Lokmat Sakhi >Fashion > "हाय हिल ते नाचे तो तू बड़ी जचे," पण हाय हिल्स घालून पस्तावाल? रोज हिल्स घालत असाल तर...

"हाय हिल ते नाचे तो तू बड़ी जचे," पण हाय हिल्स घालून पस्तावाल? रोज हिल्स घालत असाल तर...

The Negative Effects of High Heels : हाय हिल्स (High Heels) घालण्याची आवड असेल तर काही गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2023 10:18 AM2023-04-21T10:18:31+5:302023-04-21T10:18:31+5:30

The Negative Effects of High Heels : हाय हिल्स (High Heels) घालण्याची आवड असेल तर काही गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.

4 scary things that can happen when you wear heels too much | "हाय हिल ते नाचे तो तू बड़ी जचे," पण हाय हिल्स घालून पस्तावाल? रोज हिल्स घालत असाल तर...

"हाय हिल ते नाचे तो तू बड़ी जचे," पण हाय हिल्स घालून पस्तावाल? रोज हिल्स घालत असाल तर...

आपल्याला कधी कुठे बाहेर काही खास प्रसंगासाठी जायचे असल्यास आपण छान नवीन कपडे घालून तयार होतो. तुमच्या व्यक्तिमत्वाची समोरच्यावर छाप पडण्यासाठी तुमच्या पेहरावाइतकंच तुम्ही कोणत्या प्रकारचे फुटवेअर वापरता हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असत. आपण सुंदर कपड्यांना शोभून दिसेल असे परफेक्ट मॅचिंग फुटवेअर घालणे पसंत करतो. सध्या हाय हिल्सला (High Heels) खूपच प्राधान्य दिलं जातं. ऑफिस मीटिंग्ज असो वा कोणताही खास प्रसंग कपड्यांना शोभतील असे हाय हिल्स (High Heels) मुली वापरतात. उंचीने लहान असणाऱ्या मुली तर रोज हाय हिल्स घालतात. आजकाल सगळ्याचजणींचं हाय हिल्स (High Heels) घातल्याशिवाय काही काम चालत नाही असं म्हटलं तरी चालेल. 

बहुतांश महिला आपण स्टाइलिस्ट आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी हाय हिल्स (High Heels) घालणे पसंत करतात. सध्याच्या काळात प्रत्येकाकडूनच हाय हिल्सचा  (High Heels) वापर केला जातो. हाय हिल्स (High Heels) तुमच्या व्यक्तिमत्वात भर घालतात, हाय हिल्स घातल्याने महिलांची उंची वाढल्यासारखी दिसते यांसारख्या असंख्य कारणांसाठी हाय हिल्स (High Heels) घातले जातात. परंतु तासंतास हिल्स घातल्यानंतर पाय दुखू लागतात. मात्र तुम्ही सुद्धा हाय हिल्स घालत असाल तर काही गोष्टींकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.पायांवर सातत्याने दबाव पडल्याने पायांसंबंधीत समस्या अधिक वाढू शकतात. हाय हिल्स घालून पाय दुखण्याची समस्या दिवसागणिक वाढू लागल्यास वेळ पडल्यास सर्जरी सुद्धा करावी लागते. त्यामुळे हाय हिल्स घालण्याची आवड असेल तर काही गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करु नका(4 Scary Things That Can Happen When You Wear Heels Too Much).

हाय हिल्स (High Heels) घालण्याचे दुष्परिणाम :- 

१. गुडघ्यांवर जोर (Pressure On Knees) :- हाय हिल्स जरी तुम्हाला खूप स्टायलिश आणि स्मार्ट लुक देत असल्या तरीही चालताना तुम्ही हाय हिल्स घातल्यानंतर नैसर्गिकरित्या चालू शकत नाही. त्यामुळे तुमच्या गुढघ्यावर चालताना दबाव येतो. काही दिवसांनंतर तुमच्या गुडघ्यांवर आलेला हा दबाव अधिक त्रासाचं कारण होतो.

२. पायांमध्ये त्रास (Foot Pain) :- हाय हिल्स घातल्यामुळे पाय दुखणं हे आजकाल खूपच कॉमन झालं आहे. दिवसातून काही तास गेल्यानंतर पाय दुखायला सुरुवात होऊ लागते. तुम्ही जर रोज हाय हिल्स घालत असाल तर पायांच्या दुखण्याचं महत्त्वाचं कारण हे असू शकतं. रोज हिल्स घातल्यामुळे पायांबरोबरच पायाच्या तळव्यामध्येही कायम त्रास होत राहातो.

तुम्ही पण सुडौल दिसण्यासाठी 'बॉडी शेपवेअरचा' वापर करता? तज्ज्ञ सांगतात....

३. पाठ व कंबरदुखी (Back & Waist Pain) :- तुम्ही जर हाय हिल्स घालत असाल तर त्यामुळे तुमच्या पाठीत आणि कंबरेत सतत दुखत राहातं. हाय हिल्स घातल्यामुळे तुमच्या शरीराचं वजन योग्य भागात विभागलं जात नाही. हा असंतुलित भागच तुमच्या पाठ आणि कंबरदुखीचं कारण बनतो.

४. खराब होतं पोश्चर (Damaged Posture) :- हाय हिल्स घालणं तुम्हाला कितीही आवडलं तरीही यामुळे तुमच्या शरीराचा भार हा तुमच्या कंबर, पार्श्वभाग, खांदे आणि हाडांवर येतो. त्यामुळे शरीराचं पोश्चर खराब होतं. 

लठ्ठपणा, ओघळलेले स्तन यामुळे फॅशनेबल कपडे घालता येत नाहीत? ४ टिप्स, करा योग्य कपड्यांची निवड...

हाय हिल्स घालायच्याच असतील तर.... 

१. क्लोज टोज हिल्स पेक्षा ओपन टोज हिल्स घालण्याचा पर्याय निवडा. क्लोज टोज हिल्समध्ये आपले पाय चारही बाजुंनी बंद, कोंबलेल्या अवस्थेत राहतात. याउलट ओपन टोज हिल्समध्ये आपण हिल्स घालू शकतो व आपले पाय चारही बाजुंनी उघडे राहतात. 

२. हाय हिल्स घालायच्याच असतील तर ब्लॉक हाय हिल्स (Block High Heels) घालण्याला प्राधान्य द्यावे. ब्लॉक हाय हिल्स हे खालून थोडे अरुंद असतात, त्यामुळे तुमच्या शरीराच्या वजनाचे विभाजन केले जाते. यामुळे शरीराचा भार हा तुमच्या कंबर, पार्श्वभाग, खांदे आणि हाडांवर न येता विभागला जातो. यामुळे ब्लॉक हाय हिल्स (Block High Heels) घालण्याचा पर्याय निवडावा. 

३. सध्या बाजारामध्ये फूट कुशन्स मिळतात. या फूट कुशन्स तुम्ही हाय हिल्स घालण्याच्या आधी पायांमध्ये घालून मग त्यावर हाय हिल्स (High Heels) घालू शकता. 

४. तुम्ही पायांच्या बोटांजवळ फोम किंवा कापूस ठेऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला त्याठिकाणी त्रास होणार नाही.  

५. तुम्ही जर ड्रायव्हिंग करत असाल किंवा तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर, ड्राईव्ह करताना, ऑफिसमध्ये आल्यावर हिल्स काढून ठेवा. ऑफिसमध्ये दुसऱ्या फ्लॅट चपला घालाव्यात. तुम्ही मीटिंगमध्ये व्यस्त असाल तर बसलेल्या ठिकाणी खाली तुमच्या हिल्स काढून ठेवू शकता. त्यामुळे तुमच्या पायांना आराम मिळेल. हाय हिल्स घालून धावणं, जिने चढणं या गोष्टी करणं टाळा. यामुळे तुमच्या पायांना जास्त नुकसान पोहचू शकतं.

Web Title: 4 scary things that can happen when you wear heels too much

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fashionफॅशन