Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Celebrity Corner > रस्त्यावर उभं राहून CD विकणारी मुलगी ते ‘धुरंदर’मध्ये घुमलेला आवाज — जॅसमिन संडालची यशोगाथा!!!

रस्त्यावर उभं राहून CD विकणारी मुलगी ते ‘धुरंदर’मध्ये घुमलेला आवाज — जॅसमिन संडालची यशोगाथा!!!

From a girl selling CDs on the street to the voice that resonates in 'Dhurandar' — Jasmine Sandal's success story!!! : गाजलेली गाणी गाणारी ही नवी मुलगी आहे तरी कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2026 14:21 IST2026-04-06T14:19:30+5:302026-04-06T14:21:39+5:30

From a girl selling CDs on the street to the voice that resonates in 'Dhurandar' — Jasmine Sandal's success story!!! : गाजलेली गाणी गाणारी ही नवी मुलगी आहे तरी कोण ?

From a girl selling CDs on the street to the voice that resonates in 'Dhurandar' — Jasmine Sandal's success story!!! | रस्त्यावर उभं राहून CD विकणारी मुलगी ते ‘धुरंदर’मध्ये घुमलेला आवाज — जॅसमिन संडालची यशोगाथा!!!

रस्त्यावर उभं राहून CD विकणारी मुलगी ते ‘धुरंदर’मध्ये घुमलेला आवाज — जॅसमिन संडालची यशोगाथा!!!

ग्लॅमरच्या दुनियेत दिसणाऱ्या यशामागे अनेकदा संघर्षाची, नकार पचवण्याची आणि स्वतःवरच्या विश्वासाची खोल कहाणी दडलेली असते. अशीच एक प्रेरणादायी वाटचाल आहे Jasmine Sandlas हिची. (From a girl selling CDs on the street to the voice that resonates in 'Dhurandar' — Jasmine Sandal's success story!!!)आज तिचा आवाज मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये घुमतो, पण या यशापर्यंत पोहोचण्यासाठी तिने अत्यंत कठीण मार्ग पार केला आहे.

जॅसमिनचा जन्म भारतात झाला, पण ती अमेरिकेत वाढली. परदेशात राहूनही तिच्या मनात पंजाबी संगीताची ओढ कायम होती. लहानपणापासूनच तिला गाण्याची आवड होती, मात्र इंडस्ट्रीमध्ये प्रवेश मिळवणं तिच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. ओळखी नव्हत्या, मोठं बॅकअप नव्हतं आणि संधीही सहज मिळत नव्हती. पण तिने हार मानली नाही. तिने स्वतःची गाणी लिहायला सुरवात केली. पंजाबी आणि वेस्टर्नचं फ्यूजन करण्याचा प्रयत्न केला. स्वतःच लिहून गाणी तालबद्ध केली गाऊन रेकॉर्डही केली, त्याच्या CD बनवल्या आणि क्लबच्या बाहेर उभं राहून त्या लोकांना विकायला सुरुवात केली. कोणाला तरी आपलं लिखाण आवडेल या आशेने ती सिड्या विकत राहीली. 

या छोट्या-छोट्या प्रयत्नांमधूनच तिचा आवाज लोकांपर्यंत पोहोचू लागला. तिच्या आवाजातली वेगळीच हस्की टोन आणि प्रामाणिकपणा लोकांना भावू लागला. हळूहळू तिच्या टॅलेंटकडे इंडस्ट्रीचं लक्ष गेलं आणि तिला मोठी संधी मिळाली Yo Yo Honey Singh यासोबत काम करण्याची संधी मिळाली. 'यार ना मिले' या गाण्यामुळे जॅसमिन एकदम प्रकाशझोतात आली. त्या एका गाण्याने तिच्या करिअरला नवी दिशा दिली आणि ती लाखो श्रोत्यांच्या मनात घर करु लागली. गाणं जेवढं गाजलं त्यापेक्षा जास्त जॅसमिनचा आवाज लोकांना आवडला. 

जॅसमिनची खासियत म्हणजे तिने कधीच स्वतःची ओळख बदलली नाही. तिचा आवाज जसा आहे तसाच तिने जपला, तिची शैलीही तशीच ठेवली. ती फक्त गाणं गात नाही, तर त्या गाण्याच्या भावनांमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देते. म्हणूनच तिच्या प्रत्येक गाण्यात एक वेगळा आत्मा श्रोत्यांना जाणवतो. तिच्या गाण्यांमध्ये स्वतंत्र विचार, धाडस आणि एक वेगळीच ऊर्जा दिसते.

संघर्षातून मिळालेलं यश टिकवून ठेवणं हेही तितकंच अवघड असतं. पण जॅसमिनने सातत्याने चांगलं काम करत आपली जागा मजबूत केली. तिच्या या वेगळ्या आवाजामुळेच तिला धुरंदरसारख्या चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. एकेकाळी क्लबच्या बाहेर उभी राहून CD विकणारी हीच मुलगी आज मोठ्या पडद्यावर आपला आवाज लोकांपर्यंत पोहचवत आहे. शरारत तर चांगलंच हिट गेलं त्यानंतर जाईये सजना हे गाणंही लोकांनी रिपिटवर ऐकलं. जॅसमिनची बॉलिवूड एण्ट्री चांगलीच धुरंदर ठरली. 
 

Web Title : जैस्मिन सैंडलस: सड़क से बॉलीवुड तक, एक गूंजती आवाज।

Web Summary : जैस्मिन सैंडलस की यात्रा प्रेरणादायक है। सीडी बेचने से लेकर बॉलीवुड में गाने तक, उनकी अनूठी आवाज और पंजाबी-पश्चिमी फ्यूजन गूंज उठा। 'यार ना मिले' ने उनके करियर को लॉन्च किया, श्रोताओं को उनकी प्रामाणिक शैली और 'धुरंधर' जैसे हिट में शक्तिशाली प्रदर्शन से मोहित किया।

Web Title : Jasmine Sandlas: From street CDs to Bollywood's resounding voice.

Web Summary : Jasmine Sandlas' journey is inspiring. From selling CDs to singing in Bollywood, her unique voice and Punjabi-Western fusion resonated. 'Yaar Na Mile' launched her career, captivating listeners with her authentic style and powerful performances in hits like 'Dhurandar'.