पुदिना म्हटलं की सगळ्यात आधी आठवतो तो त्याचा मंद सुगंध. पाणीपुरीचं तिखट पाणी असो किंवा मग वेगवेगळ्या चाट पदार्थांसोबत दिली जाणारी पुदिन्याची हिरवीगार चटणी असो... या पदार्थांना चव आणि सुगंध देण्याचं काम करतो तो पुदिना. त्यामुळेच आपल्याला असं वाटतं की सुगंध हीच फक्त पुदिन्याची ओळख आहे. पण असं मात्र मुळीच नाही. पुदिन्यामध्ये औषधी गुणधर्मही भरपूर प्रमाणात आहेत. ॲसिडीटी, अपचन, डोकेदुखी असे कित्येक त्रास कमी करण्यासाठी पुदिना खूप उपयुक्त ठरतो. ऋतू बदलल्यानंतर अनेकांना कफ, घसादुखी असा त्रास होतो. तो टाळण्यासाठीही पुदिना खायला हवा. याशिवाय श्वसनाचे वेगवेगळे त्रास कमी करण्यासाठीही पुदिना खायला हवा (how to make pudina juice and pudina facepack?). आता याच बहुगुणी पुदिन्याचा उपयोग सौंदर्य खुलविण्यासाठी आणि वजन घटविण्यासाठी कसा करायचा ते पाहूया..(use of mint or pudina for glowing skin)
चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी पुदिन्याचा वापर
हा उपाय करण्यासाठी आपल्याला पुदिन्याची ताजी, हिरवीगार पानं लागणार आहेत. पुदिन्याची १५ ते २० हिरवीगार पानं स्वच्छ धुवून घ्या. यानंतर ती पानं मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट गाळून घ्या आणि पुदिन्याचा साधारण २ चमचे एवढा रस काढून घ्या.
Winter Care: सर्दीमुळे घसा दुखतोय- आवाज बसला? सोपा घरगुती उपाय- काही मिनिटांत आराम मिळेल
या रसामध्ये आता १ चमचा ताजा लिंबाचा रस घाला आणि या मिश्रणात चिमूटभर काळं मीठ घालून १ ग्लास पाणी घाला. सगळं पाणी व्यवस्थित हलवून घ्या आणि दोन ते तीन दिवसांतून एकदा अशा पद्धतीने केलेलं ग्लासभर पाणी सकाळी उपाशीपोटी प्या.
हा उपाय केल्यामुळे पचनक्रिया, मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत होते. पचन, मेटाबॉलिझम व्यवस्थित झालं की त्याचा आपोआपच चांगला परिणाम तुमच्या त्वचेवर आणि आरोग्यावर होतो. मेटाबॉलिझम चांगलं झाल्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.
९० टक्के महिला 'ही' चूक करतात म्हणून सिल्कच्या साड्या घडीवर चिरतात! तुमचंही तेच होतंय का?
हा उपायही करून पाहा
एका वाटीमध्ये पुदिन्याचा रस घ्या. त्यामध्ये थोडं दही आणि बेसन घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित कालवून त्याचा लेप चेहऱ्याला लावा. १० ते १२ मिनिटांनंतर लेप सुकत आला की हलक्या हाताने चोळून चेहरा धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय करा. डेडस्किन, टॅनिंग निघून जाईल आणि चेहरा फ्रेश दिसेल.
