Lokmat Sakhi >Beauty > केस पातळ झालेत? नारळाच्या तेलात ३ पदार्थ मिसळून मसाज करा; घनदाट, लांंब होतील केस

केस पातळ झालेत? नारळाच्या तेलात ३ पदार्थ मिसळून मसाज करा; घनदाट, लांंब होतील केस

Which Oil is Best For Hair Growth : दाट, लांब केसांसाठी केस मुळापासून मजबूत असणं गरजेचं असतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 01:12 PM2024-05-21T13:12:56+5:302024-05-21T16:28:36+5:30

Which Oil is Best For Hair Growth : दाट, लांब केसांसाठी केस मुळापासून मजबूत असणं गरजेचं असतं.

Which Oil is Best For Hair Growth : Best Hair Oil For Hair Growth How To Use Hair Oil For Hair Growth | केस पातळ झालेत? नारळाच्या तेलात ३ पदार्थ मिसळून मसाज करा; घनदाट, लांंब होतील केस

केस पातळ झालेत? नारळाच्या तेलात ३ पदार्थ मिसळून मसाज करा; घनदाट, लांंब होतील केस

आपले केस लांब, दाट असावेत असं प्रत्येक महिलेला वाटतं पण सध्याच्या स्थितीत धूळ, प्रदूषण,  व्यवस्थित डाएट न घेणं यामुळे केस गळणं खूपच वाढलं आहे. (Hair Care Tips) प्रदूषणामुळे केसांच्या आरोग्याचेही नुकसान होते. ज्यामुळे हेअरफॉलचा धोका वाढतो याशिवाय केस रूक्ष आणि कोरडे होतात. (Which Oil is Best For Hair Growth) केसांना हेल्दी बनवण्यासाठी लोक महागड्या, केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर करतात.  यामुळे केस फक्त वरून चांगले दिसतात पण मूळापासून कमकुवत होत असतात. (Best Hair Oil For Hair Growth How To Use Hair Oil For Hair Growth)

हेअर नो हाऊ.कॉमच्या रिपोर्टनुसार केसांसाठी नारळाचे तेल, जोजोबा तेल, ग्रेप सिड ऑईल, अर्गन ऑईल, बदामाचे तेल फायदेशीर ठरते. दाट, लांब केसांसाठी केस मुळापासून मजबूत असणं गरजेचं असतं. केसांना मजबूत आणि दाट बनवण्यात हेअर ऑईलची महत्वाची भूमिका असते.  आठवड्यातून कमीत कमी २ वेळा तेल लावल्यास केस मजबूत आणि दाट होण्यास मदत होईल. 

केसांच्या वाढीसाठी तेल कसं बनवायचं?

केसांना लांब आणि दाट बनवण्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी ३ तेल मिक्स करून  याचे मिश्रण बनवून घ्या. केसांच्या आरोग्यासाठी तेल बेस्ट आहे.  यासाठी नारळाचं तेल २ चमचे, १ चमचा रोजमेरी ऑईल आणि ७ थेंब कॅस्टर ऑईल घ्या. त्यानंतर ते तिन्ही पदार्थ मिसळून स्पेशल तेल बनवून घ्या. 

हे तेल लावणं कठीण नाही. या तेलाचे मिश्रण मिसळून स्काल्पवर व्यवस्थित मसाज करा. स्काल्पवर मसाज केल्यानंतर अर्ध्या तासाने केस व्यवसस्थित धुवून घ्या. तुम्ही हे तेल रात्री  लावले तर रात्रभर असंच लावून सोडून द्या. सकाळी सल्फेट फ्री शॅम्पूने केस स्वच्छ धुवा.

या तेलाचे अनेक फायदे आहेत. यातील नारळाच्या तेलात एंटी फंगल गुण असतात. ज्यामुळे कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते. इतकंच नाहीतर नारळाचे तेल हेअर फॉलिकल्ससाठी गुणकारी ठरते. केसांना मजबूत बनवण्यासाठी फायदेशीर ठरते.

चालणं होतं तरी पोट कमी होत नाही? फक्त १० मिनिटं ‘असा’ करा 'पॉवर वॉक'; कमी होईल पाेट

या तेलाची खासियत अशी की यामुळे केस  सॉफ्ट होण्यास मदत होते. कॅस्टर ऑईमध्ये व्हिटामीन ई आणि फॅटी एसिड्स भरपूर असतात. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते. रोजमेरी तेलात एंटीऑक्सिडेंट्स आणि एंटी इंफ्लेमटरी गुण आहेत ज्यामुळे मेंदूपर्यंत ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यास मदत होते. ज्यामुळे केस स्ट्राँग होतात आणि केसांची वाढही चांगली होते. 

Web Title: Which Oil is Best For Hair Growth : Best Hair Oil For Hair Growth How To Use Hair Oil For Hair Growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.