कधी कधी एखादी छोटीशी भूमिका देखील मनावर खोल ठसा उमटवते. कलाकाराचं व्यक्तिमत्व भावत आणि त्याच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल कळल्यावर त्याच्याबद्दलचा मान आणखी वाढतो. अशीच एक भावनिक छाप सोडणारी बालकलाकार म्हणजे अहिदा सरमाई.(Girl with Down Syndrome Touches Hearts with her talent in Dhurandhar , inspiring story ) 'धुरंदर: द रिव्हेंज' या चित्रपटात अहिदाची देखील भूमिका आहे. ही भूमिका जरी छोटी असली, तरी तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं.
अहिदा ही फक्त एक अभिनेत्री नाही, तर ती खऱ्या अर्थाने प्रेरणा आहे. Down Syndrome असतानाही तिने दाखवलेली आत्मविश्वासाची झलक आणि अभिनयातील सहजता ही खरोखरच कौतुकास्पद आहे. तिच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा आणि भावनांची अभिव्यक्ती इतकी नैसर्गिक वाटली की तिची भूमिका पाहताना प्रेक्षक भावूक झाले.
धुरंधर चित्रपटातील डान्स हिट शरारत गाण्यावर सगळेच रिल्स पोस्ट करत होते तसंच अहिदानेही एक गोडसा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि तो व्हायरलही झाला होता. तिच्या त्या उत्साही, मनमोकळ्या नृत्याने अनेकांचे लक्ष वेधले आणि त्याच व्हिडिओमुळे ती चित्रपटाच्या कास्टिंग टीमच्या नजरेत आली. तिच्यातील निरागसता आणि टॅलेंट पाहून तिला थेट चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, हेच तिच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट ठरला.
चित्रपटात तिने साकारलेली भूमिका जरी लहान असली, तरी तिच्या अभिनयाने कथा अधिक भावनिक झाली. तिच्या उपस्थितीने सीन अधिक जिवंत वाटला. हेच एका खऱ्या कलाकाराचं वैशिष्ट्य असतं, लहान भूमिकेतही मोठा प्रभाव निर्माण करणं! मेजर इकबाल म्हणजेच अर्जुन रामपालच्या मुलीची भूमिका तिने केली. अर्जून सरांनी मला सांभाळून घेतले आणि त्यांच्याकडून फार शिकायला मिळाले असेही अहिदा म्हणाली.
अहिदा फक्त अभिनयातच नाही तर डान्स, थिएटर आणि पेंटिंगमध्येही तितकीच पारंगत आहे. तिचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे आणि तिच्या प्रत्येक कृतीतून तिची जिद्द आणि सकारात्मकता दिसून येते. ती मिस इंडिया डाऊन सिंड्रोमची फर्स्ट रनरअपही होती. आजच्या काळात, जिथे परफेक्शनच्या मागे धावणं सुरू आहे, तिथे अहिदा सरमाई आपल्याला शिकवते की 'खरं सौंदर्य आणि टॅलेंट हे व्यक्तिमत्वात असतं.' तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे, विशेषतः अशा मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी, जे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवू इच्छितात.
Web Summary : Ahida Sarmai, with Down Syndrome, impresses in 'Dhurandhar' as Major Iqbal's daughter. Her viral dance video led to the role. Her performance is touching, showcasing her talent and inspiring others to believe in themselves.
Web Summary : अहिदा सरमाई, डाउन सिंड्रोम के साथ, 'धुरंधर' में मेजर इकबाल की बेटी के रूप में प्रभावशाली प्रदर्शन करती हैं। उनके वायरल डांस वीडियो के कारण उन्हें यह भूमिका मिली। उनका अभिनय मार्मिक है, जो उनकी प्रतिभा को दर्शाता है और दूसरों को खुद पर विश्वास करने के लिए प्रेरित करता है।