Swelling on Face Cause : अनेकदा सकाळी झोपेतून उठल्यावर आरशात पाहिलं तर चेहऱ्यावर सूज दिसून येते. यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. काहींचा असा समज असतो की जास्त मीठ खाल्ल्यामुळे असं होतं. मात्र प्रत्यक्षात तसं नसतं. कारण चेहऱ्यावर सूज येण्यामागे केवळ जास्त मीठच नाही, तर मीठ कमी घेणे, कमी पाणी पिणे, झोपेची कमतरता, शरीरातील सूज आणि हार्मोन्सचं असंतुलन ही देखील कारणं असू शकतात.
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टच्या मते, जर एखादी व्यक्ती फक्त मीठ कमी करून किंवा ड्युरेटिक्स औषधांच्या मदतीने सूज कमी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ती मूळ समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. कारण शरीर सूज, पोट फुगणे आणि इन्फ्लेमेशनद्वारे आपल्याला काही संकेत देत असतं. त्यामुळे हे संकेत समजून घेणं आणि त्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे.
सूज येण्याची कारणं
न्यूट्रिशनिस्टनुसार, संपूर्ण दोष मिठाला देण्याऐवजी शरीराच्या खऱ्या गरजांकडे लक्ष दिले पाहिजे. कारण मीठ कमी घेतल्याने डिहायड्रेशनचा धोका वाढतो, ज्यामुळे चेहरा आणि शरीरावर सूज येऊ शकते. त्याचप्रमाणे कमी पाणी पिणे हेही सूजेचं एक मोठं कारण आहे. याशिवाय, पुरेशी झोप न घेणे आणि ताणतणावामुळे हार्मोन्सवर परिणाम होतो, ज्यामुळे चेहऱ्यावर सूज दिसून येते.
कसे कराल बरे?
तज्ज्ञांच्या मते, आपलं शरीर पूर्णपणे सिस्टिमॅटिक पद्धतीने काम करत असतं. जेव्हा काही बिघाड होतो, तेव्हा तो सूज किंवा इन्फ्लेमेशनच्या स्वरूपात दिसून येतो. त्यामुळे केवळ लक्षणे दडपण्याऐवजी मूळ कारण समजून घेणं आणि त्यावर योग्य उपाय करणं गरजेचं आहे. यासाठी संतुलित व पौष्टिक आहार घ्या, पुरेसे पाणी प्या, चांगली झोप घ्या आणि आरोग्यदायी जीवनशैली फॉलो करा. यामुळे ही समस्या सहज दूर होऊ शकते.
योग्य उपाय
सर्वप्रथम तुमचा दैनंदिन दिनक्रम तपासा. तुम्ही रोज शरीराला आवश्यक तेवढे पाणी पिता का? तुमची झोप पूर्ण होते का? की तुम्ही जास्त ताण घेत आहात? या गोष्टींकडे लक्ष दिलं तर चेहऱ्यावर सूज येण्याची समस्या कमी होऊ शकते.
