Lokmat Sakhi >Beauty > कोरियन लोकांचे दात कायम पांढरेशुभ्र, घ्या त्यांचा ३-३-३ फॉर्म्युला, चमकू लागतील प्रत्येकाचे सुंदर दात

कोरियन लोकांचे दात कायम पांढरेशुभ्र, घ्या त्यांचा ३-३-३ फॉर्म्युला, चमकू लागतील प्रत्येकाचे सुंदर दात

Teeth Cleaning Korean Method : जर तुम्ही चांगल्या क्लालिटीचा ब्रश आणि टूथपेस्ट वापरत असाल, त्यानंतरही दात पिवळे दिसत असतील तर याचं कारण योग्यपणे ब्रश न करणं असू शकतं.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 15:29 IST2025-07-05T14:56:24+5:302025-07-05T15:29:23+5:30

Teeth Cleaning Korean Method : जर तुम्ही चांगल्या क्लालिटीचा ब्रश आणि टूथपेस्ट वापरत असाल, त्यानंतरही दात पिवळे दिसत असतील तर याचं कारण योग्यपणे ब्रश न करणं असू शकतं.  

What Is the 3-3-3 Rule for Brushing Teeth? The Korean Formula | कोरियन लोकांचे दात कायम पांढरेशुभ्र, घ्या त्यांचा ३-३-३ फॉर्म्युला, चमकू लागतील प्रत्येकाचे सुंदर दात

कोरियन लोकांचे दात कायम पांढरेशुभ्र, घ्या त्यांचा ३-३-३ फॉर्म्युला, चमकू लागतील प्रत्येकाचे सुंदर दात

Teeth Cleaning Korean Method :  दात आपल्या शरीरातील महत्वाचा भाग असतात. पण अनेकदा चुकीच्या खाण्या-पिण्यानं, एखाद्या आजारानं किंवा स्वच्छतेची योग्य काळजी न घेतल्यानं दात पिवळे होतात. ज्यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य कमी होतं. बरेचजण तर जोर लावून लावून दात घासतात, पण पिवळेपणा काही दूर होत नाही. जर तुम्ही चांगल्या क्लालिटीचा ब्रश आणि टूथपेस्ट वापरत असाल, त्यानंतरही दात पिवळे दिसत असतील तर याचं कारण योग्यपणे ब्रश न करणं असू शकतं.

साधारणपणे कोणतीही गोष्ट करण्याची एक पद्धत असते. आपल्यापैकी बरेच लोक दिवसातून दोनदा ब्रश करत असतील. पण तरीही दातांवर काही फरक दिसत नसेल तर हा लेख तुमच्या कामात येऊ शकतो. दातांची काळजी घेण्यासाठी दात योग्य पद्धतीनं ब्रश करणं गरजेचं आहे. याबाबत कोरियन लोकांकडून आपण शिकलो पाहिजे.

कोरियातील लोक दात स्वच्छ करण्यासाठी 3-3-3 चा फॉर्म्यूला वापरतात. ही दात स्वच्छ करण्याची एक प्रभावी पद्धत आहे. हा फॉर्म्यूला फॉलो करणं सोपा आहे. पाहुयात काय आहे हा कोरिअन फॉर्म्यूला

काय आहे 3-3-3 चा फॉर्म्यूला?

- दिवसातून तीन वेळा ब्रश करा. सकाळी झोपेतून उठल्यावर, दुपारी जेवणानंतर आणि रात्री झोपण्याआधी ब्रश करावा.

- प्रत्येकवेळी साधारण ३ मिनिटांपर्यंत ब्रश करावा. असं केल्यास तोंडाची स्वच्छता चांगली होते.

- जेवण केल्यावर नंतर मिनिटं वाट बघा. त्यानंतर ब्रश करा. असं केल्यानं लाळ अन्नातील अ‍ॅसिड न्यूट्रल करू शकेल आणि दातही सेफ राहतील.

आपण अनेकदा पाहिलं असेल की, बरेच लोक घाईघाईत ब्रश करतात किंवा दिवसातून एकदाच ब्रश करतात. पण जर हा फॉर्म्यूला आपण फॉलो केला तर दात दिवसातून अनेकदा साफ होतील. असं केल्यानं तोंडात बॅक्टेरिया वाढत नाहीत. त्याशिवाय दातांवर प्लाक जमा होत नाही आणि हिरड्याही हेल्दी राहतात. तीन मिनिटांपर्यंत ब्रश केल्यानं तोंडाच्या कानाकोपऱ्याची स्वच्छता होते.

कसा फॉलो कराल हा फॉर्म्यूला?

- सॉफ्ट ब्रशचा वापर करा आणि टूथपेस्ट कमी प्रमाणात वापरा.

- मोबाइलमध्ये तीन मिनिटांचा टायमर लावा.

- ब्रश तोंडात गोलगोल फिरवत दात, हिरड्या आणि जीभ साफ करा.

- ब्रश केल्यानंतर तोंड लगेच पाण्यानं धुवू नका. टूथपेस्टला थोडावेळी आपला प्रभाव पाडू द्या.

- कमीत कमी तीन मिनिटांनंतर तोंड धुवा

- प्रत्येक तीन महिन्यात टूथब्रश बदलावा.

Web Title: What Is the 3-3-3 Rule for Brushing Teeth? The Korean Formula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.