lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fashion > ४५ लाखांचा ड्रेस आणि ३ लाखांची पर्स! शाहरुख खानची लेक सुहानाची महागडी स्टाईल पाहा..

४५ लाखांचा ड्रेस आणि ३ लाखांची पर्स! शाहरुख खानची लेक सुहानाची महागडी स्टाईल पाहा..

Suhana Khan's Costly Dress And Purse: अभिनेता शाहरुख खानची कन्या सुहाना खान हिचे काही फोटो नुकतेच व्हायरल झाले असून त्यात तिने घातलेल्या महागड्या ड्रेसची चांगलीच चर्चा होते आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2023 02:41 PM2023-11-11T14:41:29+5:302023-11-11T14:42:21+5:30

Suhana Khan's Costly Dress And Purse: अभिनेता शाहरुख खानची कन्या सुहाना खान हिचे काही फोटो नुकतेच व्हायरल झाले असून त्यात तिने घातलेल्या महागड्या ड्रेसची चांगलीच चर्चा होते आहे...

Suhana Khan's Dress Worth Rs. 45.05 Lakhs, she Pairs It With A Purse Of Rs. 3.2 Lakhs | ४५ लाखांचा ड्रेस आणि ३ लाखांची पर्स! शाहरुख खानची लेक सुहानाची महागडी स्टाईल पाहा..

४५ लाखांचा ड्रेस आणि ३ लाखांची पर्स! शाहरुख खानची लेक सुहानाची महागडी स्टाईल पाहा..

Highlightsसुहाना खान पुन्हा एकदा चर्चेत असून यावेळी तिचे महागडे कपडे आणि महागड्या ॲक्सेसरीज हा चर्चेचा विषय झाला आहे.

शाहरुख खान आणि गौरी खान (Shah Rukh Khan and Gauri Khan) यांची लेक सुहाना खान (Suhana Khan) हिची सध्या बरीच चर्चा असते. काही स्टार किड्स खूप चर्चेत असतात, तर काही स्टार किड्सची अजिबातच कधी चर्चा होत नाही. त्यापैकी सुहाना खान ही पहिल्या प्रकारात मोडणारी स्टार किड्स आहे. ती कुठे जाते, तिचं फ्रेंड सर्कल कसं आहे, ती कुणाला डेट करते शिवाय तिचा जबरदस्त फॅशन सेन्स.. अशा तिच्या बऱ्याच गोष्टींची नेहमीच चर्चा होत असते. आतादेखील सुहाना खान पुन्हा एकदा चर्चेत असून यावेळी तिचे महागडे कपडे (Suhana Khan's Dress Worth Rs. 45.05 Lakhs) आणि महागड्या ॲक्सेसरीज हा चर्चेचा विषय झाला आहे.( Suhana Khan's Purse Of Rs. 3.2 Lakhs)

 

The Archies या झोखा अख्तर यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून सुहाना लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

दिवाळीत दिव्यांसोबत फोटो काढता पण कधीच चांगले येत नाहीत? ७ सोप्या पोझ, लाइक्सचा पडेल पाऊस

त्या पार्श्वभूमीवर सुहानाच्या स्टाईलची, लूक्सची पुन्हा नव्याने चर्चा होऊ लागली आहे. तिने तिचे नुकतेच फोटोशूट केले असून यामध्ये तिने corded corset प्रकारचा टॉप घातला असून त्याखाली high-high slit पद्धतीचा काळ्या रंगाचा पेन्सिल स्कर्ट घातला आहे. सुहानाचा तो टॉप faux leather या मटेरियलपासून तयार केलेला आहे. 

 

सुहानाचा टॉप Rhycni या प्रसिद्ध ब्रॅण्डचा असून तिचा स्कर्ट Rick Owens या ब्रॅण्डचा असून त्याचीच किंमत जवळपास ४४ लाखांच्या घरात आहे.

फटाके फोडताना दुखापत होऊ नये म्हणून ८ गोष्टींची काळजी घ्या, दिवाळीत संकट टाळा

आता यासोबतच चर्चा होत आहे ती तिच्या हातात असलेल्या पिवळ्या रंगाच्या पर्सची. खरंतर सुहानाची ही पर्स आकाराने खूप लहान आहे. तिच्यामध्ये एक मोबाईल बसेल की नाही हे ही सांगता येत नाही. पण त्या एवढ्याशा पर्सची किंमतच जवळपास ३ लाख २४ हजार रुपये एवढी आहे. 


 

Web Title: Suhana Khan's Dress Worth Rs. 45.05 Lakhs, she Pairs It With A Purse Of Rs. 3.2 Lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.