Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हा' तर डबलढोलकीपणा.., पुरुषांच्या चुका नेहमीच माफ, बाईने पुढे गेलं की त्रास; मलायका अरोरा असे म्हणते..

By कोमल दामुद्रे | Updated: December 5, 2025 11:26 IST

Malaika Arora news: Malaika Arora interview: Malaika Arora statement: मलायका अरोरा म्हणते, बाई कितीही स्ट्राँग असली, तरी तिला जज केलं जातं. पण पुरुषांबद्दल माझ्या मनात कायमच आदर आहे.

- कोमल दामुद्रे 

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रेम, रिलेशनशीप, घटस्फोट होणं काही वेगळी गोष्ट नाही. आज लग्न तर काही महिन्यात, वर्षात घटस्फोट होणं ही त्यांच्यासाठी नॉर्मल गोष्ट आहे.(Malaika Arora news) पण अनेकदा कलाकारांना या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. अशातच बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोराने १९९८ मध्ये अरबाज खान सोबत लग्नगाठ बांधली होती.(Malaika Arora interview) पण २०१८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर बराच काळ ती अर्जुन कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये होती. पण तिचे हे नातं देखील जास्त काळ टिकले नाही. तिचा अधीचा नवरा अरबाज खानने शूरा खानसोबत दुसरे लग्न केले. (Bollywood double standards)

नुकत्याच मोजो स्टोरीसाठी बरखा दत्त यांच्या मुलाखतीत मलायका अरोराने आपली भूमिका मांडली. ती म्हणते बाई कितीही स्ट्राँग असली, तरी तिला जज केलं जातं. पण पुरुषांबद्दल माझ्या मनात कायमच आदर आहे. ती असंही म्हणाली की, जर एखाद्या पुरुषाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला, घटस्फोट घेतला आणि स्वत: अर्ध्या वयाच्या मुलीशी लग्न केलं तर चांगलं वाटतं. पण जेव्हा हेच एखादी स्त्री करते तेव्हा मात्र तिला सुनावलं जातं. ती असं का करते हे समजत नाही का?. हा फक्त अनुभव नाहीये, अनेक वर्षांपासून महिलांनी सहन केलेले वास्तव आहे.

माझ्या मित्रांचे आईबाबा मुलांसाठी किती करतात, नाहीतर तुम्ही! मुलं असं ब्लॅकमेल करतात, लक्षात ठेवा ४ टिप्स

इतकंच नाही तर तिनं नाव न घेता तिच्या एक्स नवऱ्यावर निशाणा साधला. ती म्हणते इंडस्ट्रीसह समाजातही डबल स्टँडर्डची माणसं आहे. त्यांना जास्त वयाच्या बाईचा तरुण माणसाशी संबंध असला की खटकतो. तो स्वत:पेक्षा १५ ते २० वर्षांनी लहान मुलीशी लग्न करतो, रिलेशनशिपमध्ये येतो. तरीही त्याला कुणीही बोल लावत नाही. त्याला “यंग at 50” असे टॅग्स मिळतात. पण एखाद्या अभिनेत्रीने तरुण पुरुषाशी नातं जोडले तर तिला लालसा, इमॅच्युअर, अटेंशन सीकर असे लेबल्स लावले जातात. पण हे सगळे नियम महिलांसाठी का?. 

इंडस्ट्रीमध्ये महिलांना पुरुषांच्या तुलनेत अजूनही विचित्र नजरेनं पाहिलं जातं. वय वाढलं की रोलही कमी होतात. मग हिरोइनऐवजी तिला आईचा किंवा साइड रोल मिळतो. तिच्या प्रेमसंबंधांवर प्रश्न उपस्थित होतात, तिच्या वैयक्तिक आयुष्यावर सहज टिपणी केली जाते. पण पुरुषाच्या याच गोष्टींना मात्र नॉर्मल म्हटलं जातं. ती म्हणते अनेक वेळा माझ्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा जास्त चर्चा कपड्यांवर, रिलेशनशिपवर किंवा वयावर झाली असेल. समाजातला, इंडस्ट्रीमधला हा दुटप्पीपणा मी कायम अनुभवत आली. 

महिलांच्या आयुष्यावर कायम नियम, मर्यादा आणि अपेक्षांचा भडिमार. बाईचे वय दिसू नये, घटस्फोट झाला तर ती चुकीची, तरुण पार्टनर असेल तर ती बिघडलेली, निर्लज्ज अशी टिप्पणी आजही ऐकायला मिळते. पण प्रेमाला वय नसतं, मग समाजाला याचा इतका त्रास का होतो.   

English
हिंदी सारांश
Web Title : Malaika Arora calls out double standards against women in relationships.

Web Summary : Malaika Arora criticizes societal double standards where men dating younger women are praised, while women face judgment for similar choices. She highlights the unfair scrutiny women face regarding age, relationships, and career choices in Bollywood.
टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपमलायका अरोरा