Lokmat Sakhi >Beauty > आंघोळीसाठी लूफा वापरल्यानं त्वचेवर होऊ शकतं इन्फेक्शन, वाचा काय म्हणाले वैज्ञानिक...

आंघोळीसाठी लूफा वापरल्यानं त्वचेवर होऊ शकतं इन्फेक्शन, वाचा काय म्हणाले वैज्ञानिक...

Skin Care : स्किन एक्सफोलिएट करण्यासाठी आणि डेड स्किन सेल्स दूर करण्यासाठी यानं मदत मिळते. पण याचे काही फायदे असूनही लूफा त्वचेसाठी नुकसानकारकही ठरतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 16:48 IST2025-05-23T16:47:04+5:302025-05-23T16:48:11+5:30

Skin Care : स्किन एक्सफोलिएट करण्यासाठी आणि डेड स्किन सेल्स दूर करण्यासाठी यानं मदत मिळते. पण याचे काही फायदे असूनही लूफा त्वचेसाठी नुकसानकारकही ठरतो.

Using a loofah for bathing can cause skin infection, know what scientists said | आंघोळीसाठी लूफा वापरल्यानं त्वचेवर होऊ शकतं इन्फेक्शन, वाचा काय म्हणाले वैज्ञानिक...

आंघोळीसाठी लूफा वापरल्यानं त्वचेवर होऊ शकतं इन्फेक्शन, वाचा काय म्हणाले वैज्ञानिक...

Skin Care : आंघोळ केल्यानंतर शरीर तर स्वच्छ होतंच, सोबतच शरीराला आरामही मिळतो. त्यामुळेच डॉक्टर नियमितपणे आंघोळ करण्याचा सल्ला देत असतात. आजकाल लोकही आंघोळ करताना बऱ्याच गोष्टींची काळजी घेतात. यासाठी वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या जातात. बाथ सॉल्ट,  स्क्रब, बॉडी वॉश यांसारख्या गोष्टी वापरल्या जातात. अनेक महिला आंघोळ करताना लूफा सुद्धा वापरतात. स्किन एक्सफोलिएट करण्यासाठी आणि डेड स्किन सेल्स दूर करण्यासाठी यानं मदत मिळते. पण याचे काही फायदे असूनही लूफा त्वचेसाठी नुकसानकारकही ठरतो.

लूफा काय असतो?

लूफा एक रफ, धागेदार स्पंज अशत, ज्याचा वापर आंघोळीवेळी त्वचा साफ करण्यासाठी केला जातो. लूफा सामान्यपणे काही झाडांच्या सालीपासून किंवा सिंथेटिक वस्तूंपासून तयार केला जातो. यानं त्वचेवरील डेड स्किन सेल्स निघून जातात. ज्यामुळे त्वचा मुलायम होते.

लूफा वापरणं योग्य की अयोग्य?

यात तर अजिबात दुमत नाही की, लूफा त्वचेसाठी फायदेशीर अशतो. पण अनेक स्किन एक्सपर्ट लूफा न वापरण्याचा सल्ला देतात. याची कारणं जाणून घेऊ.
लूफा वापरण्याचे नुकसान

होऊ शकतं इन्फेक्शन

Cleveland clinic नुसा, लूफा मग तो नॅचरल असो किंवा सिंथेटिक वस्तूंपासून बनवलेला असो हा अनेक बॅक्टेरिया आणि फंगसचा अड्डा ठरतो. लूफ्यामधील फंगल जीवांमुळे त्वचेवर इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे लूफा वापरल्यानंतर योग्यपणे साफ करणंही गरजेचं असतं.

त्वचा होऊ शकते ड्राय

लूफ्यानं त्वचेवर इन्फेक्शन होण्यासोबतच याचा नियमित वापर केल्यास त्वचेवरील नॅचरल ऑइलही निघून जातं. ज्यामुळे त्वचा रखरखीत आणि ड्राय होऊ शकते

काय काळजी घ्याल?

एक्सपर्ट सांगतात की, असं अजिबात नाही की, लूफा अजिबातच वापरू नये. पण त्याचा वापर करण्यासोबतच काही गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे.

- लूफा त्वचेवर खूप जास्त घासणं टाळलं पाहिज.

- आठवड्यातून एक किंवा दोनदाच याचा वापर करा.

- आंघोळीनंतर लूफा चांगला स्वच्छ करा.

- लूफा आंघोळीनंतर पूर्ण सुकवा, त्यात पाणी राहू नये.

- शेव्हिंग केल्यानंतर काही दिवस याचा वापर करणं टाळावं.

Web Title: Using a loofah for bathing can cause skin infection, know what scientists said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.