Join us  

ना डाएट- ना जीम; फक्त ५ रिफ्रेशिंग पदार्थ रोज घ्या; घटेल पोट-कंबरेची वाढलेली चरबी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2023 11:52 AM

5 refreshing summer drinks to lose weight : कलिंगडात ९० टक्के पाणी असतं. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर कलिंगड सगळ्यात उत्तम आहे

रोजच्या खाण्यात बरेच कॅलरीजयुक्त पदार्थ खाल्ले जातात. ज्यामुळे हळू हळू वजन वाढायला सुरूवात होते आणि एक्स्ट्रा कॅलरीज घटवण्याचा दबाव येतो. अशावेळी अनेकजण डाएट आणि व्यायाम करून वजन कमी करतात जेणेकरून त्यांना हवेतसे कपडे घालता येतील.  काही हेल्दी ड्रिंक्सचा आहारात समावेश केल्यास कॅलरीज कमी होण्यास मदत होईल. (Weight Loss in Summer) लाईफस्टाईल कोच स्नेहल अळसुळे यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीतून अशा ड्रिक्सबाबत सांगितले आहे ज्यात कॅलरीज कमी करतात. हेल्दी आणि स्वादीष्टही असतात. याशिवाट पॅकेज्ड, कार्बोनेट ड्रिंक्सच्या तुलनेत हे खूपच फायदेशीर आहेत. (5 refreshing summer drinks to lose weight)

नारळाचं पाणी

नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, उच्च बायोएक्टिव्ह एंजाईम्स असतात. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म सुधारण्यास मदत होते. यामुळे मांसपेशी अधिक कॅलरीज बर्न करू शकतात. यासाठी दिवसभरातून अनेकदा नारळ पाणी प्यायल्यानं शरीर तंदरूस्त राहण्यास मदत होते आणि वजनही नियंत्रणात राहतं.  

उसाचा रस

यात वर्कआउटनंतरच्या हायड्रेशनसाठी आवश्यक असलेली महत्त्वपूर्ण खनिजे देखील असतात. या खनिजांमध्ये कॅल्शियम, तांबे, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, लोह आणि पोटॅशियम यांचा समावेश आहे. त्यामुळे उसाचा रस हा कृत्रिम एनर्जी ड्रिंक्स आणि पोस्ट वर्कआउट एनर्जी बारसाठी उत्कृष्ट पर्याय आहे. उसाचा रस  आरोग्यदायी फायदे देतो.  यामुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते, तुमचे क्रेव्हिंग्स कमी होतात.

पोट खूपच सुटलंय? बेली फॅट घटवण्यासाठी रामदेव बाबांचे १० उपाय, सुडौल दिसाल

पुदीन्याचं पाणी

पुदीन्याची पानं वजन कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. पुदिन्यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात. वजन कमी करण्यासाठी आणि चयापचन वाढवण्यासाठी पुदीन्याचं पाणी उत्तम उपाय आहे.  पुदीन्याचा चहा वजन कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. यामुळे कॅलरीज कमी करण्यात मदत होते. 

ताक

दुपारच्या जेवणानंतर अनेकांना ताक लागतंच. ताक प्रथिने, जीवनसत्त्वे आणि अनेक खनिजांनी समृद्ध आहे परंतु कॅलरी आणि चरबी कमी आहे. ताक प्यायल्याने आपण हायड्रेटेड आणि ऊर्जावान राहतो. यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे जंक फूडचे अनावश्यक सेवन कमी केले जाते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हे एक उत्तम पेय आहे.

कलिंगड मोहितो

कलिंगडात ९० टक्के पाणी असतं. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर कलिंगड सगळ्यात उत्तम आहे. १०० ग्राम सर्विंग्समध्ये ३० कॅलरीज असतात. हे  एक ऑर्गेनिक अमीनो एसिडचे स्त्रोत आहे. यामुळे लवकरात लवकर वजन कमी करण्यास मदत होते. 

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्स