Lokmat Sakhi >Fitness > रोज सकाळी काही मिनिटंच करा Cow Pose, दूर होतील शरीरातील 'या' ५ समस्या...

रोज सकाळी काही मिनिटंच करा Cow Pose, दूर होतील शरीरातील 'या' ५ समस्या...

Cow Pose Health Benefits : एका योगासनाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला ५ फायदे मिळतील. हे योगासन म्हणजे गोमुखासन (Cow Pose). 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:03 IST2025-06-12T11:48:42+5:302025-06-12T12:03:18+5:30

Cow Pose Health Benefits : एका योगासनाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला ५ फायदे मिळतील. हे योगासन म्हणजे गोमुखासन (Cow Pose). 

5 benefits of doing cow pose every morning you should know | रोज सकाळी काही मिनिटंच करा Cow Pose, दूर होतील शरीरातील 'या' ५ समस्या...

रोज सकाळी काही मिनिटंच करा Cow Pose, दूर होतील शरीरातील 'या' ५ समस्या...

Cow Pose Health Benefits : रोज सकाळी उठून योगा करणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. वेगवेगळ्या प्रकारची योगासनं करून शरीर फिट राहतं आणि आरोग्य चांगलं राहतं. प्रत्येक योगासनांची एक खासियत असते. अशाच एका योगासनाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला ५ फायदे मिळतील. हे योगासन म्हणजे गोमुखासन (Cow Pose). 

गामुखासन केल्यानं मणका, कंबर आणि खांद्यांना खूप फायदा मिळतो(Cow Pose Health Benefits). अशात रोज गोमुखासन केल्यानं तुम्हाला इतर काय काय फायदे मिळतात हे जाणून घेऊ.

मणका होईल लवचिक

आजकाल सुस्त लाइफस्टाईलमुळे कंबर आणि पाठीची हाडंही आखडल्यासारखी होतात. अशात तुम्ही गोमुखासन करून आराम मिळवू शकता. या आसनानं मणका आणि कंबरेतील हाडं अधिक लवचिक होतात. कंबरदुखीची समस्या देखील दूर होते.

खांदे आणि छाती होते मजबूत

हे आसन केल्यावर खांदे आणि छातीलाही फायदा मिळतो. या दोन्ही भागांमध्ये प्रेशर पडत असल्यानं ते मजबूत होतात. तसेच पोश्चरमध्येही सुधारणा होते. हे आसन जास्त वेळ डेस्कवर बसून काम करतात त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. 

स्ट्रेस होईल दूर

गामुखासन करण्याचा एक मोठा फायदा म्हणजे यानं स्ट्रेस दूर होतो. या आसनादरम्यान घेतलेल्या श्वासानं मन शांत होतं आणि मेंदुला आराम मिळतो. यानं थायरॉइड ग्लॅंडही अॅक्टिव होतात. ज्यामुळे मूड चांगला राहतो.

पचन तंत्र सुधारतं

या आसनामुळे पोटाच्या स्नायूंवर दबाव पडतो, ज्यामुळे पचन तंत्र सक्रिय राहतं. यानं बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या दूर होतात. सकाळी उपाशीपोटी हे आसन केल्यास पचनक्रिया आणखी चांगली होते.

जॉइंट्सचं दुखणं होईल दूर

गोमुखासन केल्यानं कंबर, गुडघे आणि ढोपरांनाही फायदा मिळतो. हे आसान नियमितपणे केल्यानं जॉइंट्समध्ये होणारी वेदना दूर होते. तसेच शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ब्लड सर्कुलेशनही वाढतं.
 

Web Title: 5 benefits of doing cow pose every morning you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.