Join us

लादी पुसताना पाण्यात मिसळा ‘हा’ पदार्थ, फरशीवरचे डाग होतील गायब, घर दिसेल स्वच्छ-चकचकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 18:01 IST

What Is The Best Homemade Mopping Solution : अनेकदा घराची साफसफाई करताना फरशीचे काही कोपरे असेच अस्वच्छ राहतात. वारंवार याकडे दुर्लक्ष केल्यामुळे समस्याही उद्भवतात. 

घराची साफसफाई करणं खूपच कठीण काम.  हॉल, रूम, किचन, बाल्कनी, सर्व ठिकाणची साफ-सफाई करणं, स्वच्छता ठेवणं सोपं नसते.  हाताने लादी पुसा किंवा मॉपचा वापर करा प्रत्येक कामासाठी तितकाच वेळ लागतो. ( What Is the Best Homemade Floor Cleaner) कितीही मेहनत केली तर फरशी काळी दिसते, खाण्यापिण्याचे डाग पडतात अशावेळी फरशी जास्तच खराब दिसते. (What Is The Best Homemade Mopping Solution)

फरशी कापडाने पुसल्यानंतरही वास येतो. अनेकदा घराची साफसफाई करताना फरशीचे काही कोपरे असेच अस्वच्छ राहतात. वारंवार याकडे दुर्लक्ष केल्यामुळे समस्याही उद्भवतात.  टाईल्स स्वच्छ करण्यासाठी फ्लोअर क्लिनिंग लिक्विड तयार करा. (Best Homemade Floor Cleaner For Mopping)

घरात ठेवलेल्या ३ गोष्टींचा वापर करून तुम्ही एक उत्तम क्लिनिंग लिक्विड बनवू शकता.  सगळ्यात आधी कोमट पाणी घ्या त्यात २ चमचे डिश सोप किंवा १ कप व्हाईट व्हिनेगर आणि २ चमचे बेकिंग सोडा घाला. यानंतर लिक्विडनं पूर्ण घराची साफसफाई करा.

चष्मा नकोसा वाटतो, नजर तेज ठेवण्यासाठी रोज ५ पदार्थ खा; डोळ्यांच्या तक्रारी राहतील दूर

या लिक्विडमध्ये पॉवरफुल क्लिनिंग इंग्रिडिएट्स मिसळा ज्यामुळे फरशी चमकण्यास मदत होईल.   लॅमिनेडेट फ्लोअर नेहमीच साफ करावे लागतात. अशावेळी बेकिंग सोड्याचा वापर जास्त प्रमाणात करू नका. कारण यामुळे फ्लोअर खराब होऊ शकतात.

टाईल्स कशा स्वच्छ कराव्यात?

कोमट पाण्यात २ कप व्हाईट व्हिनेगर मिसळा त्यात ५ ते १० ड्रॅप इसेंशियल ऑईल मिसळा. पाण्यात हे सर्व पदार्थ मिसळल्याने लॅमिनेडेट फ्लोरचे नुकसान होणार नाही. लाकडाचा फ्लो असेल तर त्यावर स्क्रॅचेच येऊ शकतात. यासाठी तुम्ही माईल्ड इंग्रेडिएंट्ससचा वापर करू शकता.  ज्यामुळे फरशी चमकेल. अर्धा चमचा लिंबाचा रस, 3/4चमचे ऑलिव्ह ऑईल आणि बादलीत कोमट पाणी मिसळून फरशी पुसा. पाण्यात ऑईल मिक्स होणार नाही याची काळजी घ्या.  फ्लोअर पॉलिशिंगसाठी या तेलाचा तुम्ही वापर करू शकता. 

दातांच्या मध्यभागी किड-वरून पिळवे झाले? किचनमधल्या ३ वस्तू लावा, किड निघेल-स्वच्छ होतील दात

जर तुम्हाला घरी नॅच्युरल स्टोन फ्लोरिंग असेल तर डाग आणि  फरश्यांमधील भाग स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत करावी लागेल. यासाठी घरीच क्लिनर तयार करा. अर्धा कप लिंबाचा रस, अर्धा  कप रबिंग अल्कोहोल, १ चमचा डिश वॉश सोप आणि अर्धी बादली कोमट पाणी मिसळून पाण्याने फरशी पुसून घ्या. ज्यामुळे फ्लोअरवर लागलेले डाग सहज स्वच्छ करता येतील.

मार्बल फ्लोरिंग कसे स्वच्छ कराल?

मार्बल फ्लोर दिसायला जितके चांगले दिसतात  तितकेच ते मॅनेज करणं खूपच कठीण होतं. केमिकल्सयुक्त क्लिनर्सचा वापर मार्बल फ्लोअरला डॅमेज करू शकतो. म्हणूनच नेहमी माईल्ड क्लिनरचा वापर करा. 2 कप कोमट पाण्यात १/४  कप रबिंग अल्कोहोल मिसळा. त्यानंतर ३ ड्रॉप माईल्ड लिक्विड डिश वॉश सोप मिसळा. नंतर पाण्याने पुसून घ्या.  

टॅग्स :सुंदर गृहनियोजनस्वच्छता टिप्स