Join us

मलायका अरोरासारखं सपाट पोट हवं? ती करते तसे ३ व्यायाम करा- पोटावरची चरबी उतरेल झरझर... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2025 18:57 IST

3 Exercise for Reducing Belly Fat: पोटावरची चरबी कमी करण्यासाठी कोणते व्यायाम उपयुक्त ठरतात याविषयीची माहिती मलायका अरोराने सोशल मीडियावर शेअर केली आहे..(Malaika Arora suggests exercise for fast fat loss)

ठळक मुद्देया व्यायामांमुळे पोटाच्या स्नायूंवर ताण येतो आणि तिथली चरबी कमी होण्यास मदत होते. 

मलायका अरोरा म्हणजे जबरदस्त फिटनेस. काहीही झालं तरी चालेल पण तिच्या व्यायामात मात्र सहजासहजी खंड पडत नाही. म्हणूनच तर वयाची पन्नाशी ओलांडलेली मलायका आजही जबरदस्त फिट आहे. तिच्या परफेक्ट फिगरमागे तिची प्रचंड मेहनत आहे. अशीच मेहनत आपल्या चाहत्यांनीही घ्यावी आणि स्वत:चा फिटनेस जपावा यासाठी ती सोशल मीडियावर नेहमीच तिचे व्यायामाचे वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत असते (3 exercise for reducing belly fat). आता नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये पोटावरची चरबी कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करायला पाहिजेत, याविषयीची माहिती सांगितली आहे.(Malaika Arora suggests exercise for fast fat loss)

 

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावे?

पोटावरचे चरबीचे टायर्स कमी करण्यासाठी मलायकाने जे काही व्यायाम सांगितले आहेत, ते करण्यासाठी सगळ्यात आधी जमिनीवर चांगली योगा मॅट घालून घ्या आणि पाठ टेकवून त्या मॅटवर झोपा.

मेहेंदीमुळे केशरी, लालसर रंगलेले केस आवडत नाही? मेहेंदीमध्ये 'हा' पदार्थ मिसळा- केसांना नॅचरल रंग येईल

यानंतर पाय गुडघ्यात दुमडून गुडघे पोटाजवळ आणा आणि तेव्हाच मान, डोकं उचलून हात पुढच्या बाजुने लांब करा. पुन्हा डोकं जमिनीवर टेकवून पाय सरळ करा. अशीच क्रिया १० ते १२ वेळा करा. असे एका नंतर एक ७ ते ८ सेट करा.

 

पुढचा व्यायाम म्हणजे नौकासन. नौकासन करण्यासाठी पाठीवर झोपा. यानंतर मांड्यांपर्यंत ४५ डिग्री कोनामध्ये पाय वर उचला. त्याचप्रमाणे डोकं, मान उचलून हात पुढे करा. ही अवस्था तुम्हाला शक्य होईल तेवढा वेळ टिकविण्याचा प्रयत्न करा. 

वजन वाढेल म्हणून दही- भात खाणं टाळता? बघा चव आणि पौष्टिकता वाढविणाऱ्या दहीभाताची रेसिपी.. 

तिसरा व्यायाम करण्यासाठी जमिनीवर पाठ टेकवून झोपा. यानंतर मान, डोकं वर उचला. दोन्ही हात समोरच्या बाजुने घ्या. पाय गुडघ्यामध्ये दुमडून गुउघे पोटाजवळ आणा आणि पुन्हा लांब करा. असं १० ते १२ वेळा करा आणि याचेही ५ ते ६ सेट करा. या व्यायामांमुळे पोटाच्या स्नायूंवर ताण येतो आणि तिथली चरबी कमी होण्यास मदत होते. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामवेट लॉस टिप्समलायका अरोरा