Genelia Dsouza Vegan : अभिनेत्री जेनेलिया डिसूजा ही आपल्या बहारदार अभिनयासोबतच आपल्या फिटनेससाठीही ओळखली जाते. अर्थातच फॅन्सना प्रश्न पडतो की, ती इतकी फिट कशी राहते आणि यासाठी कोणती डाएट फॉलो करते? तेच आज जाणून घेणार आहोत. अभिनेत्री जेनेलिया डिसूजा विगन डाएट फॉलो करते. म्हणजे ती आता पूर्णपणे व्हेजिटेरिअन झाली आहे. पण हा निर्णय घेण्याचा विचार तिने कसा केला? हे तिच्या फॅन्सना माहीत नव्हतं. आता तिनेच सोहा अली खानच्या यू्ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीतून याबाबत खुलासा केला आहे. हेल्थ, अध्यात्म, आई होण्याचा अनुभव, प्राण्यांप्रति करूणा आणि पर्यावरणाची समज, या सगळ्याच गोष्टींनी तिला विगन होण्यास भूमिका बजावल्याचं तिने सांगितलं.
जेनेलिया सांगते की, आधी तिला व्हेज जेवण म्हणजे केवळ मटार, बटाटे आणि पनीर इतकंच काय ते माहीत होतं. तेव्हा तिने कधी विचारही केला नव्हता की, आपण काय खातो याचा प्रभाव आपलं शरीर, मन आणि पर्यावरणावर कसा पडतो. पण वाढत्या वयासोबत तिचे विचार बदलू लागले आणि तिने मग आपल्या खाण्या-पिण्यावर लक्ष देणं सुरू केलं.
२०१७ मध्ये जेनेलिया पूर्णपणे शाकाहारी बनली. मात्र, त्यावेळी ती पूर्णपणे विगन नव्हती. ती दूध, चीज आणि अंडी खात होती. ती सांगते की, सुरूवातीला तिचा हा निर्णय पूर्णपणे आरोग्याशी संबंधित होता. तिला वाटलं की, व्हेजिटेरिअन डाएट फॉलो केल्यानं शरीर हलकं राहील आणि तब्येतही चांगली राहील. यादरम्यान तिला एका वेगळ्याच शांततेचा आणि आध्यात्माचा अनुभव झाला.
जेनेलिया पूर्णपणे व्हेजिटेरिअन होण्यात पती रितेश देशमुख यांचीही मोठी भूमिका राहिली आहे. कारण २०१६ पासूनच रितेश हे विगन डाएट फॉलो करत होते. जेनेलियाने रितेशमधील पॉझिटिव्ह बदल बघितले आणि मग तिने सु्द्धा तोच मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने अजिबात घाई केली नाही, विचार करून योग्य वेळी निर्णय घेतला.
आई झाल्यानंतर जेनेलियाचा विचार आणखी जास्त बदलला. ती सांगते की, तिला तिच्या मुलांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे तिने आपल्या आहारात बदल केला. व्हेजिटेरिअन झाल्यापासून आता तिला आता जेवण झाल्यावरही फार हलकं वाटतं, पचन तंत्र सुधारलं आहे. खाण्याबाबत फार शिस्त पाळते आणि लाइफस्टाईलमध्येही सकारात्मक बदल आला आहे. आता जेनेलियासाठी जेवण केवळ टेस्ट नाही तर जीवन जगण्याची एक पद्धत बनलं आहे.
