lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > work out आधी आणि नंतर कसं असावं स्किन केअर रुटीन? या घ्या काही टिप्स

work out आधी आणि नंतर कसं असावं स्किन केअर रुटीन? या घ्या काही टिप्स

परफेक्ट वर्कआऊटमुळे आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो, हे अगदी खरं आहे. पण हा ग्लो टिकून रहावा आणि त्वचा तुकतुकीत व्हावी, यासाठी स्किन केअर रुटीन पाळणं गरजेचं आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 03:52 PM2021-09-26T15:52:48+5:302021-09-26T15:58:07+5:30

परफेक्ट वर्कआऊटमुळे आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो, हे अगदी खरं आहे. पण हा ग्लो टिकून रहावा आणि त्वचा तुकतुकीत व्हावी, यासाठी स्किन केअर रुटीन पाळणं गरजेचं आहे.

What should be the skin care routine before and after work out? Here are some tips | work out आधी आणि नंतर कसं असावं स्किन केअर रुटीन? या घ्या काही टिप्स

work out आधी आणि नंतर कसं असावं स्किन केअर रुटीन? या घ्या काही टिप्स

Highlightsवर्कआऊट आधी आणि नंतर काही स्किन केअर रूटीन फाॅलो करा. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढण्यास नक्कीच मदत होईल.

नियमितपणे वर्कआऊट केल्यामुळे केवळ आरोग्यालाचा लाभ होतो, असं नाही. वर्कआऊटमुळे आपला बाॅडी टोन, बॉडी पोश्चर सुधारते. त्याच बरोबर आपल्या त्वचेचे सौंदर्यही बहरते. ज्या महिला रेग्युलर वर्कआऊट करतात, त्याचा त्यांच्या मागचा मुख्य उद्देश बॉडी टोन आणि स्किन ग्लो असतो, असंही काही जण म्हणतात. आता कोण कशासाठी वर्कआऊट करतं, यापेक्षा नियमितपणे वर्कआऊट केल्या जातं की नाही, ही बाब महत्त्वाची आहे. 

 

अनेक अभिनेत्रीही नियमितपणे वर्कआऊट करतात हे आपण पाहतो. त्यामुळेच तर त्या अतिशय स्लिमट्रीम आणि फिट असतात. त्यांच्या शरीरावर कुठेही अतिरिक्त फॅट्स जमा झालेले दिसत नाहीत. याशिवाय बहुसंख्य अभिनेत्रींच्या सांगण्यात येणारी एक गोष्ट म्हणजे नियमितपणे वर्कआऊट केल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर येणारा ग्लो. याविषयीचे फोटो देखील अनेक जणी सोशल मिडियावर शेअर करत असतात. तुम्हालाही असाच ग्लो पाहिजे असेल आणि मुख्य म्हणजे तो अधिक काळ टिकावा, असं वाटत असेल, तर तुम्हीही वर्कआऊट आधी आणि नंतर काही स्किन केअर रूटीन फाॅलो करा. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढण्यास नक्कीच मदत होईल.

 

वर्कआऊटच्या आधीचे स्किन केअर रूटीन
१. मेकअप उतरवा

वर्कआऊट करण्याआधी आपण चेहऱ्यावर कोणताही मेकअप केलेला नसावा. त्यामुळे जर तुम्ही ऑफिसमधून किंवा अन्य कोणत्या कार्यक्रमातून थेट जीम गाठणार असाल, तर सगळ्यात आधी तुमच्या चेहऱ्यावरचा सगळा मेकअप काढा. एखादे ऑईल बेस क्लिन्जर लावून चेहरा स्वच्छ धुवा. 

 

२. मॉईश्चरायझरचा व्यवस्थित वापर
चेहरा धुतल्यानंतर लगेचच वर्कआऊटला सुरुवात करू नका. त्यावर योग्य प्रकारे आणि नेहमीपेक्षा जरा जास्तच मॉईश्चरायझर लावा. याचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे जेव्हा तुम्ही वर्कआऊट करता तेव्हा तुम्हाला खूप घाम येतो. खूप घाम येऊन कधी- कधी बॉडी डिहायड्रेट होऊ शकते. त्यामुळे त्वचा कोरडी होऊ नये, यासाठी वर्कआऊटच्या आधी चेहऱ्याला व्यवस्थित मॉईश्चराईज करा. त्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहील. 

 

३. सनस्क्रिन अवश्य लावा
तुम्ही वर्कआऊटसाठी जेव्हा रनिंग, वॉकिंग, सायकलिंग करता, किंवा अंगणात, गच्चीवर, बाल्कनीमध्ये वर्कआऊट करता, तेव्हा तुमच्या चेहऱ्याचा आणि सुर्यकिरणांचा थेट संपर्क येतो. त्यामुळे वर्कआऊटसाठी दिवसा घराबाहेर पडताना अवश्य सनस्क्रिन लावा. जीममध्ये जाऊन व्यायाम करणार असाल, तरीही सनस्क्रिन लावायला विसरू नका.

 

वर्कआऊट नंतरचे स्किन केअर रुटीन
१. डिप क्लिन्सिंग

वर्कआऊट झाल्यानंतर तुमचे नेहमीचे क्लिंजर लावा आणि सगळा चेहरा, मान, गळा, अंडरआर्म्स व्यवस्थित धुवून घ्या. वर्कआऊट झाल्यानंतर खूप घाम आलेला असतो. त्यामुळे जर त्यानंतर व्यवस्थित स्वच्छता केली नाही, तर बॅक्टेरिअल इन्फेक्शन होण्याचा किंवा पिंपल्स येण्याचा धोका असतो. त्यामुळे वर्कआऊट नंतर सगळ्यात आधी डिप क्लिन्सिंग करा. वर्कआऊटनंतर ऑईल बेसऐवजी वॉटर बेस क्लिंझर निवडा. 

 

२. टोनिंग ॲण्ड मॉईश्चराईसिंग
चेहरा व्यवस्थित धुतल्यानंतर रोझ वॉटर किंवा तुमचे नेहमीचे टोनर वापरा आणि चेहऱ्याचे व्यवस्थित टोनिंग करा. अल्कोहोल नसणारे टोनर वापरणे कधीही योग्य. टोनिंग केल्यानंतर एखादा मिनिट थांबा आणि त्यानंतर मॉईश्चरायझर लावून चेहऱ्याला हलका मसाज करा. वर्कआऊटनंतर वॉटरबेस मॉईश्चरायझर लावण्यास प्राधान्य द्यावे. 
 

Web Title: What should be the skin care routine before and after work out? Here are some tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.