Join us  

शरीर बारीक पण पोट खूप सुटलंय? बेली फॅट घटवण्याच्या ५ टिप्स; जीमला न जाता स्लिम-सुडौल दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 1:58 PM

5 Tips to Remove Belly Fat : बेली फॅट कमी करण्यासाठी काहीजण वर्कआऊट करतात तर काहीजण डाएटवर लक्ष देतात. 

दिवसभरात आपण जे काही खातो त्यात ज्या कॅलरीजचा वापर होत नाही त्याची चरबी पोटावर जमा होते आणि तुम्ही लठ्ठ दिसतात. बेली फॅट कमी करण्यासाठी काहीजण वर्कआऊट करतात तर  काहीजण डाएटवर लक्ष देतात.  अनेकदा रोज व्यायाम करूनही शरीरातील अतिरिक्त चरबी फारशी कमी झालेली दिसत नाही. ( 5 Tips for a Flatter Stomach by weight loss coach) कारण शरीर योग्य प्रमाणात कॅलरीज बर्न करत नाही. फिटनेस कोच वंश यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवरून अशा काही ५ टिप्स सांगितल्या आहेत. ज्या वापरून तुम्ही अतिरिक्त कॅलरीज बर्न करू शकता आणि चरबी घटवण्यास मदत होईल. (5 Tips to Remove Belly Fat)

- संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की साधे चालणे किंवा जॉगिंग केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वर्कआउट सेशन संपल्यानंतर सर्वप्रथम ट्रेडमिलवर 5 मिनिटे नॉर्मल वॉक करा. त्यानंतर 8-10 चा वेग सेट करा आणि 5 मिनिटे धावा.

- लहानपणापासूनच अनेकजण सायकल चालवतात. हेल्दी राहण्यासाठी ही सवय फायदेशीर ठरते कारण हा कार्डिओ वर्कआऊटचा एक भाग आहे. ज्यामुळे कोअर मसल्स टार्गेट होऊन अतिरिक्त चरबी जळण्यास मदत होते. वर्कआऊटनंतर १० मिनिटं सायकलवर चाला.

ना डाएट- ना जीम; फक्त 5 रिफ्रेशिंग पदार्थ रोज घ्या; झरझर घटेल पोट, कंबरेची वाढलेली चरबी

- क्रॉस ट्रेनर देखील कार्डिओ व्यायामाचा एक भाग आहे. याचा परिणाम तुमच्या मांड्या, कुल्हे, हात आणि पोटाच्या स्नायूंवर होतो. या भागांवर जमा झालेली चरबी लवकरच नाहीशी होईल. तुम्हाला 10 मिनिटे क्रॉस ट्रेनर सामान्य वेगाने करणे आवश्यक आहे.

- दोरी उड्या मारण्यासाठी तुम्हाला जीममध्ये जाण्याची काहीच गरज नाही. घरात,  टेरेसवर, अंगणात कुठेही तुम्ही हा व्यायाम करू शकता. ५० वेळा  ३ रिपिटेशन्स रोज करा. 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स