Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fitness > पाय दुखेपर्यंत चालता पण पोट कमीच होईना? वॉकनंतर 5 गोष्टी करा, पटकन बारीक व्हाल

पाय दुखेपर्यंत चालता पण पोट कमीच होईना? वॉकनंतर 5 गोष्टी करा, पटकन बारीक व्हाल

5 Morning Walk Mistakes You Should Avoid : ज्याप्रमाणे शरीर एनर्जेटीक राहण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे वॉक आणि व्यायामाचीही आवश्यकता असते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 20:07 IST2025-12-31T19:57:47+5:302025-12-31T20:07:33+5:30

5 Morning Walk Mistakes You Should Avoid : ज्याप्रमाणे शरीर एनर्जेटीक राहण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे वॉक आणि व्यायामाचीही आवश्यकता असते.

5 Morning Walk Mistakes You Should Avoid : Morning Walk Mistakes You Should Avoid | पाय दुखेपर्यंत चालता पण पोट कमीच होईना? वॉकनंतर 5 गोष्टी करा, पटकन बारीक व्हाल

पाय दुखेपर्यंत चालता पण पोट कमीच होईना? वॉकनंतर 5 गोष्टी करा, पटकन बारीक व्हाल

निरोगी राहण्यासाठी शरीर एक्टिव्ह असणं खूप महत्वाचं असतं. ज्याप्रमाणे शरीर एनर्जेटीक राहण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे वॉक आणि व्यायामाचीही आवश्यकता असते. सकाळी वॉक केल्यानं ताण-तणाव दूर होतो शरीरात ब्लड सर्क्युलेशनही चांगले राहते इतकंच नाहीतर अनेक आजारांपासूनही बचाव होतो. पण मॉर्निंग वॉक करताना काही चुका केल्यामुळे तुमचे आरोग्यही बिघडू शकते. हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर काय करायचं, काय नाही ते समजून घ्या. (Morning Walk Mistakes You Should Avoid)

पाणी प्या

 सकाळी वॉक करून आल्यानंतर पोटभर पाणी प्या. असं केल्यानं शरीरात डिहायड्रेशनची समस्या उद्भवत नाही. शरीराला थकवा येत नाही. म्हणून वॉक करून आल्यानंतर भरपूर पाणी प्यायला हवं शरीरात पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही इलेक्ट्रोलाईट ड्रिंकचा वापर करू शकता.

स्ट्रेचिंग करा

 सकाळच्या वॉक नंतर आवर्जून स्ट्रेचिंग करायला हवं. यामुळे अनेक समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळू शकते. मॉर्निंग वॉक  केल्यानं आपल्या मांसपेशी गरम होतात. अशा स्थितीत मांसपेशींमध्ये वेदना वाढू शकतात.  अशा स्थितीत स्ट्रेचिंग केल्यानं या वेदनांपासून सुटका मिळू शकते याशिवाय शरीर लवचीक राहते.

ओटी पोट लटकतंय-फिगरच बिघडली? सकाळी उठल्यावर १ काम करा-मेणासारखी वितळेल चरबी

शरीर शांत होऊ द्या

चालून आल्यानंतर शरीर शांत, थंड ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण चालण्यामुळे शरीरात उष्णता तयार होते. म्हणून वॉकनंतर काहीवेळ शांत बसायला हवं. जेणेकरून हॉर्ट बीट साधारण होईल आणि थकलेल्या शरीराला आराम करता येईल.

प्रोटीन शेक प्या

मॉर्निंग वॉकनंतर शरीराला दुरूस्त करण्यासाठी प्रोटीन शेक पिणं खूप महत्वाचे असते. मॉर्निंग वॉकमुळे शरीरात पाण्याची कमतरता होत नाही आणि शरीरात एनर्जी टिकून राहते. जेव्हाही तुम्ही मॉर्निंग वॉक करून येता तेव्हा प्रोटीन शेक किंवा केळीचे सेवन करा. यामुळे फक्त मांसपेशी मजबूत होत नाही तर शरीराला आवश्यक असणारे व्हिटामीन्सही मिळतात.

कॅन्सर वाढण्यापासून रोखतात रोजच्या जेवणातले ७ पदार्थ; ताटात असायलाच हवेत

हंगामी फळं खा

सकाळी चालल्यानंतर हंगामी फळांचे सेवन करा. असं केल्यानं शरीराला ऊर्जा मिळते आणि अनेक प्रकारचे व्हिटामीन्स, मिनरल्सही मिळतात. अधिक वॉक केल्यानं ऊर्जा कमी होते अशावेळी फळांचे सेवन केल्यानं शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.

Web Title : वजन कम नहीं हो रहा? वॉक के बाद करें ये 5 काम, मिलेगा फायदा।

Web Summary : सुबह की सैर फायदेमंद है, पर गलतियों से बचें। हाइड्रेटेड रहें, मांसपेशियों के दर्द से राहत के लिए स्ट्रेच करें, शरीर को ठंडा होने दें, प्रोटीन का सेवन करें, और ऊर्जा और रिकवरी के लिए मौसमी फल खाएं।

Web Title : Walking but not losing weight? Do these 5 things after walk.

Web Summary : Morning walks are beneficial, but avoid mistakes. Hydrate, stretch to ease muscle pain, let your body cool down, consume protein, and eat seasonal fruits for energy and recovery.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.