मोनल असंतुलन आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसल्यामुळे महिलांचे वजन वाढत जाते. शिवाय लठ्ठपणामुळे गंभीर आजारांचा धोकाही वाढतो (Weight Loss). जेव्हा शरीरात इन्शुलीन सेंसिटिव्हीटी कमी होते.

तेव्हा शरीर उर्जेचा पुरेपूर वापर करण्यास कमी पडते. ज्यामुळे शरीर फॅट्स स्टोर करून ठेवते. पण यामुळे मधुमेह, थायरॉईड, हृदयविकार इत्यादींचा धोका वाढतो, याशिवाय पीसीओएस सारख्या समस्या उद्भवू शकतात. जर आपल्याला पोटाची चरबी कमी करायची असेल तर, क्लिनिकल पोषणतज्ज्ञ शिवाली गुप्ता यांनी सांगितलेल्या टिप्स फॉलो करून पाहा(5 Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life).

बेली फॅट कमी करण्यासाठी टिप्स

गरम पाणी प्या

सकाळची सुरुवात नेहमी कोमट पाणी पिऊन करा. याशिवाय दिवसभर कोमट पाणी पीत राहा. यामुळे शरीरातील अधिक कॅलरीज बर्न होण्यास मदत होईल. शिवाय पचनक्रिया सुधारेल आणि चयापचय बुस्ट होईल.

मुलांना ओरडलं की आईला फार अपराधी वाटतं, रडू येतं? मॉम गिल्टचं करायचं काय?

व्यायाम करा

वजन कमी करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रीय राहणं गरजेचं आहे. जिम, योग किंवा ३० ते ४० मिनिटं चाला. यामुळे शरीरातील अधिक कॅलरीज बर्न होतील.

प्रोटीनयुक्त आहार घ्या

वेट लॉसदरम्यान, अधिक प्रोटीनयुक्त पदार्थ खा. भाकरी किंवा भातापेक्षा फळे, भाज्या, कोशिंबीर इत्यादींचे अधिक सेवन करा. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहील. शिवाय वारंवार भूक लागणार नाही.

झोप पूर्ण घ्या

वजन कमी करण्यासाठी झोप महत्वाची. शरीराला विश्रांतीची गरज असते. त्यामुळे ७ ते ८ तासांची झोप गरजेची. झोप घेतल्याने आपल्याला शरीराला अधिक काम करण्याची उर्जा मिळते.

विराट कोहली-अक्षय कुमार खातात ‘तशा’ उकडून खा भाज्या, पोषण भरपूर देणाऱ्या ५ भाज्या

हर्बल चहा प्या

जेवणानंतर १० ते १५ मिनिटांनी हर्बल चहा प्या. आपण  ग्रीन टी, कॅमोमाइल टी, जिरे, बडीशेप किंवा दालचिनी चहा पिऊ शकता. या प्रकारचे चहा अन्नाचे चांगले पचन करतात. चयापचय बुस्ट करते. मुख्य म्हणजे पचनक्रियाही सुधारते.

Web Title: 5 Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.