Join us

उपाशीपोटी टाळाव्याच अशा ५ गोष्टी; तब्येत बिघडते त्याला अनेकदा या चुका जबाबदार असतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 17:39 IST

बहुसंख्य महिलांची एक सारखी सवय म्हणजे स्वत:च्या खाण्याकडे दुर्लक्ष करणे. पण असे करू नका. कारण उपाशीपोटी घाई- गडबडीत तुम्हीही या चुका करत असाल तर आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.

ठळक मुद्देसकाळी उपाशीपोटी काही गोष्टी करणे अगदी कटाक्षाने टाळले पाहिजे.

आपल्या कुटूंबाची काळजी घेण्यासाठी महिला सदैव तत्पर असतात. मुलांच्या, नवऱ्याच्या, घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या जेवणाच्या, नाश्त्याच्या वेळा त्या अगदी काटेकोरपणे पाळतात. मात्र या सर्व धांदलीत स्वत:च्या तब्येतीकडे मात्र त्यांचे सर्रास दुर्लक्ष होते. इतरांना खाऊ- पिऊ घालताना आपणही खायचे असते, हे अनेकजणी कामाच्या गडबडीत विसरून जातात आणि सकाळचा बराच वेळ उपाशीच राहतात. पण असे उपाशीपोटी असताना जर आपल्याकडून काही चूका झाल्या तर मात्र आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सकाळी उपाशीपोटी काही गोष्टी करणे अगदी कटाक्षाने टाळले पाहिजे.

 

उपाशीपोटी या गोष्टी मुळीच करू नका. १. उपाशीपोटी कॉफी पिऊ नकासकाळी उठून चहा किंवा दूध घेण्याची सवय अनेक जणांना असते. पण काही जण चहा किंवा दुधाऐवजी कॉफी घेणे पसंत करतात. पण आयुर्वेदानुसार सकाळी उपाशीपोटी कॉफी पिणे धोकादायक आहे. कॉफीमध्ये असणाऱ्या काही घटक पदार्थांमुळे ॲसिडिटी, अपचन असे त्रास होतात. त्यामुळे सकाळी कॉफी पिण्याची सवय असेल तर ती सोडा. कॉफी घ्यायचीच असेल, तर त्याआधी दोन- चार बिस्कीटे खा आणि मग कॉफी प्या. 

२. दही खाऊ नकाउपाशी पोटी सकाळी चुकूनही दही खाऊ नका. यामुळे खूप जास्त प्रमाणात ॲसिडीटी होऊ शकते. त्यामुळे पोटात काही असल्याशिवाय दही खाणे टाळा. कफ प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तींना सकाळी उपाशीपोटी दही खाल्ल्याने सर्दीचा त्रास होऊ शकतो. 

 

३. टोमॅटोसॅलड खायचे म्हणून सकाळच्या वेळी उपाशीपोटी सॅलड खाणे टाळा. टोमॅटोमध्ये खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे शरीरातील ॲसिडिटी वाढते आणि अपचनाचा त्रास होतो. त्यामुळे पित्तप्रवृत्तीच्या व्यक्तींनी तर चुकूनही उपाशीपोटी टोमॅटो खाऊ नये. 

४. काकडीकाकडी हा थंड पदार्थ असतो. त्यामुळे सकाळी रिकाम्यापोटी काकडी खाल्याने अनेक जणांना कफ, सर्दी, खोकला असा त्रास होऊ शकतो. 

 

५. हे देखील लक्षात घ्याआपण जेव्हा काही खाल्लेले नसते, तेव्हा आपली खूप जास्त चिडचिड होते. भुकेमुळे आपल्याला काही सुचत नाही. अशा वेळी जर आपण चिडचिड केली किंवा कुणावर तरी खूप जास्त चिडलो तर यामुळे ब्लड- शुगर लेव्हल खूप मोठ्या फरकाने कमी होते किंवा अचानक वाढू शकते. असे होणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे उपाशीपोटी चिडचिड करणे टाळा. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सपौष्टिक आहारहेल्थ टिप्स