Vitamin D Taking Tips : व्हिटामिन डी आपल्या शरीरातील वेगवेगळ्या क्रियांसाठी, तब्येत चांगली राहण्यासाठी, हाडं मजूबत करण्यासाठी, इम्यूनिटी वाढवण्यासाठी आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी खूप महत्वाचं असतं. सूर्य किरणांमधून आपल्याला नॅचरल व्हिटामिन डी मिळतं. अशात बरेच लोक असा भाबडा विचार करतात की, जास्त वेळ उन्हात बसल्याने जास्त फायदा मिळेल. पण चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पुद्धतीने फायदे तर सोडाच अनेक गंभीर नुकसान होऊ शकतात. त्यामुळे गरजेचं आहे की, आपण योग्य पद्धतीने व्हिटामिन डी घ्यावं.
अनेक एक्सपर्ट सांगतात की, व्हिटामिन डी मिळवण्यासाठी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंतचं ऊन सगळ्यात चांगलं असतं. या वेळेत सूर्याची यूव्ही करणं त्वचेवर पडून व्हिटामिन डी तयार होण्यास मदत मिळते. सकाळी खूप लवकर किंवा सायंकाळचं उन्ह तेवढा प्रभाव देत नाही.
रोज साधारण १५ ते ३० मिनिटांपर्यंत उन्हात राहणं पुरेसं आहे. यावेळी उन्ह थेट चेहरा हात आणि पायांवर पडायला हवं. जास्त वेळ जर उन्हात बसत असाल तर याने सनबर्न आणि स्किन डॅमेजचा धोका वाढतो. ऊन घेताना जर शरीर झाकूण ठेवाल तर व्हिटामिन डी तयार होण्यास अडथळा येतो. जर फार जास्त कपडे घालाल किंवा त्वचेवर भरपूर सनस्क्रीन लावाल तर फायदा कमी मिळेल.
ऊन घेताना लोक अनेकदा काही चुका करतात. जसे की, तासंतास प्रखर उन्हात बसणे, डोक्यापासून पायांपर्यंत शरीर झाकूण ठेवणे, फार जास्त सनस्क्रीन लावणे किंवा सायंकाळी उन्हात बसणे. यामुळे व्हिटामिन डी चं अॅब्जॉर्बशन कमी होतं आणि त्वचेचं यामुळे नुकसान होऊ शकतं.
चुकीच्या पद्धतीने ऊन घेतल्याने त्वचा काळी पडणे, सनबर्न, सुरकुत्या आणि स्किन डॅमेज होण्याचा धोका असतो. तर ऊन कमी घेतल्याने व्हिटामिन डी ची शरीरात कमतरता होऊ शकते. अशात योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने ऊन घेणं महत्वाचं ठरतं.
