Join us

नवरात्रीत ९ दिवस उपवास करणार? ३ गोष्टी लगेच सुरू करा- उपवासाचा थकवा मुळीच येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2025 14:37 IST

Navratri 2025: नवरात्रीचे उपवास करणार असाल तर त्यासाठी तुमची शारिरीक आणि मानसिक तयारी होण्यासाठी या काही गोष्टी अगदी लगेच सुरू करा असा सल्ला डॉक्टर देत आहेत...(3 tips to prepare your body for 9 days fast in Navratri 2025)

पक्ष पंधरवाडा आता संपत आलेला आहे. त्यामुळे कित्येकांना आता वेध लागलेले आहेत ते नवरात्रीचे (Navratri 2025). आता नवरात्री म्हटलं की महिलांना विशेष उत्साह असतो. भजन, कुंकूमार्चन, हळदी- कुंकू, कुमारिका पुजन, सप्तशतीचे पाठ असे कित्येक कार्यक्रम यानिमित्ताने घेतले जातात. शिवाय रोज रात्री गरबा- दांडिया असतोच.. यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांत सगळीकडे कसे उत्साहाचे, आनंदाचे वातावरण असते. आता नवरात्रीचे उपवासही करायचे असतील आणि नवरात्रीच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी व्हायचं असेल तर अंगात ताकद हवीच.. म्हणूनच नवरात्रीचे उपवास छान पार पडावेत आणि या दिवसांमध्ये थकवा, अशक्तपणा जाणवू नये यासाठी डॉक्टरांनी काही खास टिप्स दिल्या आहेत.(3 tips to prepare your body for 9 days fast in Navratri 2025)

नवरात्रीच्या उपवासामुळे अशक्तपणा येऊ नये म्हणून...

 

नवरात्रीच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून नवरात्रीच्या आधीच आपले शरीर त्यासाठी कसे तयार करावे, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी drmalharganla या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

AI Saree Trend : AI ने दिलेला रेट्रो लूक फोटो पाहून चपापली महिला! म्हणाली सावध व्हा, नाहीतर.....

१. नवरात्रीमध्ये आपण उपवास करतो म्हणजे साहजिकच नेहमीपेक्षा कमी प्रमाणात अन्न घेतो. त्याचा त्रास होऊन थकवा, अशक्तपणा येऊ नये म्हणून आताच ब्लड टेस्ट करून घ्या आणि त्यानुसार तुमच्या शरीरात व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम अशा ज्या घटकांची कमतरता आहे, त्या सप्लिमेंट्स डाॅक्टरांच्या सल्ल्याने सुरू करा. अशा पद्धतीने एकदा शरीर रिचार्ज करून घेतले की उपवासाचा त्रास होणार नाही.

 

२. आपल्याला भरपेट खाण्याची सवय असते. उपवास सुरू झाल्यानंतर सुरुवातीला याच सवयीचा त्रास होतो. त्यामुळे अगदी आतापासूनच नेहमीपेक्षा थोडं कमी खा. यामुळे हळूहळू शरीरालाही योग्य प्रमाणात खाण्याची सवय होते.

तिशीनंतर प्रत्येक महिलेने खायलाच हवेत ५ पदार्थ- कॅन्सर, हार्ट ॲटॅकसह कित्येक आजारांचा धोका टळू शकतो

३. या दिवसांमध्ये खूप जास्त शारिरीक कष्टाची कामे करू नका. कारण तुमचं शरीर उपवासाच्या आधी थकता कामा नये. शरीर थकलेलं असेल तर उपवासात शरीराची ताकद आणखी कमी होऊ शकते. त्यामुळे जास्त दगदग न करता शरीराला आणि मनाला आराम द्या. अंगात भरपूर उर्जा येईल. 

 

टॅग्स :नवरात्रीनवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४आरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स