Lokmat Sakhi >Fashion > शपथविधी सोहळ्यासाठी कंगना रनौतने नेसली अस्सल सोन्याचांदीचं जरीकाम असलेली साडी, दिसायला साधी पण..

शपथविधी सोहळ्यासाठी कंगना रनौतने नेसली अस्सल सोन्याचांदीचं जरीकाम असलेली साडी, दिसायला साधी पण..

Kangana Ranaut Special Look For Oath Ceremony: सोन्याचांदीचं जरीकाम असणारी साडी आणि त्यावर मोत्याचे ठसठशीत दागिने अशा थाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यास गेलेल्या कंगना रनौतने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले... (Kangana Ranaut special look in ivory real gold silver thread saree)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2024 03:15 PM2024-06-12T15:15:48+5:302024-06-12T15:53:18+5:30

Kangana Ranaut Special Look For Oath Ceremony: सोन्याचांदीचं जरीकाम असणारी साडी आणि त्यावर मोत्याचे ठसठशीत दागिने अशा थाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यास गेलेल्या कंगना रनौतने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले... (Kangana Ranaut special look in ivory real gold silver thread saree)

Kangana ranaut special look in ivory real gold silver thread saree for oath ceremony of prime minister narendra modi | शपथविधी सोहळ्यासाठी कंगना रनौतने नेसली अस्सल सोन्याचांदीचं जरीकाम असलेली साडी, दिसायला साधी पण..

शपथविधी सोहळ्यासाठी कंगना रनौतने नेसली अस्सल सोन्याचांदीचं जरीकाम असलेली साडी, दिसायला साधी पण..

Highlightsमोत्याचे लटकन असणारे कानातले आणि तिची हेअरस्टाईल, न्यूड मेकअप या सगळ्या गोष्टींमुळे ती एकदम रेट्रो थीमनुसार सजल्यासारखी दिसत होती. 

बॉलीवूड स्टार आणि राजकारण हे समीकरण आता काही नवं राहिलेलं नाही. बॉलीवूडमध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतर बरेच स्टार राजकारणाकडे वळतात. अभिनेत्री कंगना रनौतही त्यातलीच. कंगनाने मंडी या तिच्या गावातून लोकसभा निवडणूक लढवली आणि ती निवडून आली. त्यामुळेच तर पंतप्रधाननरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नुकत्याच झालेल्या शपथविधी सोहळ्यात (oath ceremony) तिने खासदार कंगना रनौत म्हणून उपस्थिती लावली होती. या सोहळ्यासाठी कंगनाने भारतीय पेहरावाची म्हणजेच साडीची निवड केली होती. मोतिया रंगाच्या सुंदर साडीमध्ये कंगनाचं सौंदर्य चमकून उठलं होतं. कारण ती साडी होतीच तशी खास... अस्सल सोन्याचांदीचं जरीकाम असणारी. बघा त्या साडीची खास बात....(real gold silver thread saree of Kangana Ranaut)

 

शपथविधी सोहळ्यासाठी कंगनाने मोतिया रंगाच्या साडीची निवड केली होती. साडी, ब्लाऊज आणि तिचा लूक असं सगळंच डिसेंट आणि तिच्या नव्या राजकारणी भुमिकेला साजेसं होतं.

नर्सरीतून आणलेलं हिरवंगार रोप कुंडीत लावताच सुकतं? बघा कुंडीत रोप लावण्याची योग्य पद्धत

यावेळी तिने जी साडी नेसली होती ती कोणत्या ब्रॅण्डची होती, कोणी डिझाईन केलेली होती, याचा काही उल्लेख नाही. पण तिच्यावर अस्सल सोन्याचांदीचं जरीकाम केलेलं होतं, असं म्हटलं जात आहे. याविषयीचा उल्लेख तिने स्वत:च तिच्या सोशल मिडिया हॅण्डलवर केला आहे.

वर्षभराचं लाल तिखट करून ठेवलं, पण त्याला जाळं लागलं? २ सोपे उपाय- तिखट होईल स्वच्छ

याशिवाय कंगनाने जे दागिने घातले होते ते तिच्या आवडत्या आम्रपाली ब्रॅण्डचे होते. मोत्याचे चोकर आणि त्याच्याअगदी मधोमध असणारा पाचू कंगणाच्या मोतिया साडीवर अगदी खुलून दिसत होता. मोत्याचे लटकन असणारे कानातले आणि तिची हेअरस्टाईल, न्यूड मेकअप या सगळ्या गोष्टींमुळे ती एकदम रेट्रो थीमनुसार सजल्यासारखी दिसत होती. 

 

Web Title: Kangana ranaut special look in ivory real gold silver thread saree for oath ceremony of prime minister narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.