Bad Breath : तोंडाची दुर्गंधी ही समस्या अनेकांना त्रास देते. तोंडातून वास येण्यामागे दातांची स्वच्छता न करणे, किड लागणे, पोटाच्या तक्रारी असे अनेक कारणे असतात. पण शरीरात काही पोषक तत्वांची कमतरता झाली तरीही तोंडाची दुर्गंधी होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे तोंडाला वास येतो?
व्हिटामिन B12 ची कमतरता
व्हिटामिन B12 कमी झाल्यास तोंडाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात, जसे तोंडाला दुर्गंधी, हिरड्यांना सूज, तोंडात जखमा/तोंड येणे इत्यादी.
व्हिटामिन B12 कसे वाढवावे?
बदामाचे दूध, दही, अंडी यांचे सेवन फायदेशीर ठरते.
व्हिटामिन C ची कमतरता
व्हिटामिन C कमी झाल्यास हिरड्यांवर परिणाम होतो. हिरड्यांना सूज, हिरड्यांतून रक्त येणे, तोंडाला वास इत्यादी. व्हिटामिन C वाढवण्यासाठी संत्री, पेरू लिंबू, यांचा आहारात समावेश करा.
तोंडाची दुर्गंधी दूर करण्याचे उपाय
- जेवणानंतर बडीशेप चावून खा यामुळे तोंड ताजेतवाने राहते.
- रोज सकाळी उपाशीपोटी तुळशीची पानं चावा. यानी नैसर्गिकरीत्या दुर्गंधी कमी होते.
- लवंगमुळे तोंडाचा दुर्गंध कमी होतो कारण तिच्यामध्ये अॅंटी-बॅक्टेरीयल घटक असतात. तुम्ही कधीतरी एखादी लवंग नक्कीच चघळू शकता.
- तुम्ही एखादा दालचिनीचा तुकडा चघळू शकता किंवा दालचिनीचा एक कप चहा घेऊ शकता. त्याचप्रमाणे दालचिनीचे तुकडे पाण्यात उकळून ते तुम्ही माऊथवॉश करण्यासाठी देखील वापरु शकता.
- तुमच्या तोंडाला दुर्गंध येत असल्यास तोंडात वेलची ठेवा. किंवा जेवल्यानंतर वेलची टाकलेला चहा घेण्यास हरकत नाही.
