Lokmat Sakhi >Fitness > मान-पाठ खूप दुखते, ऑफिसमध्ये फक्त ‘हे’ ५ सोपे स्ट्रेच, २ मिनिटं करा, अंगदुखी गायब...

मान-पाठ खूप दुखते, ऑफिसमध्ये फक्त ‘हे’ ५ सोपे स्ट्रेच, २ मिनिटं करा, अंगदुखी गायब...

Five Minute Stretching Before Office To Stay Energized At Work : 5 Minute Office Stretch Workout : 5 Minute Desk Workout : 5 Simple Stretches To Boost Your Energy At Your Office Desk : दिवसभर एकाच जागी बसून काम करत असाल तर हे ५ स्ट्रेचिंग करा आणि व्हा रिलॅक्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2025 16:04 IST2025-02-26T16:04:11+5:302025-02-26T16:04:39+5:30

Five Minute Stretching Before Office To Stay Energized At Work : 5 Minute Office Stretch Workout : 5 Minute Desk Workout : 5 Simple Stretches To Boost Your Energy At Your Office Desk : दिवसभर एकाच जागी बसून काम करत असाल तर हे ५ स्ट्रेचिंग करा आणि व्हा रिलॅक्स...

5 Simple Stretches To Boost Your Energy At Your Office Desk 5 Minute Office Stretch Workout 5 Minute Desk Workout | मान-पाठ खूप दुखते, ऑफिसमध्ये फक्त ‘हे’ ५ सोपे स्ट्रेच, २ मिनिटं करा, अंगदुखी गायब...

मान-पाठ खूप दुखते, ऑफिसमध्ये फक्त ‘हे’ ५ सोपे स्ट्रेच, २ मिनिटं करा, अंगदुखी गायब...

सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाईलमुळे बरेचदा आपण आपल्या आरोग्याकडे फारसे लक्ष देऊ शकत नाहीत. विशेषतः जर तुम्ही वर्किंग असाल तर दिवसभर काम, ऑफिस यात आपल्याला स्वतःसाठी (Five Minute Stretching Before Office To Stay Energized At Work) पुरेसा वेळ देखील मिळत नाही. आपल्यापैकी बरेचजण ऑफिसमध्ये डेस्क जॉब करतात. डेस्क जॉब (5 Minute Desk Workout) करताना आपण काहीवेळा कित्येक तास एकाच जागी बसून ( 5 Simple Stretches To Boost Your Energy At Your Office Desk) काम करत राहतो. अशावेळी आपल्या शरीराची फारशी (5 Minute Office Stretch Workout) हालचाल होतंच नाही. ज्यामुळे आपल्या अंगात जडपणा, थकवा आणि आळस येतो. यामुळे दिवसभर आपल्याला सुस्त आणि थकल्यासारखे वाटते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही ऑफिसमध्ये बसल्या जागी कामाला सुरुवात करण्यापूर्वी फक्त ५ मिनिटे स्ट्रेचिंग केले तर तुमचे शरीर दिवसभर अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यास अधिक मदत होते.

ऑफिसमध्ये गेल्यावर कामाला सुरुवात करण्यापूर्वी काही हलके स्ट्रेचिंगचे प्रकार केले तर दिवसभर तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही वाटेल. स्ट्रेचिंगमुळे शरीर लवचिक होते, रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंवरील ताण कमी होण्यास मदत होते. याशिवाय, पाठीचा कणा मजबूत होऊन बॉडी पोश्चर सुधारते. ऑफिसमध्ये कामाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही करायलाच हवे अशा ५ सोप्या स्ट्रेचिंग एक्सरसाइज कोणत्या ते पाहूयात. 

ऑफिसमध्ये करता येतील अशा ५ सोप्या स्ट्रेचिंग एक्सरसाइज कोणत्या ?

१. नेक स्ट्रेच (Neck Stretch) :- ऑफिसमध्ये खूप जास्त वेळ एकाच जागी बसून काम केल्याने मानेवर सर्वात जास्त ताण पडतो. यासाठीच ऑफिसमध्ये गेल्यावर कामाला सुरुवात करण्यापूर्वी नेक स्ट्रेच (Neck Stretch) करणे फायदेशीर ठरते. यामुळे मानेच्या भागात होणाऱ्या वेदनेपासून आराम मिळतो. डोकेदुखी आणि मानेच्या स्नायूंवरील ताण कमी होण्यास मदत मिळते. नेक स्ट्रेच करण्यासाठी सरळ ताठ उभे रहा किंवा खुर्चीत बसा आणि हळूहळू तुमची मान उजवीकडे आणि डावीकडे हलवा. यानंतर, मान पुढे आणि मागच्या दिशेने वाकवा, ही क्रिया १० ते २० सेकंद करा.

ऑफिसमध्ये एकाच जागी बसून मांड्या जाडजूड झाल्या ? करा 'ही' ४ योगासनं, मांड्यांची चरबी घटेल लवकर...

२. शोल्डर रोल (Shoulder Roll) :- सतत लॅपटॉप, कंम्प्युटरवर काम केल्याने खांद्यांमध्ये जडपणा येतो किंवा खांद्यांच्या स्नायूंवर अधिक जास्त ताण पडतो. अशावेळी खांद्यांमधला जडपणा किंवा ताण कमी करण्यासाठी शोल्डर रोल एक्सरसाइज करणे फायद्याचे ठरते. शोल्डर रोल एक्सरसाइज केल्याने खांद्याच्या स्नायूंना आराम मिळतो आणि बॉडी पॉश्चर सुधारण्यास मदत होते. खुर्चीत सरळ ताठ बसा आणि तुमचे खांदे हळूहळू गोलाकार पद्धतीने फिरवा. सर्वात आधी पुढच्या दिशेने १० वेळा फिरवा आणि नंतर मागच्या बाजूला १० वेळा अशा पद्धतीने हा एक्सरसाइज करावा. 

३. हॅन्ड्स अप स्ट्रेच (Hands-Up Stretch) :- बराचवेळ एकाच जागी बसून काम केल्याने मानेप्रमाणेच हातांवर देखील तितकाच ताण येतो. यासाठी हातांना देखील स्ट्रेचिंग एक्सरसाईजची गरज असते. यासाठी आपण हॅन्ड्स अप स्ट्रेच हा एक्सरसाइजचा प्रकार करु शकता. हॅन्ड्स अप स्ट्रेच करण्यासाठी सरळ ताठ उभे राहा आणि दोन्ही हात वर करा. बोटे एकत्र करा आणि शरीर वरच्या दिशेने स्ट्रेच करा. या स्थितीत १० सेकंद रहा आणि नंतर हळूहळू तुमचे हात खाली करा. यामुळे हातांवरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच संपूर्ण शरीराच्या स्नायूंना स्ट्रेच केल्याने आपले शरीर रिलॅक्स होते. 

४. साइड स्ट्रेच (Side Stretch) :- साइड स्ट्रेचिंगमुळे कंबर आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात. खुर्चीत सरळ बसून, हळूहळू तुमचे शरीर उजवीकडे खालच्या दिशेने हलकेच वाकवा आणि १० सेकंदांसाठी याच स्थितीत राहा. नंतर डावीकडे वाकून तीच क्रिया पुन्हा करा. यामुळे पोट आणि कंबरेचे स्नायू टोर्न्ड होण्यास मदत होते. तसेच पोटाच्या बाजूची चरबी कमी करण्यास मदत होते. 

'छावा' साठी विकी कौशलने केलं प्रोटीन रिच डाएट, पाहा त्यानं नेमकं काय काय खाल्लं...

५. लेग स्ट्रेच (Leg Stretch) :- बराचवेळ एकाच जागी बसून काम केल्याने पायांमध्ये गोळे येऊ लागतात किंवा पाय आखडतात अशावेळी स्ट्रेचिंगमुळे आराम मिळतो. भिंतीचा किंवा टेबलाचा आधार घ्या आणि एक पाय थोडा मागे घ्या. दुसरा पाय थोडा पुढे ठेवा आणि हळू हळू गुडघे वाकवा. या स्थितीत १० सेकंद रहा आणि नंतर दुसऱ्या पायाने पुन्हा करा. यामुळे पायांच्या स्नायूंना बळकटी येते. पाय दुखणे आणि सूज येणे अशा समस्या कमी होतात आणि पायांतील  रक्ताभिसरण सुधारते.

Web Title: 5 Simple Stretches To Boost Your Energy At Your Office Desk 5 Minute Office Stretch Workout 5 Minute Desk Workout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.